कादंबरी

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 6 August, 2010 - 05:30

देवांग आणि वर्गातील जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांकडे असलेली एक गोष्ट गट्टू आधी स्वप्नातही पाहू शकत नव्हता. पण आता त्याला ते स्वप्न क्षणोक्षणी पडायला लागले. 'सायकल'!

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १६

Submitted by बेफ़िकीर on 5 August, 2010 - 08:09

इयत्ता आठवीमधे लागलेला हा शोध फार विचित्र होता. आजवर लागलेल्या शोधांपैकी सर्वात विचित्र! तिसरीत 'आपण पहिले आलो की पार्टी' करतात हा शोध लागला होता. त्याचवेळेस माणूस मरतो आणि चितळे आजोबा मेले तेव्हा आपला सर्व वाडा रडत होता हेही समजले. चवथीत हॉटेल सुजाता नावाची या जगात एक अशी जागा आहे की आयुष्यातील 'पिक्चर बघणे' याच्या खालोखालचा आनंद तिथे मिळतो आणि तेथे जाणे हा बाबांच्या दृष्टीने सर्वात मोठा अपराध असतो कारण 'आपल्याकडे पैसे नाहीत व आपण इतरांपेक्षा गरीब आहोत'.

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 29 July, 2010 - 07:03

हॉटेल! हॉटेल नावाचा एक प्रकार असतो अन तो आपल्याला आपल्या बाबांनी कधीही कळू दिला नाही हे मोठेच शल्य गट्टूच्या मनात रुतून बसले.

कालच त्याला मधूकाकाने सुजातामधे वडा खायला नेले होते. तो प्रमिला अन समीरला घेऊन जात असताना गट्टूने सहज 'मी पण येऊ फिरायला?' असे विचारले अन मधूने कसलाही विचार न करता त्याला बरोबर घेतले.

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2010 - 06:48

श्री - अरे शंभर रुपये म्हणजे चेष्टाय का गट्टू?
गट्टू - नाही.. मी जाणार..
श्री - गट्टू.. वेडायस का? अरे या सहली वगैरे श्रीमंतांसाठी असतात.. शाळा पैसे कमवायला असल्या सहली काढते..
गट्टू - सगळे चाललेत...
श्री - कोण कोण चाललंय?
गट्टू - निलेश, अभी, जया, श्रीकृष्ण, रागिणी, नीता, बबली, मकरंद.. सगळे..
श्री - बरं.. बघू..
गट्टू - सगळ्या गोष्टींना बघू काय हो बाबा? मला काहीच करू देत नाही तुम्ही..
श्री - असं कसं म्हणतोस? आता मेकॅनो आणला, बुद्धीबळ आणलं..
गट्टू - एक वर्ष झालं त्याला..
श्री - सहलीत खूप दमायला होतं..
गट्टू - नाही होत..
श्री - आणि अभ्यास किती मागे राहिलाय..

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १३

Submitted by बेफ़िकीर on 20 July, 2010 - 00:40

बेरी काकूंना मुलगा अन निगडे काकूंना चव्वेचाळीशीत मुलगी झाली. त्यांची सर्वात थोरली मुलगी सत्तावीस वर्षांची होती अन तिला दोन मुले होती. निगडे काकूंना आता नऊ मुली अन एक मुलगा! श्रीयुत निगडे आभाळाकडे बघत प्रार्थना करत बसायचे दिवसा! रात्री करायचे नाहीत हा खरा प्रॉब्लेम होता. आईचे बाळंतपण करायला विद्या ही सर्वात थोरली मुलगी वाड्यात अवतरली अन पहिल्याच दिवशी तिला मानेकाकांचा झटका बरेच वर्षांनी मिळाला. काही नाही, मानेकाकांची बादली बिनदिक्कत बाजूला करून तिने स्वतःची बादली आधी भरली. कॉर्पोरेशनचे पाणी कॉमन नळाला सकाळी दोन तास अन संध्याकाळी दोन तास यायचे.

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 19 July, 2010 - 02:03

दास्ताने वाड्यात असा जल्लोष क्वचितच व्हायचा! इयत्ता तिसरीमधे गट्टू शाळेत पहिला! गेल्या सात वर्षांची रेकॉर्ड्स मोडली!

नुकताच पाचवी पास झालेला अन 'आम्हाला आता इंग्लीश आहे' याचा टेंभा मिरवणारा समीरदादा सगळे जल्लोषात नाहून निघत असताना कित्तीतरी वेळ गट्टूचे प्रगती पुस्तक तपासत होता. चुकून एखाद्या विषयात कमी मार्क्स तर नाहीयेत ना? नाहीतर उगाचच लोक नाचायचे अन हा झालेला असायचा नापास वगैरे!

श्रीला आता दोन्ही हातांना मिळून सात बोटे होती. उजव्या हाताची सर्व आणि डाव्या हाताची करंगळी अन तिच्या शेजारचे बोट म्हणजे मरंगळी की काय म्हणतात ते!

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ११

Submitted by बेफ़िकीर on 16 July, 2010 - 03:16

ऑडिटमधे एकही गफलत निदर्शनास न आल्याने प्रत्येकी पंधराशे रुपये व रात्री सर्व एक्साईजवाल्यांना एका हॉटेलमधे मद्य व कोंबडी यावर निभावले. आदल्या रात्री प्रचंड चालल्यामुळे स्वाती आज पुढच्या दोन दिवसांचा रजेचा अर्ज टाकून चार वाजताच निघून गेली. सगळे शांत झाल्यावर विवेकबुद्धी जागृत असलेल्या श्रीने सप्रेंना संध्याकाळी सांगीतले की ती चूक त्याच्याकडून झाली होती. सप्रेंनी त्यालाही झापले पण जरा सौम्यपणे! कारण आता वेळ टळलेली होती. रात्रीच्या पार्टीला कोपरकर, देशमाने अन सप्रे गेले होते.

गट्टूचा ताप कधीच उतरून तो हळूहळू खेळायलाही लागलेला होता. शाळा काही बुडवलेली नव्हती.

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 15 July, 2010 - 03:16

पंधरा दिवसांनंतरच्या सकाळी पावणेआठ वाजता बसस्टॉपवर आलेल्या श्रीला कित्येक दिवसांनी स्वाती पुन्हा जॉईन होण्यासाठी स्टॉपवर आलेली दिसली. त्या प्रसंगानंतर तो तिच्याकडे गेलाच नव्हता. तीही कुणातर्फे निरोप वगैरे पाठवून त्याला बोलावणे अप्रशस्त मानत होती. त्यामुळे स्वातीच्या मनात खूप चलबिचल, अस्वस्थता आणि कधी एकदा श्रीनिवास भेटतोय अशा भावनांचे मिश्रण तर श्रीनिवासच्या मनात 'या बाईशी मी काय बोलून बसलो आणि आता कसे निस्तरूनही मैत्री तशीच ठेवायची' हे प्रश्न होते.

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 9 July, 2010 - 05:27

तारा निघून गेल्यानंतर पुन्हा बाबांबरोबर गट्टू शाळेला जायला लागला. तारामावशीच्या स्टे मधे अनेक चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. पुण्यातही तिने काही कपडे, मिठाई, इतर खाद्यपदार्थ व श्रीसाठी एक शर्ट विकत घेतला. ताराची परिस्थिती चांगली असल्यामुळे ती हे करू शकत होती. रमा गेल्यानंतरही संबंध व्यवस्थित टिकवून होती तारा! पण श्रीचे लक्ष जरासे कमीच होते घरात! कारण तो जवळजवळ रोज संध्याकाळी जहागीरला जाऊन येत होता. स्वातीच्या घरीही जाऊन येऊन होता. त्यांना जी मदत लागेल ती त्याच्या परीने करत होता. स्वाती आठ दिवसांनी घरी आली होती. महिनाभर घरी राहावे लागणार होते. उजव्या गुडघ्याला दुखापत झालेली होती.

गुलमोहर: 

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2010 - 01:05

सगळ्यांना असते तशी आपल्याला आई नाही, पवार आजींनी आपल्या आईची भूमिका बजावलेली आहे, वाड्यातील प्रत्येक माणसाने आपल्याला सांभाळलेले आहे, तारामावशी व उषाआत्या या दोघींमुळे आपल्या आयुष्याचे पहिले काही दिवस अत्यंत व्यवस्थित जाऊ शकले, आपल्या बाबांची आर्थिक परिस्थिती इतरांसारखी चांगली नाही व साधे सरळ वागायचे, भांडायचे नाही आणि मुख्य म्हणजे कधीही... रडायचे नाही.

इतके सगळे संस्कार महेशवर पहिलीत जायच्या वेळेलाच झालेले होते. आता त्याच्या दृष्टीने त्याचे बाबा म्हणजे सबकुछ झालेले होते. समीरदादाने केलेल्या दुखावणार्‍या थट्टेवर आता तो दिलदारपणे हसू शकत होता. समीर आता चवथीत तर राजश्रीताई तिसरीत होती.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी