कादंबरी

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 1 June, 2010 - 05:20

साहू या वेश्येच्या मुलाची कहाणी लिहायला घेत आहे. एक अत्यंत टाळला गेलेला विषय, ज्यावर लोक एक तर नाक मुरडतात किंवा हसतात!

आणि... त्यातलेच काही जण जगाची नजर चुकवून तिथे जातात...

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग २२

Submitted by बेफ़िकीर on 29 May, 2010 - 01:17

हाफ राईस दाल मारकेचा एच आर डी एम्'चा हा सेकंड लास्ट भाग आहे. मायबोलीच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा मी शतशः ऋणी आहे. सर्व वाचक, प्रतिसादक व सुचवणी करणारे मित्र.. यांच्या अतिशय प्रेमळ प्रोत्साहनाशिवाय मला काहीही जमले नसते. त्यांचे आभार मानणे योग्य नाही. '-बेफिकीर'!

=================================================

आणि त्याचवेळेस वडाळी भुईला चांदवडच्या पुढार्‍याचा मुलगा असरार समीरच्या ढाब्यावर आपल्या पाच दाणगट मित्रांबरोबर पीत बसलेला होता अन त्याच्या भोवती विजू, विशाल आणि समीरने कोंडाळे केलेले होते.

विजू - और टेकडीपे जाके सो रहे एकदुसरेके साथ..

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः भाग २१

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2010 - 05:35

नाशिकच्या हॉस्पीटलमधे पंधरा दिवस अबू अन बावीस दिवस चाचाची सर्वांनी अत्यंत मनापासून सेवा केली. सर्वच जण नाशिकला सतत येऊन जाऊन होते. वैशालीची सासू, अंजना अन झिल्या हे कायमस्वरुपी वास्तव्यास होते चाचाच्या घरी! नाशिकमधेही चाचा सुपर लोकप्रिय होता. अमितला हा धक्काच होता की बाबा अन अबूकाकाचे भांडण झाले. त्याने स्पष्ट सांगून टाकले की काजलशी लग्न वगैरे करून तो उगाचच दिपूला दुखावणार नव्हता अन अबूचाचा जे म्हणत होता ते बाबांनी ऐकायला हवे होते.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग २०

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2010 - 23:56

दिपू कसा जाणार? आं? दिपू जाणार कसा?

दीपक अण्णू वाठारे यांच्या बरोबर जर दैत्य अबूबकरही निघाले आहेत ही कल्पना चाचाने ढाब्यावर मांडली असती...

रांगेने प्रदीप डांगेपासून ते साखरूपर्यंत एकजात सगळे आपापले सामान घेऊन चाचासमोर किल्ल्या घेऊन आले असते.

अन मग...

राम रहीम ढाबा... चालला कसा असता?? अबू नाही, काशीनाथ नाही, दिपू नाही...

खाना बनवण्याचा ** (सर्वसाधारणपणे बोलला जाणारा शब्द) एकाला अनुभव नाही...

ऑर्डर्स कोण घेणार?

आणि...

समजा..... ऑर्डर्स घेतल्याच...

नाही.. सर्व्ह करायला चाचा, यशवंत, सीमा वगैरे होतेच ..

पण... त्या ऑर्डर्समुताबिक...

खाना कोण बनवणार??

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १९

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2010 - 06:20

या कादंबरीचे शेवटचे तीन ते चार भाग उरलेले आहेत. नक्की किती ते आत्ता तरी माहीत नाही. सर्व वाचकांच्या व प्रतिसादकांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापासून अनेक आभार!

-'बेफिकीर'!
----------------------------------------------------------------------------------

सर्वांदेखत गेटवरच खोदून खोदून सगळे विचारल्यावर सगळ्यांनाच एकदमच दिपू अन काजलची कहाणी केव्हापासून चालू आहे ते समजले होते. सगळे अवाकच झाले होते.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १८

Submitted by बेफ़िकीर on 25 May, 2010 - 05:58

पराकोटीच्या सावधपणे केलेल्या नेत्रपल्लवीमुळे दिपू अन काजलचे रहस्य अजून रहस्यच होते. संशय फक्त समीरला यायचा पण तो केव्हाच वडाळा भुईच्या एका ढाब्यावर कामाला लागलेला होता. बाकी रामरहीम ढाब्यावर दिपू सकाळी नऊ ते रात्री दहा किंवा दुपारी तीन ते पहाटे तीन असा कामाला असायचा.

