ती

तो -भाग १

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 22 May, 2011 - 14:48

तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास.

गुलमोहर: 

मौन

Submitted by भूत on 26 November, 2010 - 02:35

आताशा फक्त हे मौन माझे वाटते |
माणसांच्या गर्दीतही एकटेसे वाटते ||

ती भेटते चोरुनि आजही चाफ्यातळी|
पण कळेना ती आता का अबोली माळते ||

शब्द सारे संपलेले एकांत हा चोहीकडे
प्रश्ण जे नजरेत, ती त्याक्षणीही टाळते ||

जो स्वर्ग होता एककाळी अन आता अस्वस्थता
" ती चुंबने " मी मागता, पाणी डोळा दाटते ||

विसरुन सारे , मांडतो मैफीली मी एकटा
आणि सच्चा मित्रापरी दु:ख मजला गाठते ||

मी तयाला मागतो मुक्तता ह्या सार्‍यातुनी |
मौन देतो तो इतुके , झोळी माझी फाटते ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ती....Virtual Reality

Submitted by bhatkyajoshi on 19 October, 2010 - 14:14

तुझी सवय झाली आहे आता...
असण्याची अन नसण्याची ...
असलीस की काय सांगू आणि किती सांगू
नसलीस की हुरहूर आणि नसण्याची चुटपूट
रोज तुझी वाट बघतो,
तू Online येण्याची, तुझ्या Email Reply ची....
फोन करतो अधून मधून ...
वेळेचही भान राहत नाही तुझ्याशी बोलताना ...
खरच सवय झाली आहे तुझ्या आभासी प्रतिमेची ...
वास्तवात नसलेल्या अनामिक नात्याची...
कधी जवळ...कधी दूर...
अंतरीच्या भावनांचा...ओला महापूर...
भिजून जातो,चिंब चिंब ...
मनातल्या तरंगांवर, तुझेच प्रतिबिंब...
माझ्या कवितेसारखीच ती ही...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - ती