मौन

निःशब्द प्रार्थना

Submitted by पुरंदरे शशांक on 21 September, 2019 - 14:06

निःशब्द प्रार्थना

हात जोडले नसे का
मूर्ति नसे का गोमटी
अंतरात वसे उर्मी
हरि आहेच सांगाती

मागायाचे सर्वज्ञाला
हे तो उफराटी गोठी
शब्दी मावेना प्रार्थना
नको गीत हरी साठी

देखे नयनामधून
बोले वाणी चालवून
कसे स्तवन करावे
मौन हेचि तेथ खूण

तोचि आधार एकला
श्वास चालवी सकळ
जाणवता क्षणभरी
होय प्रार्थना सफळ...

मौन

Submitted by mr.pandit on 4 December, 2017 - 07:24

तिच्या-माझ्या नात्यातल
हल्ली अंतर खुप वाढलय
शब्दांनी सुटेल कोडे सारे
पण तिने मौन बाळगलय.

कधी काळी ती माझ्याशी
खुप भरभरुन बोलायची
कधी खांद्यावर डोके ठेवुन
फक्त् शांत बसुन राहायची

प्रेम व्यक्त केल ज्यावेळी
त्यावेळीही ती शांत होती
तिच्या मौनाचे उत्तर मला
आजपर्यंत कळले नाही.

समोरासमोर येतो बरेचदा
पण ती टाळतेच मला
तरीही नाही दिसलो कधी
इतरांना विचारतेसुद्धा

तिच्या अश्या वागण्याचा
अर्थ काही उमजत नाही.
बोलायचा प्रयत्न केला तरी
ती मौनाशिवाय बोलत नाही.

शब्दखुणा: 

अशीही तशीही (कविता/गझल)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अशीही तशीही

ओठांनी वाचतो शब्द मौनाचे
"कळतेस" तू अशीही तशीही

भास आभास हा खेळ कल्पनांचा?
"दिसतेस" तू अशीही तशीही

एकच खळी परि लागते जिव्हारी
"रुजतेस" तू अशीही तशीही

डाव मोडून पुन: मांडतो नव्याने
"जिंकतेस" तू अशीही तशीही

मिळते पत्र जरी पत्ता चुकलेले
"भेटतेस" तू अशीही तशीही

सावल्यांच्या छत्र्या घेवून फिरतो
"जाळतेस" तू अशीही तशीही

डोळ्यात जागतो गाव चांदण्यांचा
"स्मरतेस" तू अशीही तशीही

प्रकार: 
शब्दखुणा: 

मौन

Submitted by भूत on 26 November, 2010 - 02:35

आताशा फक्त हे मौन माझे वाटते |
माणसांच्या गर्दीतही एकटेसे वाटते ||

ती भेटते चोरुनि आजही चाफ्यातळी|
पण कळेना ती आता का अबोली माळते ||

शब्द सारे संपलेले एकांत हा चोहीकडे
प्रश्ण जे नजरेत, ती त्याक्षणीही टाळते ||

जो स्वर्ग होता एककाळी अन आता अस्वस्थता
" ती चुंबने " मी मागता, पाणी डोळा दाटते ||

विसरुन सारे , मांडतो मैफीली मी एकटा
आणि सच्चा मित्रापरी दु:ख मजला गाठते ||

मी तयाला मागतो मुक्तता ह्या सार्‍यातुनी |
मौन देतो तो इतुके , झोळी माझी फाटते ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मौन