ज्या ज्या वेळि यशवंतला रिलीव्ह करायला काजल चिवड्याच्या दुकानात यायची तेव्हा दिपू बाहेर चकरा मारायचा. पण बर्‍याचदा गल्ल्यावर पद्या असल्यामुळे काजलकडे बघण्याची हिम्मत व्हायची नाही. उगाच आपला जाऊन यायचा अन जमली तर एखादी नजर टाकायचा.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2010 - 03:49

प्रेयसीचा पहिलाच रुसवा! तो आपण काढायचा असतो हेही माहीत नव्हते दिपूला. त्याला इतकेच वाटत होते की ही अशी चमत्कारीकपणे का बोलतीय? पण तिच्याशी बोलायची संधीच मिळत नव्हती.

एक दिवस सगळे जण ढाब्यावर दैनंदिन लढाई करत असताना सीमाकाकू काही कामानिमित्त शिरवाडला गेली अन काजल घरात एकटीच आहे हे पाहून दिपूने तिच्या घरात प्रवेश केला.

काजल - क्या???
दिपू - कुछ नय..
काजल - तो इधर कैसे आगया?

दिपू मख्खपणे उभा राहिला.

काजल - काम नय हय? ढाबेपे?... ज्जा.. अबूचाचा बुलायेंगे..

ती लाजून किंवा थट्टा म्हणून 'ज्जा' म्हणत नाही आहे हे समजण्याइतका तो नक्कीच हुषार होता.

दिपू - तू..
काजल - क्या??

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १६

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2010 - 15:45

च्यायच्ची **! काय चाललंय काय?

इकडे दहा मिनिटे काजल दिसली नाही तर 'जिंदगी ब्येक्कार' वगैरे वाटते का 'लगती है' काहीतरी!

जमलं की पिक्चरचं हिंदी? आँ?

'मुहब्बत' का काहीतरी केल्यावर एकदम 'डायरेक' हिंदीच जमायला लागतं बहुतेक!

स्साला!

आणि... आणि..

तिकडे त्या अंजनाच्या डावीकडून बघितलं की ते काय म्हणतात ते..?? आं? काय म्हणतात??

हां! ....जवानी!.. बरोबर.. जवानी नजर येते का 'आती है' काहीतरी..

परवा झरीनाचाची काय म्हणाली? आंचलबी नय पहनती ठीकसे...

अरे तुमको क्या करनेका है च्यायला?? हमको देखनेदो ना?? तुम पहनो अपना आंचल का काय ते ठीकसे..

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2010 - 02:18

बराच पैसा खर्च करून चाचाने बाळ्याला पंधरा दिवसांनी सोडवून आणले. बाळूच्या मावस भावाची दुष्कीर्ती प्रामुख्याने सहाय्यकारक ठरली. तो गावात मवाली म्हणून प्रसिद्ध होता. बाळू सभ्य! मावशीने एकुलत्या एका बाळूला वाढवलेले असल्याने त्याला मावशीबद्दल फार वाटायचे. मावस भाऊ दोन वर्षांनी मोठा होता. तो लहानपणापासूनच बाळूवर वक्र दृष्टी ठेवून असायचा. त्याच्यामते बाळूच्या आई वडिलांनी मधेच मरून हे कार्टं कारण नसताना आपल्या उरावर घातलं होतं!

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 15 May, 2010 - 05:01

काजलची आजी ही एक अत्यंत तापट बाई होती हे काजलला माहीत असले तरी दिपूला तिने सांगीतलेच नव्हते. 'याचा कुठे तिच्याशी फारसा संबंध येणार आहे' या विचाराने काजल त्याला घेऊन घरात शिरली. आजी पांडुरंगाचे नाव घेत डोळे ताणून दाराकडे बघत होती. तोंडाला येईल ते बोलायची. सीमाकाकूला तिने प्रचंड छळले होते. पण ऐन उमेदीच्या काळात भलीभली संकटे आलेली असताना यशवंत अन त्याच्या भावाला तिने गावापासून कसे वाचवले अन कसे मोठे केले हे आठवले की यशवंत बायकोला सबुरीचा सल्ला द्यायचा. यशवंतची परिस्थिती बरी झाल्यावर त्याला गावात सन्मान मिळू लागला. मात्र त्याच्या आईकडे, काजलच्या आजीकडे कुणी फिरकायचेही नाही.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी