विज्ञान

माझा देव

Submitted by SANDHYAJEET on 26 September, 2020 - 12:32

माझा देव !!!

देव फक्त मनातला का प्रत्यक्षातला उत्तर समजावून घेण्याचा आणि देण्याचा हा छोटासा प्रयत्न !!!

शब्दखुणा: 

इंग्रजी जागतिक भाषा का बनली?

Submitted by केअशु on 22 August, 2020 - 10:15

इंग्रजी ही जागतिक भाषा कशी बनली? पूर्वी फ्रेंच आणि जर्मन या भाषांना इंग्रजीपेक्षाही मानाचं स्थान होतं म्हणे.मग या भाषांना मागं टाकून इंग्रजीला जगभर पसरवून ती जागतिक भाषा बनवणं इंग्रजांना कसं शक्य झालं? इतकी की ती आज विज्ञान/तंत्रज्ञानाचीसुद्धा सर्वात महत्त्वाची भाषा बनली आहे.

शब्दखुणा: 

आणि लाखो घड्याळे थांबली

Submitted by नितीनचंद्र on 15 August, 2020 - 11:33

Damages_after_2020_Beirut_explosions_1.jpg

बैरूत ही लेबनाॕन ची राजधानी बैरूत ४ आॕगस्ट २०२० ला भयानक स्फोटाने हादरली.

हा स्फोट भुकंप मापनासाठी असलेल्या रिश्टर स्केल मापनानुसार ४.५ या क्षमतेचा होता.

अमोनियम नायट्रेटच्या हजारो टन साठ्याचा स्फोट झाला की कुणी केला हे माहित नाही परंतु लाखो घरांचे नुकसान झाले आहे.

१७१ मृत्यू , ६००० जखमी, तीन लाख लोकांची घरे उध्वस्त, झाली आहेत.

शब्दखुणा: 

चहाबाजांचे भांडण आणि संख्याशास्त्राचा लाभ

Submitted by मेघना. on 30 June, 2020 - 04:37

असं म्हणतात, की जगामध्ये सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांमध्ये चहाचा नंबर पाण्याच्या खालोखाल लागतो. चहाचे प्रकार आणि करण्याची पद्धत यामध्ये जगभरात प्रचंड विविधता आहे. आपल्यापैकीही बऱ्याच जणांना आपण करतो तीच पद्धत योग्य असे वाटते, आणि त्याच प्रकारचा चहा सहसा आपण पिण्यास प्राधान्यही देतो. दूध घालून केलेल्या चहामध्येही चहा, पाणी, दूध आणि साखरेचे प्रमाण, यांचे गुणोत्तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे असू शकते, नव्हे, असतेच म्हणायला हवं खरं तर.

नासाच्या DM2 मिशन विषयी माहिती

Submitted by निरंजन_t on 19 May, 2020 - 15:18

Nasa.gov/stem वर, नवीन क्रियाकलापाचा दुवा पोस्ट केला होता. क्रू ड्रॅगन स्पेसशिप किंवा बोइंग स्टारलिनर वापरुन डॉकिंग सिम्युलेशन कोडिंग करण्यासाठी ही एक क्रिया होती. मी प्रथम रॉकेट सायन्स खेळला: राईड टू स्टेशन गेम (हा Android आणि iOS वर देखील उपलब्ध आहे). त्यानंतर मी स्क्रॅच किंवा स्नॅप यापैकी एकात पुन्हा तयार केल्या, जे दोन ब्लॉक-आधारित प्रोग्रामिंग भाषा आहेत. वापरकर्त्यास कोणत्या प्रकारचे अवकाशयान डॉक करायचे आहे ते निवडावे लागेल (म्हणजे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन किंवा बोईंग स्टारलिनर). मला वापरकर्त्यास त्यांना स्वायत्तपणे अंतराळ यान डॉक करायचे की नाही ते स्वतः निवडावे द्यावे लागले.

शब्दखुणा: 

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

Submitted by पाषाणभेद on 9 May, 2020 - 10:47

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

Crompton Cealing Fan Review
इमेज १

पार्श्वभुमी:
माझ्या एका रूममधल्या सिलिंग फॅनचा खूप आवाज येत होता. तो पोलर कंपनीचा होता. तो चालू केल्यानंतर घर्रघर्र असा आवाज करायचा. त्याला दोन वेळेस दुरूस्तही केले गेले होते. पण आता उन्हाळा सुरू होणार अन त्यात त्याचा न सहन होणारा आवाज ऐकून तो फॅन बदलायचा निर्णय घेतला.

उलट तपासणी (भाग १)

Submitted by हर्षल वैद्य on 24 March, 2020 - 05:03

प्रा. पार्थसारथी त्यांच्या खोलीमध्ये चिंताक्रांत मुद्रेने बसले होते. रात्रीचे दहा वाजत आले तरी आज त्यांना घरी जावेसे वाटत नव्हते. त्यांचा प्रयोगशाळा मदतनीस सुहास गेले दोन दिवस आजारी होता आणि रुग्णालयात भरती होता. रोगाचे निदान काही होत नव्हते. तशी लक्षणे साधीच होती. सुरुवातीस खोकला व छातीत भरलेला कफ म्हणून त्याला रुग्णालयात आणला. दोन दिवसांपासून तापही होताच. घरच्या डॉक्टरांचे औषध झाले दोन-तीन दिवस आणि मग आराम पडेना म्हणून भरती केला. लगेच त्याला एक प्रतिजैविकांचा डोसही सुरू केला. पण प्रकृतीस उतार पडायची काही चिन्हे नव्हती. डॉक्टरांनाही कोड्यात पडल्यासारखे झाले होते.

शब्दखुणा: 

व्हायरस

Submitted by जाई. on 24 March, 2020 - 00:55

१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात .

Pages

Subscribe to RSS - विज्ञान