श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २४

Submitted by बेफ़िकीर on 1 September, 2010 - 02:50

आधीच ती एक षोडषा! त्यात सुंदर! त्यात आपल्याला आवडणारी! त्यात तिचा गाल तिच्याहूनही नाजूक! त्यात बसमधे अंधार! त्यात तिची परवानगी असणे! आणि त्यात आपण तिच्या गालावर किस करणे...

दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पाणीही प्यायला नाही महेश!

न जाणो ओठांवर असलेले पुसट फीलिंग जायचे निघून!

त्याच्यासाठी आता जग अत्यंत सुंदर झालेले होते आणि दास्ताने वाडा हे नंदनवन!

त्या पहिल्या किसची जरा नीट आठवण वगैरे काढावी म्हणून तो चक्क एकटाच फिरायला बिरायला गेला पहाटेच! शनिवार वाडा, कसबा पेठ, लाल महाल वगैरे रपेट करून परत आला.

आपण आता खूप मोठा माणूस झालेलो आहोत याबद्दल त्याच्या मनात दुमत नव्हते. ज्या अर्थी नैनासारखी मुलगी तिच्या गालाचा किस घेऊ देते त्या अर्थी आपण नुसतेच मोठे नाही आहोत तर आपण बर्‍यापैकी राजबिंडे वगैरे असणार!

मग त्याने त्या चुंबनावर बराच विचार केला. नेमके कसे वाटले होते आपल्याला? मग त्याला एकेक आठवू लागले. फारच अविस्मरणीय क्षण होता तो! क्षण कसला? क्षणार्ध! ओठ मुद्दाम लावले की चुकून लागले असे वाटावे इतक्या कमी वेळात ती क्रिया पार पडलेली होती.

सागरमधे ऋषी कपूरने तो मोठा किस घेताना अन त्याचे ६८ रिटेक्स करताना..... कसं सोसलं असेल? फार निरागस प्रश्न पडला महेशला!

मुलींच एक बरं असतं! एक आपलं सुंदर दिसलं की झालं! बाकी पुढचं मग फिदा झालेला माणूस करतोच!

महेश सकाळ ऑफीसपर्यंत आलेला होता. कालचा दिवस आयुष्यात इनसर्ट केल्याबद्दल दक्षिणाभिमुखी मारुतीचे फॉर्मल आभार मानत तो हरिहरेश्वरावरून वाड्यात आला.

आज तो कॉलेजला जाणारच नव्हता. कारण आजचे तीन पिरियड्स ऑफ होते. आणि एकही प्रॅक्टिकल किंवा वर्कशॉप नव्हता. बाबा ऑफीसला निघून गेल्यावर महेशने खिडकीतून खाली पाहिले. नैना कॉलेजला गेलेली असणार होती. आता या वाड्यात काय मजा राहिलीय असे वाटून पुन्हा फिरून यावे किंवा एखाद्या मित्राकडे जाऊन यावे असे त्याला वाटू लागले. तेवढ्यात त्याची नजर माळ्याकडे गेली. उगाचच त्याने माळ्यावरच्या सर्व पिशव्या अन दोन बॅग्ज खाली काढल्या. मधेच पवार आजी येऊन ' काय चाललंय रे तुझं' असं म्हणून 'माझ लक्ष आहे' हे दाखवून गेल्या.

पहिल्याच बॅगमधे महेशला खूपशा साड्या अन आई बाबांच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळाले. हे फोटो त्याला श्रीने पुर्वीही दाखवले होते. पण आज बर्‍याच दिवसांनी पुन्हा पाहताना बरे वाटले.

ही आपली आई! हिच्या उदरातून आपण जन्माला आलो. आपल्याला म्हणे तिने सेकंदभर जवळ घेतले होते तेवढेच! निदान तिने बघितले तरी आपल्याकडे! आपल्याला नाही बघता आले तिच्याकडे! कधीच...

महेश आईच्या फोटोवरून हात फिरवत होता. आपल्या आई बाबांच्या लग्नात आजी कशी दिसत नाही? तारा मावशी केवढीशी होती तेव्हा! उषाआत्याही तरुण दिसत होती. बाबांना किती भरपूर केस होते. आता बाबा किंचित वाकल्यासारखे चालतात, दमतात, तेव्हा किती मस्त दिसत होते.

दुसर्‍या बॅगमधे अनेक कागदपत्रे, वाड्यातील आपल्या खोलीच्या संदर्भातील काही कागद, पावत्या, महेशची जुनी प्रगतीपुस्तके, जन्माचा दाखला, आईच्या मृत्यूचा दाखला, असे बरेच काय काय होते. महेशने सर्व कागद कधी ना कधी पाहिलेलेच होते. मात्र एका पिवळ्या रंगाच्या छोट्या कागदी पाकिटावर त्याची नजर गेली. हे पाकीट त्याने कधीच पाहिलेले नव्हते. बरेच जुनाट वाटत होते.

त्या पाकीटात निघाली एक जुनाट डायरी! होती १९७१ सालची! पण १९७७ पर्यंतच्या नोंदी खरडलेल्या दिसत होत्या. तारखेप्रमाणे काहीच लिखाण नव्हते. वाटेल तेव्हा असेल ती तारीख टाकून जे लिहायचे ते लिहिलेले होते. बाबांची जुनी डायरी होती ती!

-गट्टू आज उभा राहिला.... मावशींनी पेढे वाटले... सगळा वाडा जमा झाला होता...

- गट्टू बुदूककन पडतो अन स्वतःच हासतो. बाऊ होईल म्हंटले की 'हॉ' करून घाबरल्याचे नाटक करतो. रमा, तू गट्टूला ठेवून गेलीस... पण... मला आई होणे अवघड आहे गं... एक बाप होता होताच मला आपले काही चुकेल की काय असे वाटत आहे...

- टकमक चिमण्यांकडे बघणे गट्टूला आवडते. आज सप्रेंनी पुन्हा फायर केले... काय करणार.. आईविना असलेले इतके लहान मूल म्हंटल्यावर... उशीर होणारच की... गट्टू हसरा आहे.. अगदिच भूक लागली तरच रडतो...

- आज गट्टूला लाल रंगाची लाकडी डबलडेकर आणली. तो, समीर अन राजश्री बराच वेळ ती खेळत होते. गट्टूला बस आवडली असावी. आजवय विविध कारणांनी त्याला कुणी ना कुणी काही ना काही आणून द्यायचे. स्वतःहून, स्वतःच्या पैशांनी त्याला मी आणलेले हे पहिले खरेखुरे खेळणे! ही डबलडेकर हातात घेतली मला गट्टूला मांडीत घेतल्यासारखे वाटते...

- ताराची नागपूरला बदली झाली. रमा, तिच्या रुपाने गट्टूला आईचे थोडेसे तरी प्रेम मिळते... आणि उषाताईच्याही रुपाने... पवार मावशींना पाहिलंस का तू? गट्टू झाल्यापासून त्यांच्यात आमुलाग्र बदल झालेला आहे... माझ्याकडे येत नाही अशी झोप गट्टूला मावशींच्या कडेवर बसला की लागते.

- रमा, गट्टूला खूप खूप मोठा करणार आहे मी.. इंजिनीयर करणार.. वाट्टेल तितक्या नोकर्‍या करेन..कर्जे काढेन.. पण.. तुझ्या अन माझ्या प्रेमाचे हे जे प्रतीक आहे ते डौलाने राहील या जगात...

- आज राजश्री गट्टूचे बोट हातात धरून त्याला आपल्या घरी खाऊ खायला घेऊन जाताना दोघे किती गोंडस दिसत होते... आज मावशी चितळे आजोबांना खूप बोलल्या...

- रमा, गट्टू तुझ्यासारखा दिसू लागला आहे... आज मला ऑफिसमधे भयंकर प्रेशर आले होते.. प्रचंड फायरिंग मिळाले.. गट्टूला ताप आल्यासारखे वाटले म्हणून सप्रेंना फोन न करताच मी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो काल... दिवसभर त्याला मांडीत घेऊन खेळवत होतो.. त्यावेळेस कल्पना नव्हती... पण आज ऑफीसमधे पोचल्यावर सप्रेंनी सर्वांसमोर अतिशय अपमान केला.. रमा.. तू खरच हवी होतीस गं!

- .. चांगले दहा दात आहेत बरका गट्टूच्या तोंडात! रमा.. तुला आश्चर्य वाटेल.. पण शप्पथ! अगं आज मी पोळ्या करायला शिकलो... तू किती छान पोळ्या करायचीस.. खूप आठवण झाली मला.. तुझ्या हातातल्या बांगड्या किती छान वाजायच्या पोळ्या लाटताना... आणि तव्यावरची गरम गरम पोळी माझ्या पानात वाढताना मला भूक भागली असली तरी खातच राहावेसे वाटायचे.. पण आता काय त्याचं? आता तू फक्त फोटोमधून बघणार... कणीक भिजवण्यापासून पोळी भाजेपर्यंत किती प्रकार असतात गं? आणि त्यात परत प्रत्येक गोष्टीचे प्रमाण ठरलेले.. कधी पाणीच जास्त झालं तर कधी पीठच! केल्या पण कशाबशा! आकार काय गोल जमेना.. मग त्याच्यातच प्रकार करून गट्टूला सांगीतले.. हा बघ जोकराचा चेहरा.. हा दास्ताने वाड्याचा आकार! गंमत गंमत करायची आपली आपणच! काय? गट्टू सोडला तर आहे काय माझ्या आयुष्यात आता? हळुहळु येतील पोळ्या करता.. काळजी करू नकोस..

- आज कुस्ती कुस्ती खेळताना गट्टूने चुकून साणशीच मारली माझ्या चेहर्‍यावर... हा एवढा मोठा काळा निळा गोल आलाय गालावर... दाणगट आहे तुझा मुलगा.. पण त्यालाच भीती वाटली 'बाऊ झाला' म्हणून.. विशेष काही नाही गं! आपण रोज गप्पा मारतो म्हणून तुला सांगीतलं इतकंच.. हे काय.. हळद लावली आहे.. होईल बरे उद्यापर्यंत... पण कुस्ती मात्र रोज रंगते बर का आमची..

- गट्टू आता नुसता धावत सुटतो रमा.. दमछाक होते त्याला पकडून आणताना.. आज मला ताप आला होता.. पण कामावर जायलाच हवं होतं..

- आज शर्ट आणला त्याला नवीन.. इन्क्रिमेंट झालंय..

- सर्कस कशी गं परवडेल रमा आपल्याला? तूच सांग... तुटपुंजा पगार... पण मनातून वाटतं.. गट्टूला लगेच सर्कसला घेऊन जाव... घरातल्या घरात सर्कस खेळल्यामुळे आलेली चक्कर होती ती.. तू काळजी करू नकोस... पण समीरने त्याला शेवटी सांगीतलंच... तू अन तुझे बाबा खेळलात ती सर्कस खोटी खोटी होती.. खर सर्कस खूप मस्त असते... असूदेत... आपल्याला परवडेल तेच करावं माणसाने...

- रमा.. एक तुला सांगीतलंच नाही मी आजवर... मी गट्टूला आजपर्यंत साधा धपाटाही मारलेला नाही बर का? ओरडलो तरी तेवढ्यापुरते.. त्याच्याच चांगल्यासाठी...

- आज मजाच झाली.. मी गॅसपाशी पोळ्या करत असताना साहेब स्टूल घेऊन शेजारी उभे राहिले अन म्हणाले.. "मी मोठा झालो की तुम्हाला जेवण करून वाढत जाईन".. काय आनंद झाला सांगू रमा तुला.. मुलांनी आपली काळजी घेणं यात किती सुख असतं गं.. नुसता मुलगा तसे बोलला तरी समाधान वाटतं...

- रमा... गट्टू बालवाडीत जायला लागला आजपासून.. वाईट वाटतं ग सोडताना ... कसं होईल त्याचं माहीत नाही.. पण साने आजी प्रेमळ आहेत... वाड्यात कोण कौतूक झालं गट्टूचं शाळेचा पहिला दिवस म्हणून.. माझ्या कडेवर बसूनच जिना उतरला तो.. पण नंतर खाली उतरला.. मानेकाकाम्नी गोळी दिली, मावशींनी लाडू, सगळ्यांनि काही ना काही दिलं... एक वोटरबॅग अन एक छोटा टिफीन मीही घेतलाय बर का त्याला.. सगळ्या वाड्याने वाढवलेला मुलगा आहे आपला.. भरपूर श्रीमंत आहे तो पालन पोषणाच्या बाबतीत.. ... पण... आई मात्र... नाही आहे त्याला...

- आज मात्र मारलं मी रमा त्याला.. त्या रागिणीचे दहा पैसे सरळ घालवले त्याने.. मुलांना वेळीच ताकीद दिली नाही तर बिघडतात.. म्हणून.. रागवू नकोस.. मी माझ्या हाताला चटका लावून घेतला आहे तो झोपल्यावर.. एवढ्याश्या मुलाला मारणारा माझा हात म्हणून.. हं?

- रमा... आजही मार खाल्ला त्याने... सरळ दहा पैशांचे पेरू घेतले अन मित्रांबरोबर खाल्ले.. रक्त आठवून पैसा पैसा जमवतोय गं मी... ऑफीसला जाताना कित्येकदा माझ्या खिशात पाच पैसेही नसतात.. तुला माहीतच आहे.. अन ह्याने उडवले पैसे.. रमा... तारा आलीय.. सुमेधला घेऊन..

- माफ कर रमा... दहा पैशाचं नाणं गट्टूच्या मागच्या खिशात सापडलं.. मी खूप वेळा डोकं आपटून घेतलं माझं भिंतीवर.. कसा हात उचलला गं मी त्याच्यावर?.. आज.. पुन्हा एक मोठा चटका लावून घेतलाय मी... माझा मुलगा चोर होऊ नये म्हणून हे सगळं करायला गेलो तर?.. तो चोर नाहीच... माझीच चूक झाली...

- ट्रीपला गेलाय आज... सकाळीच... होते थोडे पैसे वेगळे ठेवलेले.. ते काल भरून आलो शाळेत वर्गणी म्हणून..

- काल रात्री.. प्र... (ही नोंद काही महेशला समजली नाही.)

- रमा.. चितळे आजोबा गेले.. चटका लावून गेले गं.. गेले आजोबा...

महेशला ती डायरी वाचताना हमसून हमसून रडावेसे वाटत होते.

काय आहोत आपण? दोन माणसांनी एकमेकांवर केलेल्या प्रेमाचे फक्त एक प्रतीक? ज्यातील एक माणूस मरून गेला अन दुसरा ते प्रतीक अधिकाधिक यशस्वी व सुखी व्हावे यासाठी रक्त आटवतोय.. आहोत काय आपण? आपण स्वतःचा किती विचार करतो.. बाबा स्वतःचा किती विचार करतात.. आपण त्यांचा किती विचार करतो.. अन ते आपल्यासाठी .. फक्त आपल्यासाठी, आपण आहोत म्हणून अन आपल्यामुळे जगत आहेत.. बाकी त्यांच्या दृष्टीने जगण्याचे काही कारणच नाही...

आई आणि बाबांचे असे एक खास विश्व होते. त्यात आपण नव्हतोच! कधीच, मुळीच नव्हतो. त्यांच्या विश्वात आपण आलो ते त्यांच्या असीम प्रेमामुळे.. आणि मग? मग आपल्यासाठी आणि त्यांच्याहीसाठी... आपण हेच सर्वस्व बनून राहिलो.. जे काय आपण करतो ते आपल्यासाठी... आणि ते जे काय करतात.. तेही आपल्याच साठी...

महेशने स्टूल अन गॅसच्या शेगडीकडे वळून पाहिले. या स्टूलावर उभे राहून गॅसवर ठेवलेल्या तव्याकडे पाहण्याइतक्या उंचीचे होतो आपण.. तेव्हाही बाबाच पोळ्या करायचे.. आपल्या तोंडात दात आले तेव्हापासून बाबा पोळ्या करतायत.. परवा त्यांचे दोन दात काढावे लागले.. तरी आजही तेच पोळ्या करतायत..

काय आहोत आपण?

रमाच्या मृत्यूचा दाखला व त्या सोबत असलेली इतर कागदपत्रे महेशने पुन्हा काळजीपुर्वक वाचली.

बाळंतपणाच्या वेळेस मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरांना आईच्या जीवावर पाणी सोडावे लागले होते.

आपल्यामुळे... आपली आई आपल्यामुळे गेली.. आपण झालोच नसतो तर.. आजही बाबांना पोळ्या करून देत असती ती..

आपण नसतोच तर... हीच खोली.. एखाद्या स्वर्गासारखी असती.. जिथे आता फक्त आपला 'आयुष्य अधिकाधिक चांगले जगण्याचा' मोह अन त्यासाठी बाबांची अविरत धडपड आहे.. ती ही खोली स्वर्गासारखी असती..

का करतात बाबा हे सगळे? त्यांची लाडकी रमा माझ्यामुळे गेलेलि असूनही माझ्यासाठी का झटतायत ते??

का???

कदाचित... 'एक बाप' झाल्याशिवाय आपल्याला ते कधीच समजायचे नाही...

रागिणी कुलकर्णीच्या दहा पैशांमुळे सलग दोन दिवस खावा लागलेला मार महेशला आजही आठवला. चटका? बाबांच्या हातावर त्या भाजल्याच्या खुणा होत्या त्या.. कंपनीत यंत्रापाशी झालेल्या अपघातामुळे नव्हत्याच?? बाबांनी स्वतःचा हात जाळून घेतला होता??

महेशने हळूच ती जुनी डायरी बाजूला ठेवली. डायरीत पुढे काहीच का लिहीले नसावे यावर तो विचार करत होता.

पुढे आहे काय लिहीण्यासारखे? आपण तर नववीत चोर्‍या करायला लागलो. आटापिटा करून अन 'मेलेल्या आईला दररोजची कथा डायरीतून सांगून' आपण चोर होऊ नये म्हणून झगडणार्‍या आपल्या बाबांना आपण चोर्‍या करूनच दाखवल्या. अगदी हुकुमी चोर्‍या! काय लिहीणार ते डायरीत?

आपण पहिल्यांदा उभे राहिलो.. तेव्हा.. सगळा वाडा आला होता बघायला??

महेशने गुडघ्यात मान घातली अन तो खरोखरच रडला.

थोड्या वेळाने इकडे तिकडे पाहिल्यावर एका जुन्या पिशवीत त्याला ती डबलडेकर दिसली. ती मोडली नव्हती. फक्त चाके झिजलेली होती केव्हाच! तिच्या स्पर्शातून आज महेशलाही जुना काळ आठवला.. नेमके आपण ही बस खेळल्याचे जरी त्याला आठवत नसले तरी खूप धुसर धुसर असे काहीतरी आठवत होते... ही बस आपण अन समीरदाद खेळायचि इतकेच...

इतर पिशव्यांमधे महेशचेच लहानपणीचे कपडे होते. अगदू दुपट्यापासून सगळे...

हे सगळे कपडे कोण आणायचं आपल्याला? नक्कीच.. नक्कीच वाड्यातील सगळे अन तारामावशी अन उषाआत्या..

काल रात्री 'प्र' म्हणजे काय? बाबांनी ते काय लिहीलंय??

राजश्रीताई आपल्याला खाऊ द्यायला म्हणून घरी घेऊन जायची.. आपण काय विचारपुस करतो तिची??

हे चिमणाळं, ही बाहुली, ही भातुकली, ही सापशिडी, हे बुद्धीबळ, हे जुने पत्ते... आणि....

..... आणि हा मेकॅनो...

किती त्रास दिला आपण या सगळ्या वस्तूंसाठी बाबांना.. ज्यांच्या खिशात ऑफिसला जाताना चहापुरते पाच पैसेही नसायचे त्यांना... आणि आपण? आप्ण पैसे चोरून क्रीम रोल अन समोसा खायचो.. थ्रील प्यायचो... वाढदिवसाला आपल्यासाठी जुन्याची नवीन केलेली सायकल आणताना... बाबांनी कर्ज काढले होते.. ती सायकल आपण नवीन सायकल मिळताच हातातून तशीच्या तशी फेकून दिली... बाबा ती सायकल अजून वापरतात.. दमतात.. त्यांची तीन बोटे चिरडली गेली.. आणि आपण रात्री येऊन खायला काय आहे हे त्यांनाच विचारतोय..

बाप! ... बाप आहेत आपले बाबा बाप! बाकी काही नाही...

अत्यंत विमनस्क मनस्थितीत महेश घरातून गॅलरीत आला.. डोळ्यांमधून सांडलेले अन गालावर वाळलेले पाणी तसेच होते...

हे आजीचं घर! कोणत्या हक्काने आपण इथे आत जातो अन डबे धुंडाळतो? वाटेल ते बोलतो, टी.व्ही. बघतो.. कोणत्या हक्काने?

खटकन मान फिरवली महेशने! मान फिरवल्यावर उलट दिशेला गेली अन नैना दिसली. तिचे त्याच्याकडे लक्षच नव्हते.

मात्र या क्षणी नैनाला पाहून महेशला काहीही वाटले नाही. तो सरळ वाड्यातून बाहेर पडला.. पाय नेतील तिकडे चालू लागला..

या नैनाला डबलसीट घेऊन जाताना आपण पडलो अन चार दिवस.. चार दिवस बाबांनी काय नाही केलं आपल्यासाठी...

एकवीसशे रुपये कसे दिले असतील बाबांनी? जे बाबा आपल्याला दहा पैशावरून मारतात त्यांनी त्यावेळेस एकवीसशे रुपये कसे दिले असतील...

महेश चालत चालत निघालेला होता.. आपण कुठे चाललो आहोत.. का चाललो आहोत हेही त्याला समजत नव्हते...

तब्बल चाळीस मिनिटे तो चालत होता.. आणि.. आत्ता त्याला आपल्या चालण्यातील उद्देश स्वतःचा स्वतःलाच जाणवला..

तो बाबांच्या आठवणींनी व्याकुळ होऊन...

... किर्लोस्कर ऑइल इन्जिनच्या गेटसमोर येऊन थांबला होता..

सिक्युरिटीने विचारले..

"कौ चाहिये?"
"अं? नही.. ऐसेही..."
" कोई रिलेटिव्ह है क्या अंदर?"
"पिताजी.. है"
"नाम?"
"श्रीनिवास पेंढारकर"
"अरे? उनका लडका क्या तू? ठहर मै फोन लगाता हूं"..

पाचच मिनिटात धावत श्री गेटवर आला..

त्याला भीती वाटली होती कीहा अचानक इथे असा काय आला?

श्री - काय रे?

गेल्या दिड तासात वाचलेली डायरी, जुनी खेळणी, चोर्‍या, खाल्लेला मार, बाबांनी स्वतःला लावून घेतलेले चटके, हप्त्यांवर आणलेली सायकल, बाबांना दम लागणे आणि... सगळे सगळे ... केवळ एका क्षणात महेशला आठवले.. अन खळ्ळकन त्याच्या डोळ्यातून सरी ओघळल्या..

महेश - आजपासून.. रात्रीचा स्वयंपाक मी करत जाईन बाबा..

एक वाक्य कसंबसं तोंडातून बाहेर पडलं अन दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा लपवून रडू लागला महेश!

श्रीने त्याला थोपटले. हळूहळू सगळा प्रकार लक्षात आला. आता श्री त्याला आत घेऊन आला. कॅन्टीनला कूपन घेऊन जेवायला घातले. पेंढारकरांचा मुलगा अगदी वडिलांसारखाच दिसतो असे कित्येक लोक कौतुकाने म्हणून गेले.

मग श्रीने त्याला डिपार्टमेंटला नेले. सप्रे, चिटणीस, कोपरकर अन स्वाती मावशीला महेशने वाकून नमस्कार केला. सप्रेंनी त्याला 'इफ यू कंप्लीट डिग्री इन इंजिनीयरिंग आय शॅल टेक यू हिअर अ‍ॅज सिनियर इंजिनयर, ऑल द बेस्ट यंग मॅन' म्हणून पाठ थोपटली होती.

रिसेप्शनमधे आणखीन काही काळ बसल्यावर साडे चार वाजले अन मग दोघेही घरी आले.

आज आयुष्यात पहिल्यांदाच..

महेश श्रीनिवास पेंढारकर यांनी आपल्या बापाला स्वयंपाकात मदत केली.. हे अभूतपुर्व दृष्य पाहायला मावशीसुद्धा येऊन गेल्या...

========================================

"आय लव्ह यू नैना"

आठ महिने झाले पण नैनाच्या कानातून तो आवाज जातच नव्हता. मनोमन ती कधीच महेशची झालेली होती. अकरावीच्या वार्षिक परिक्षेतील तिचे लक्ष थोडेसे उडालेलेच होते.

हाफ राईसच्या काजलसारखी ती असामान्य सुंदर नसली तरीही नीटस, गोड व बोलका चेहरा असलेली अन तारुण्याचा उंबरठा नुकताच ओलांडलेली असल्याने शीलाकाकू तिला आता खूपच जपायची.

ती काय करते, कशी वागते यावर शीलाकाकूचे सतत व नीट लक्ष असायचे. मुलीबाबत आई अत्यंत सचिंत असतेच! त्याच प्रत्येक स्टेजमधून आपणही गेलेलो असल्याने तर ती अधिकच व्यवस्थित लक्ष ठेवू शकते.

गेल्या काही दिवसांपासून नैना हरवल्या हरवल्यासारखी वाटत होती अधूनमधून! खरे तर सहलीनंतर तब्बल आठ महिने महेश अन ती कुठे भेटलेलेही नव्हते. जमेल तेव्हा आपापल्या खोलीतून एकमेकांकडे चोरून पाहाणे यापुढे काहीच झालेले नव्हते. पण मनाने नैना केव्हाच महेशची झालेली होती. आणि महेशही तिचा!

या सर्व विचारांचा प्रभाव आता नैनाच्या वागण्यावर हळूहळू दिसू लागला होता. राजश्री किंवा इतर मैत्रिणींबरोबर होणार्‍या तिच्या गप्पांमधे आता कॉलेजमधील प्रेमप्रकरणांचे उल्लेख शीलाला ऐकू येऊ लागले होते. हसणे, खिदळणे वाढले होते. बरेचदा घरात बसून राहणारी नैना आता सायंकाळी फिरायला जाऊ लागली होती मैत्रिणींबरोबर! तिचे आरशात पाहणे, विविध प्रसाधनांची मागणी करणे, पोषाखाबाबत अ‍ॅलर्ट असणे यात शीलाला काहीतरी समजत नक्कीच होते. पण काय ते अजून स्पष्ट नव्हते. वाड्यातील कोणताही मुलगा नैनाला आवडणे शक्य नाही याची तिला खात्री होती. शीला आता नैनाला वारंवार 'अभ्यास कर, सारखी काय फिरायला जातेस, किती वेळ गेली होतीस, कुठे गेली होतीस, मैत्रेयीच्या घरी तिचा भाऊ पण असतो का' असे प्रश्न विचारून भंडावून सोडायला लागली. नैनाला त्याचा वैताग येत होता.

त्यातच शीलाने नैनाला स्वयंपाकातील सगळे शिकवायचा उपक्रम सुरू केला. उद्या सासरी गेलीस की सुगरण आहेस की नाहीस यावर संसाराचे सुख अवलंबून असते.

'सासरी म्हणजे काय? समोर तर राहणार आहे मी...'

नैनाच्या मनात आलेला हा खोडकर विचार बोलून दाखवणे तिला आत्ता शक्य नव्हतेच! पण ओठांच्या कोपर्‍यातच मंदसे हसून ती लाजली.

पण त्या निमित्ताने तिला आता सर्व स्वयंपाक आणि बरेच इतर पदार्थ करता येऊ लागले.

अकरावीचे वर्ष एकदाचे पार पडले. नैनाला ७७ % मिळाले तर महेश या वेळेस वर्गात सातवा आला. आता त्याच्याबाबतीत सगळ्यांनाच आदर वाटत होता वर्गात! पहिल्या वर्षी ए.टी.के.टी. मिळवून पास होणारा हा मुलगा या वर्षी चक्क वर्गात सातवा? श्रीनेही सगळ्या वाड्याला चहा पाजला. पाजला म्हणजे केला प्रमिलावहिनींनीच, फक्त दूध श्रीने आणले होते. तिकडे समीर दिवसेंदिवस मस्तवाल आणि उंडारणारा होऊ लागला होता. दास्ताने वाड्यातील प्रत्येकच ज्येष्ठ माणूस आपल्या आई वडिलांप्रमाणेच असल्याचे संस्कार लहानपणापासून झाल्याने वाड्यात तो खोडकरपणे वागायचा नाही. मात्र एकदा कॉलेजला जायला म्हणून बाहेर पडला की शिट्या मारणे, सिगारेट ओढणे वगैरे प्रकार चालू व्हायचे. आश्चर्यकारकरीत्या त्याला मार्क्स बरे पडत होते. तो बी.ए.च्या तिसर्‍या वर्षाला गेला अन महेश डिप्लोमाच्या तिसर्‍या! हे वर्ष महत्वाचं होतं! राजश्रीताई आता ग्रॅज्युएशनच्या दुसर्‍या वर्षाला होती. मात्र सर्वात महत्वाचं वर्ष होतं महेश अन नैनासाठी!

आणि.. ते नुसतंच अभ्यासाच्या दृष्टीने नाही.. तर लव्हस्टोरी पुढे न्यायच्या दृष्टीनेही..

कारण दोन चार दिवसातच अशी परिस्थिती उद्भवली की शीलाकाकू अन राजाकाका या दोघांनाही चार दिवसांसाठी बेळगावला एका लग्नाला जायची वेळ आली. न्यायचे तर नैनालाही होते. पण नेमकी तेव्हाच तिची पहिली चाचणी परिक्षा आल्यामुळे शीलाने अत्यंत विचारपुर्वक बेरी काकूंना 'नैनाला तुमच्याकडे ठेवू का' असे विचारले अन त्या हो म्हणाल्या...

तुमच्याकडे ठेवू का म्हणजे नैना बेरींच्या घरी राहणार नव्हतीच! फक्त झोपण्यापुरती तिथे! बाकी घरीच! पण एकट्या नैनाकडे आता प्रमिला अन सगळाच दास्ताने वाडा लक्ष ठेवणार होता. चाचणी परिक्षा सकाळी दहा ते बारा होती. दुसर्‍या दिवशी नैना एक वाजता घरी आली अन प्रमिलाकाकू, नंदा आत्या आणि बेरी काकूंना हाक मारून सांगीतले की 'मी आलेले आहे'.

नेमका वरून गॅलरीतून महेशने हा प्रकार पाहिला. तो घरी होता. ही 'मी आल्याचे' इतक्या जणांना का ओरडून सांगत असावी ते त्याला समजेना!

महेश - आजी? नैना यडचाप आहे का गं?

आजीला प्रश्न विचारून माहिती काढायलाच हवी होती.

मावशी - का?
महेश - मी आले, मी आले म्हणून वाड्यात सगळीकडे ओरडत फिरतीय..
मावशी - एकटीय नं ती! त्यामुळे..
महेश - का?
मावशी - आई बाबा बेळगावला गेलेत.. बेरीण बाई तिचं बघतीय सगळं..

अरे तिच्यायला! असंय होय???

महेशमधला प्रेमवीर जागा झाला.

नैना प्रमिलाकडे जेवत होती. जेवण झाल्यावर 'अभ्यासाला बसते' असे म्हणून ती बाहेर आली अन वर उभ्या असलेल्या महेशकडे हसत पाहून स्वत:च्या घरात गेली.

दुपारचे ऊन भलतेच चढले होते. वामकुक्षीचा मूड दास्ताने वाड्याच्या भिंतींनाही होता. महेश पटकन आपल्या खोलीत येऊन खिडकीत उभा राहिला. पाहिले तर नैना तिच्या खिडकीतून त्याच्याचकडे पाहात होती. आयुष्यातला पहिला 'डोळा मारण्याचा' प्रयत्न महेशने केला. ती तिकडे खळखळून हासली पण हासण्याचा आवाज होऊ दिला नाही. 'मी येऊ का' असा प्रश्न महेशने खुणेनेच विचारल्यावर 'आला लाडात' अशा अर्थाची खूण तिने केली. मग महेशने फुरंगटून बसण्याची अ‍ॅक्शन केली. आता नैना अधिकच हसू लागली. अंगठा दाखवून तिने 'पचका पचका' अशी खूण केली. महेशने रागारागाने धाडकन स्वतःची खिडकी बंद केली. तब्बल दोन ते तीन मिनिटांनी त्याने पुन्हा खिडकी किलकिली करून पाहिले तेव्हा खिडकी अर्धवट उघडून तो पाहात आहे हे कळल्यामुळे नैना परत हसू लागली. आता महेशला फारच राग आला. हिच्याकडे आता बघायचंच नाही म्हणून तो आत येऊन बसला. जरा वेळाने अगदी बाहेरचे कपडे वगैरे घालून खोलीला कुलूप लावत आजीला जोरात 'जरा बाहेर जाऊन येतो गं' असे सांगून निघाला. नैना आपल्याकडे पाहात आहे हे त्याला माहीत होते. पण आता त्याला तिचा राग आलेला होता. तो सरळ जिना उतरून नैनाच्या घरावरून वाड्याच्या बाहेरच पडला. नैनाच्या खोलीची एक खिडकी रस्त्यावर उघडायची! त्या खिडकीतूनही नैना पाहात आहे असे त्याने आपले वाटून घेतले.

तो दिवस तसाच गेला. दुसर्‍या दिवशी महेशने मुद्दाम कॉलेजला दांडी मारलेली होती. आता उद्या शीलाकाकू अन राजाकाका येणार! संपली सुट्टी म्हणून महेश भयंकर रागावला नैनावर! यापुढे तिच्याशी बोलायचेच नाही असे त्याने ठरवले. एकमेकांच्या 'मुहब्बतीचा आणखीन एकदा इजहार' करण्याची सुवर्णसंधी नैनामुळे दवडली गेल्याचे घोर दु:ख त्याला होत होते.

तर खालून नैनाचा आवाज...

"पमाकाकू, माझी परिक्षा संपलीय.. मी आज झोपणार आहे जरा... "

प्रमिलाकाकूने "बर" म्हंटलेलेही महेशने ऐकले. तो गॅलरीतच उभा होता.

नैना स्वतःच्या घराकडे गेली. दार उघडून आत प्रवेश करण्यापुर्वी तिने मान वळवून वर उभ्या असलेल्या महेशकडे पाहिले.. दार न लावताच ती त्याच्याकडे बघत मंद हसत आत गेली...

ना तुने सिग्नल देखा.. ना मैने सिग्नल देखा... अ‍ॅक्सीडेन्ट होगया रब्बा रब्बा...

इकडे तिकडे बघत महेश श्रीनिवास पेंढारकर हळूच जिना उतरून खाली आले. तेवढ्यात नंदाआत्या आली अन एक साडी वाळत टाकून निघून गेली. तिने महेशला पाहिलेले असले तरी तो जिन्यापाशी उभा असल्याने तिला त्यात काहीच वाटले नाही.

आता कुणीच आसपास नव्हते. जणू वाड्याच्या बाहेर चाललेलो आहे असे दाखवत महेश अगदी सहज चालल्यासारखा चालू लागला. नैनाच्या दरवाजापाशी येताच त्याने खिशात हात घालून काहीतरी आठवल्यासारखा अभिनय करत परत एकदा सगळ्या वाड्याकदे पाहिले.

सामसूम!

गेले आत साहेब! दार उघडंच होतं...

आणि आतमध्ये... पलीकडच्या खोलीत...

नैना!

महेशने सरळ दार आतून लावून टाकले. तिने हात तोंडावर ठेवून दचकल्याचा अभिनय केला. आणि महेश वादळी वेगात तिच्याकडे धावला.

ज्या आवेगात त्याने तिला मिठी मारली... नैनाचे नाव लैला अन महेशचे मजनू ठेवावेसे वाटले असते बघणार्‍याला...

नैना गुदमरत होती. हळूहळू तिचेही हात महेशच्या पाठीत रुतले. आपले हे वय नाही, आपल्यावर संस्कार काय आहेत, कशाचेही भान नसल्यासारखे दोघे वागत होते. मात्र एका विशिष्ट मर्यादेपुढे नैना त्याला जाऊ देतच नव्हती.

पहिला आवेग ओसरल्यावर दोघे सोफ्यावर बसले.

नैना - जा आता.. वेड्या.. कुणी पाहिलं तर काय होईल???
महेश - नैना... आय लव्ह यू...
नैना - आय लव्ह यू टू... पण आता जा...
महेश - नाही...
नैना - महेश.. कुणी आलं तर काय होईल आपलं...
महेश - कोणी येत नाही...
नैना - अरे तुला येताना जाताना कुणी पाहिलं तर काय होईल विचार कर...
महेश - कोणी पाहिलेलं नाही..
नैना - असूदेत... जा आता.. भेटलो आपण...
महेश - हे काय भेटणं आहे का???

महेशने तिला पुन्हा जवळ ओढली. नैनाही बेहोषीत असल्यासारखी त्याच्यावर चुंबनांची बरसात करू लागली. त्यामुळे महेश अधिकच उतावीळ झाला. मात्र नैना त्याला पुढे जाऊ देत नव्हती.

महेश - उद्या भेटशील ना पुन्हा?
नैना - नाही.. आई बाबा येणारेत उद्या..
महेश - नैना.. आपण बाहेर भेटत जाऊ..
नैना - आत्ता नाही महेश.. शिक्षण होऊदेत्...बाहेर कुणी पाहिलं तर आई मला हाकलून देईल..
महेश - तू.. माझ्याशी लग्न करशील ना??
नैना - हो.. केलं तर फक्त... फक्त तुझ्याशीच..
महेश - सोमवारी कुठे भेटायचं नैना?
नैना - नाही आता भेटायचं..
महेश - म्हणजे तुझं प्रेमच नाहीये...
नैना - लगेच टोक गाठतोस... बेअब्रू झाली तर?
महेश - लग्नच करायचं आहे म्हंटल्यावर कसली बेअब्रू..??
नैना - वा वा.. हे वय आहे का लग्न करायचं??
महेश - ये ना जवळ..
नैना - नाही... जा आता...

खूप वेळ दोघे बोलत होते. एकमेकांशिवाय जगू शकणार नाही म्हणत होते. नेमकी तेवढ्यातच कडी वाजली.

हादरलेच दोघे! एकमेकांकडे हतबुद्ध होऊन क्षणभर बघत राहिले आणि महेश पटकन एका पलंगाखाली गेला. नैनाने झोपाळलेले डोळे करून दार उघदले तर पोस्टमन! तो गेल्यावर नैनाने त्याला हसत हसत बाहेर ये म्हणून सांगीतले.

मात्र कडी वाजण्याची आत्यंतिक भीती वाटली होती दोघांनाही..

नैना - बघ.. असं होतं... म्हणून म्हणतीय...
महेश - नैना..
नैना - बास.. जा आता..

पुन्हा एकदा एकमेकांना आणा भाका देऊन, शिक्षण झाल्या झाल्या आपापल्या घरी सांगायचे असे ठरवून महेश कसाबसा बाहेर आला..

आणि...

समोर पाहतो तर.. वाड्याच्या दरवाजातून मानेकाका आत आलेले होते ते क्रॉस झाले..

मानेकाका - काय रे? इकडे कुठे?
महेश - राजाकाकाच्या ऑफीसची डायरी मिळेला का विचारायला गेलो होतो...
मानेकाका - ते आहेत कुठे? ते गेले गावाला..
महेश - हो... म्हणाली नैना..

महेश वचकून घरी परत आला...

त्या रात्री झोपताना महेशला अत्यानंद झालेला होता.. नैनाचा घटकाभराचा सहवास म्हणजे जणू नशा होती नशा! अजून त्याच्या शर्टच्या बाहीला तिच्या पावडरचा सुगंध येत होता..तो सतत घ्यावासा वाटत होता त्याला.. पण बाबांना काहीतरीच वाटेल म्हणून त्याने त्याच शर्टमधे झोपायचे ठरवले..

आणि.. दुसर्‍या दिवशी सकाळीच राजाकाका अन शीलाकाकू उगवले.

ते पाहून हिरमुसला झाला महेश! बेळगावच्या कुंद्याचे सर्व वाड्याला वाटप होत असताना सगळ्यांनीच एक संवाद ऐकला..

प्रमिला - कसं झालं लग्न?
शीला - मस्त.. आणि आणखीन एक गंमत झाली..
प्रमिला - काय?
शीला - नंडेच्या समोर जगताप म्हणून राहतात.. छान आहे घर..
प्रमिला - मग??

शीला - त्यांचा तीन नंबरचा मुलगा... नैनाला शोभेलसा आहे.. बोलणी करूनच आलो आम्ही..

गुलमोहर: 

या भागाच्या निमित्ताने -

माझ्या आजवरच्या कादंबर्‍यांपैकी 'एच.आर.डी.एम.' ही सर्वात मोठी कादंबरी होती.

'हाफ राईस दाल मारके' या कादंबरीचा शेवटचा भाग हा तेवीसावा भाग होता. 'श्रीनिवास पेंढारकर - एक बाप' या कादंबरीचा हा चोवीसावा भाग झालेला असूनही अजूनही कथानक आवाक्यात आलेलं नाही.

मात्र वाचक व प्रतिसादक यांच्या उदार प्रतिसादांमुळे मलाही हे कथानक रंगवताना अधिकाधिक मजा येत आहे.

आशा आहे की ही लांबलचक कादंबरी सहन होईल व आवडेलही!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

झक्कास जमलीयं Happy
कादंबरी सहन होईल >> असं का म्हणताय??...मी तर रोज वाट बघत असते पुढच्या पोस्ट्ची....
रोज तुमची कथा वाचायचं addiction झालयं Lol

पूर्वार्ध....
मुलींच एक बरं असतं! एक आपलं सुंदर दिसलं की झालं! बाकी पुढचं मग फिदा झालेला माणूस करतोच!>>> Happy

रंगाशेठना अनुमोदन...श्री ची डायरी...अप्रतिम! महेशने ती वाचणे, त्याच्या रिअ‍ॅक्शन्स, तो श्रीला ऑफिसमधे जाऊन भेटणे हे फार सुंदर पद्धतीने मांडलंय. तुमच्या निरिक्षणशक्तीला द्यावी तेवढी दाद कमीच...वाचत रहावंसं वाटत होतं...एकदम तंद्री लागली होती...पण तो भाग अचानक संपून गेला.
पण एका गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतंय...एवढं रियलायझेशन येऊन सुद्धा शेवटी महेशराव बाबांना एकट्याला सोडून जाणार ना परदेशात? असंच होत असावं सर्वांचं...म्हणतात ना- कळतं पण वळत नाही... Sad

असो, आता उत्तरार्ध....

हाफ राईसच्या काजलसारखी ती असामान्य सुंदर नसली तरीही नीटस, गोड व बोलका चेहरा असलेली अन तारुण्याचा उंबरठा नुकताच ओलांडलेली असल्याने शीलाकाकू तिला आता खूपच जपायची. >>> कथेतच इतर कथांमधील पात्रांची तुलना बघून गंमत वाटली Happy
मागेपण तुम्ही एकदा असे काहीसे केले होते...मला पुसटसे आठवतेय...डिस्कोमधला साहू बसने चालला होता आणि अचानक बस-ड्रायव्हरने ब्रेक दाबला. कुणीतरी समोर आलं होतं...राम-रहिम ढाब्यासमोरचा अ‍ॅक्सिडेंट होता तो... अशा प्रकारचं कनेक्शन जोडण्याची तुमची आयडीया भारीये एकदम...आवडेश Happy

ना तुने सिग्नल देखा.. ना मैने सिग्नल देखा... अ‍ॅक्सीडेन्ट होगया रब्बा रब्बा... Rofl

शीला - त्यांचा तीन नंबरचा मुलगा... नैनाला शोभेलसा आहे.. बोलणी करूनच आलो आम्ही..>>> नको हो Sad दिपू-काजलबाबतीत आमचं स्वप्न अपुरं राहिलं, ह्यांच्या बाबतीत तरी पूर्ण होवो!

बाकी मी मयुरीला माझंही अनुमोदन... Happy कधीच संपू नये अशीच कथा आहे ही आणि तुम्ही काय सुंदर रंगवताय... त्यामुळे येऊ द्या भरपूर भाग. आनंदच आहे या तुमच्या निर्णयाचा...

आशा आहे की ही लांबलचक कादंबरी सहन होईल व आवडेलही! >>
अहो बेफिकिर राव व्यसन लागलय आम्हाला. नाही वाचल तर कसतरी होत

बेफिकिर,
आज मज्जाच झालि, २ भाग वाचायला मिळाले, एकदम अहाहाहा....

बाकि कितिहि भाग झाले तरि चालतिल, तुम्हि त्याचि काळजि करु नका.
यार, गट्टु आणि नेना प्रकरण वाचताना खुप म्हण्जे खुप भारि वाट्त, अगदि पोस्ट ला गुलाबि background असल्याचा भास होतो, प्लिज हसु नये. :p

बेफिकिर, लेखन शेलि अप्रतिम,

पण आता गट्टु आणि नेना ला वेगळ करु नका, नाहितर मि हा *** ** पेटवुन देईल.
प्लिज, प्लिज अस करु नका. Sad

महेश - आजपासून.. रात्रीचा स्वयंपाक मी करत जाईन बाबा.. >>>डोळ्यातुन पाणी आले...

आणि... . बेफिकिरराव,
प्लिज , दिपु आणि काजल सारखे गट्टु आणि नैना ला वेगळं करु नका हो....

मलापण डायरी वाचताना डोळे कधी ओलावले ते कळले नाही.
आशा आहे की ही लांबलचक कादंबरी सहन होईल व आवडेलही! >> प्लीज जास्तीत जास्त भाग होउ दे.
नवीन कादम्बरी चा विषय तयार आहे ना? तुमचे पोस्ट वाचायला नसले तर माझ्या मुलीच्याही लक्शात आले आहे की मी जरा चीडचीडी असते (पवार मावशी होते माझी Happy इतके वेड लावले आहे तुम्ही लिखाणाने.

खरचं या कादंबरीचे कितीही भाग होउदेत. वाचताना कधीही कंटाळा येणारच नाही. अगदी (५०-किंवा जास्त)भाग झाले तरी आम्ही सगळे तेवढ्याच आवडीने वाचत राहू.

आणि मीरा म्हणते त्या प्रमाणे ह्याचे कितीही भाग झाले तरी नवीन विषय तयार ठेवा.
रोज तुमच लिखाण वाचल्या शिवाय चैन पडत नाही.
पुलेशु.

असिमित | 1 September, 2010 - 13:21
मला तर वडिलान्च्या भुमिकेत आनन्द इन्गळेच दिसतात.

मुग्धानन्द | 2 September, 2010 - 11:08
असिमित, तुम्हाला आनंद अभ्यंकर म्हणायचे आहे का?

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आत्तापर्यंतची एकंदर कथा वाचल्यानंतर श्री म्हणजे एक गरिब दिसणारी, जरा कृश प्रकृतीची व्यक्ती अशीच प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येते आणि आणि त्यात ना आनंद इंगळे बसत, ना आनंद अभ्यंकर Proud
मला अतुल कुलकर्णी मस्त वाटेल ह्या रोलमधे Happy
हं गट्टू म्हणून किंवा हाफ राईसवाला दिपू म्हणून मात्र एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे लहानपणी पहिलेल्या गोट्या सिरियल मधला गोट्या....:)

ashuchamp, सक्षम कुलकर्णी एकदम डोळ्यासमोर आला नाही...म्हणून गुगलून पाहिलं. हो, हा मुलगा सुद्धा 'गट्टू' म्हणून शोभेल अगदी. ह्याचा चेहरासुद्धा 'गोट्या'शी मिळताजुळता आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पाणीही प्यायला नाही महेश!

न जाणो ओठांवर असलेले पुसट फीलिंग जायचे निघून! ..>>>>>

छोट्या छोट्या गोष्टीपण किती छान मांडता तुम्ही असेच लिहित रहा.

बेफ़िकिर तुम्हि असे का वागता एक तर सवय लावाता चान्ग्ले वाचनाचि आनि मग पुढ्चा भाग टाकायला वेळ लावता आम्हि नाहि जा बोलणार content_11031_prev.gif

सर्वांच्या दिलदार व प्रेमळ प्रोत्साहनाचे मनःपुर्वक आभार!

आर्या १२३, हे रडणारे निरागस बालक आवडले. हे कुठे मिळाले?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!