कादंबरी

सनम - ६

Submitted by बेफ़िकीर on 24 July, 2012 - 04:44

नदीच्या या अंगाने ती कधीच नदीत उतरलेली नव्हती. परिणाम व्हायचा तोच झाला. माहीत नसलेल्या पाण्यात थेट सूर मारल्यामुळे दाणकन आपटली कशावर तरी आणि असह्य वेदना झाल्याने तडफडत पुन्हा पाण्याबाहेर आली.

गुलमोहर: 

सनम - ५

Submitted by बेफ़िकीर on 23 July, 2012 - 09:11

जितकी काळजी घरच्यांनी घेतली, तितकीच सनमनेही घेतली! महिनाभर! जाळून मारण्याचा प्लॅन आपल्यालाही कळलेला आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही. अगदी माहेरीही! शेजारपाजारच्यांनाही नाही आणि गावातल्या महत्वाच्या समजल्या गेलेल्या कोणालाही नाही.

गुलमोहर: 

अंदमानातील आपले नग्न पूर्वज

Submitted by sumant_jo on 13 July, 2012 - 00:15

अंदमानच्या इतिहासाबद्दल भारतीय माणसाला फार माहीत नसत. बहुतेक लोकांना तिथल्या सृष्टी सौंदर्याबद्दल आणि सेल्यूलर जेलबद्दल थोडाफार माहीत असतं. एकदा तर मला कुणीतरी “तिथे जाण्यासाठी पासपोर्ट लागतो का” असही विचारलं. भारतीय नौदलात असतांना मी अंदमानात चार वर्ष काढली तेव्हा तिथल्या इतिहासाबद्दल खूप शिकलो. पुढे मधुश्री मुखर्जी यांच्या “The Land of Naked People” पुस्तकाच मी मराठीत भाषांतर केलं. त्यातलीच एक छोटीशी गाथा.
front page small.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सनम - ४

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 10:07

नाथा स्वागताचे भाषण करायला उठला आणि पच्चकन थुंकून एकदा सनमकडे आणि एकदा इतरांकडे बघत म्हणाला.

"ही बाय म्हायरला ग्येल्यालीय... ओढून आन्लीय तवा आलीय... शादी झाली म्हन्ल्यावं वडार झाली ही.. तवा वडाराचं नियम लागू होनार... तवा पंचायत म्हन्ती की हिनं सासर म्हाईर दोन्ही सोडावं.. कोना धनिकाचा आश्रय घ्यावा.. आन र्‍हावं... यकदा पळून ग्येल्याली पोरगी माघारी घ्येत न्हाईत आपल्यात.. आसं पंचायत म्हनत हाये.. सर्व्यांनी सांगा काय त्ये..."

गुलमोहर: 

सनम - ३

Submitted by बेफ़िकीर on 2 July, 2012 - 08:06

आपली मोठी जाऊ ही आपली मोठी जाऊ नसून सासर्‍याची दुसरी बायको आहे आणि गावाने बोंब मारू नये म्हणून मोठी सून म्हणून मिरवत आहे हे सनमला दुसर्‍याच दिवशी समजले. विन्याने सांगितले. विन्याला तिच्याशी तेवढे बोलायला वेळ मिळाला. का मिळाला, तर त्याच्या आईने त्याला सांगितले की नव्या सुनेने उगाच तोंड उघडू नये म्हणून तिला आधीच हे सांगून ठेव. तेवढे वाक्य बोलून आणि लाळ गाळत विन्या सटकला.

गुलमोहर: 

सनम - १

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2012 - 08:00

"सही कर"

"ह....म्या..."

"हम्या हे नांव आहे तुझ???? हनुमान कदम लिही..."

"बरं... ह .. नु.. मा .. न... क ..द.. म.."

"हं... ही घे कॅश..."

"उपकार झाले साहेब...."

"हं... निघा आता... सरकारचे जावई..."

"... हे... हे कितीयत???... तीनच आहेत..."

"मग??? सगळ्यांना तीन हजारच देतायत..."

"पण... दहा हजार आहे ना अनुदान पुरात सगळं गेलेल्यांना???"

गुलमोहर: 

ओळख

Submitted by अनया शिर्के on 23 April, 2012 - 08:19

मायबोलीच्या सर्व मित्र मैत्रिणीना माझे अभिवादन!!
मी अनया शिर्के, आजच मायबोलीची सभासद झाले, फक्त ओळख करून देण्यासाठी मी इथे लिहित आहे .
माझ्या कथा मी नक्कीच इथे पोस्ट करेन आणि अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला साथ द्याल.
शुभ दिन!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बोगोर बुदुर ..एक विनंती

Submitted by अविनाश जोशी on 2 April, 2012 - 08:41

पुढचा भाग हा बहुतेक शेवटचा भाग असेल. कादंबरीचा शेवट माझ्या मनात आहे व त्या अगोदर एक खुन पण आहे. असंख्य वाचकांनी मला भरभरुन प्रोत्साहन दिले आहे. आता ही शेवटची विनंती. आपलया दृष्टीने काय शेवट असावा....

गुलमोहर: 

बोगोर बुदुर .. भाग १६

Submitted by अविनाश जोशी on 2 April, 2012 - 07:39

--३६-

रात्र तशी शांततेतच गेली.

सकाळी सोनल बरीच फ़्रेश दिसत होती.

बाईंना बरोबर घेउन सोनलने घर आवरले. माखानीना फोन करुन झालेली हकीकात सांगीतली.

थोड्यावेळाने पोलिस जबाब घेण्यास आले.

“मॅडम घरातले काय गेले ते सांगु शकल काय?”

“जायला घरात काय आहे ? सर्व वस्तु तर जागच्याजागीच आहेत.”

“पण मग आलेले काय बघत होते?”

“काही कल्पना नाही. कारण मी किंवा मीनल काही जोखमीचे घराय ठेवत नव्हतो”

“ ह्याचा शहांच्या खुनाशी किंवा तारीच्या खुनांशी काही संबध असावा का?”

“तुम्हाला काय म्हणायचे आहे?”

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी