आणि लाखो घड्याळे थांबली

Submitted by नितीनचंद्र on 15 August, 2020 - 11:33

Damages_after_2020_Beirut_explosions_1.jpg

बैरूत ही लेबनाॕन ची राजधानी बैरूत ४ आॕगस्ट २०२० ला भयानक स्फोटाने हादरली.

हा स्फोट भुकंप मापनासाठी असलेल्या रिश्टर स्केल मापनानुसार ४.५ या क्षमतेचा होता.

अमोनियम नायट्रेटच्या हजारो टन साठ्याचा स्फोट झाला की कुणी केला हे माहित नाही परंतु लाखो घरांचे नुकसान झाले आहे.

१७१ मृत्यू , ६००० जखमी, तीन लाख लोकांची घरे उध्वस्त, झाली आहेत.

या महाभयानक क्षणाची नोंद लाखो घड्याळांनी केलेली असुन तिथल्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजुन ९ मिनीटांनी स्फोटामुळे निर्माण झालेल्या शाॕक वेव्ह मुळे हजारो घड्याळे बंद पडली आहेत.

हे सारे, मानव निर्मीत आहे. आर्थिक संकटे, महामारी आणि आता स्फोट या संकटाच्या मालिकेत तिथले स्थानिक सापडले आहेत.

यामागे त्यांचा पारंपरिक दुष्मन इस्त्रायल नाही असे म्हणले जात असुन नेमके काय झाले याचा शोध सुरू आहे.

हिरोशीमा मधील अणुस्फोटानंतर इतका मोठा स्फोट हाच असे म्हणले जात आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults