तगमग

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

खूप दिवसांपासून सुरु असलेली तगमग

शरिरातून निघून गेलेला जीव,
सुकलेल्या गवतासारखी
त्वचेची लागलेली वाट,
मावळलेला उत्साह,
हरवलेला ओलावा,
आपल्या परिघापासून
वाढतच चाललेला दुरावा
वाटत जणू सगळ सगळ संपून गेल!!!

आणि मग एकाएकी पाऊस पडतो
तो पडतच राहतो
आत आत झिरपत राहतो
त्याच्यातला ओलावा
आतमधे भिनतो,
त्याचा थंड स्पर्श मोहरुन टाकतो,
त्याचा घोट नवीन जीव आणतो,
त्याच्या कोसळत राहण्याने
नवीन उत्साह संचारतो,
पावसाच्या स्पर्शाने
सुकलेल्या गवताला हिरवा रंग यावा
तशी पुन्हा एकदा मनाला पालवी फुटते
आणि मग पुन्हा वाटत संपल कुठे???
नाही.. दिवस तुझे हे फुलायचे!
- बी

ह्यावेळी आमच्या काव्यवाचनाला "दिवस तुझे हे फुलायचे" असा विषय आहे. ह्या समस्यापुर्तीत मी ती ओळ न येऊ देता तसेच काहीतरी सांगत आहे. आय होप की तुम्हाला ही कविता रचलेली असून.. र ला ट लावलेला असून आवडेल.

प्रकार: 

स्वतंत्र रचना म्हणून छान आहे पण 'दिवस तुझे हे फुलायचे' ह्या विषया / समस्यापुर्ती(?) साठी विशोभित वाटते आहे.

तूला असे विषय / समस्यापुर्ती (?) करायला कोण देतं. अशा रचना जुळवणे हे समस्या वाटत असेल तर त्या वाटेला का जातोस असे प्रश्न मनी आल्यावाचून रहात नाहीत.

धन्यवाद सर्वांचे!

हर्पेन, आमचा इथे स्वनिर्मित काव्यवाचनाचा ग्रुप आहे. मागिल १० वर्षापासून आम्ही दर महिन्याला कुणाच्या तरी घरी भेटतो. तिथेच जेवण चहापाणी आणि काव्यवाचन.

ह्या कवितेचा शेवट दिवस तुझे हे फुलायचे असा मला करायचा आहे. तो मी नंतर करेन.