उणिव

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

कधी मी इथे असतो
तर तिथलं जग
इथली उणिव असते

तर तिथे असताना
इथल जग
तिथली उणिव असते

ही उणिव
कधी .. कधीच भरुन
निघणार नाही
इथली कमी .. तिथली कमी
जाणवत राहणारच!

पण कुठवर? आयुष्यभर?
हे नको म्हणून
एक वेगळच जग
माझ्या आत..माझ्या नकळत
उदयास आल!
फक्त ते कुणाला दिसत नाही
पण मला ते जाणवत
मी इथे.. तिथे वावरत असताना
आतल जग माझ्यासोबत
भटकत असत!!!
इथल्या.. तिथल्या दोन्ही जगातील
लोकांना मग माझ्यासहीत
माझ्या ह्या जगाचा थांग लागत नाही!!

आपल्याच जगात वावरणारी माणसे
बहुतेक माझ्याचसारखी असावीत!!!

- बी

प्रकार: 

सर्वांचे भरभरुन आभार. मला ह्या कवितेचा शेवट नीट जमला नाही. पण त्यावेळी लिहून पुर्ण करायची होती म्हणून पुर्ण केली.