विज्ञान

उलट तपासणी (भाग १)

Submitted by हर्षल वैद्य on 24 March, 2020 - 05:03

प्रा. पार्थसारथी त्यांच्या खोलीमध्ये चिंताक्रांत मुद्रेने बसले होते. रात्रीचे दहा वाजत आले तरी आज त्यांना घरी जावेसे वाटत नव्हते. त्यांचा प्रयोगशाळा मदतनीस सुहास गेले दोन दिवस आजारी होता आणि रुग्णालयात भरती होता. रोगाचे निदान काही होत नव्हते. तशी लक्षणे साधीच होती. सुरुवातीस खोकला व छातीत भरलेला कफ म्हणून त्याला रुग्णालयात आणला. दोन दिवसांपासून तापही होताच. घरच्या डॉक्टरांचे औषध झाले दोन-तीन दिवस आणि मग आराम पडेना म्हणून भरती केला. लगेच त्याला एक प्रतिजैविकांचा डोसही सुरू केला. पण प्रकृतीस उतार पडायची काही चिन्हे नव्हती. डॉक्टरांनाही कोड्यात पडल्यासारखे झाले होते.

शब्दखुणा: 

व्हायरस

Submitted by जाई. on 24 March, 2020 - 00:55

१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात .

भूतांच्या गोष्टी: अनुभव भरतपुरचा तसेच मनातले भुत

Submitted by Dr Raju Kasambe on 1 March, 2020 - 08:10

भूतांच्या गोष्टी

खरं सांगायचं तर माझा भूतांवर अजिबात विश्वास नाही. पण ज्या काही घटना घडतात त्याचे आपल्या जवळ स्पष्टीकरण नसते. मग आपल्याला पटेल ते स्पष्टीकरण आपण स्वीकारतो. त्यातील एक म्हणजे भूतांचे अस्तित्त्व.

मला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात असे शिकविले गेले की कुठल्याही गोष्टीचे त्यावेळेसचे सर्वात जास्त स्वीकारले गेलेले स्पष्टीकरण म्हणजे ‘सत्य’ असे मानले जाते. पण खरे ‘सत्य’ तेच असेल ह्याची शाश्वती देता येत नाही. कारण काही दिवसांनी आणखी कुणी तरी त्याचे आणखी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देतो आणि आपण त्याला सत्य मानायला लागतो.

जिवाणू विषयी सर्व काही

Submitted by आर्यन वाळुंज on 22 February, 2020 - 12:15

इथं मी जिवाणू विषयी माहिती देणार आहे.
कुणाला वाटले तर माहितीत भर घालू शकता. चूक असली तर दुरुस्ती सुचवावी.
जीवाणू (Bacteria) व जीवाणूजन्य रोग

आकाराने मोठे, एकपेशीय, अकेंद्रकी व मुक्त गुणसुञे अशी यांची काही वैशिष्ट्ये.
पृथ्वीवर जीवाणूंचे अस्तित्व मानवापेक्षा जास्त काळापासून आहे.
जीवाणू हे कुठल्याही वातावरणात तग धरू शकतात. जसे की, जमिनीमध्ये खोलावर, अंतराळात, उकळत्या पाण्यात, अतिशय थंडगार पाण्यात, सल्फुरिक आम्लात इ.
१) विषमज्वर (Typhoid)

विषय: 

मराठी भाषा दिवस २०२० - स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:17

स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा केंद्रबिंदूच जणू! घरात प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या असल्या तरी सर्व कुटुंबाला एकत्र ठेवणारे हे स्वयंपाकघर, अनेक शास्त्रीय प्रयोग घडवणारी प्रयोगशाळा असते हे सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेल. पण इथे आपल्या सुगरणी आणि बल्लवाचार्य रोज वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग हसतखेळत सहजतेने करत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्वयंपाक करताना ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रत्येकामागे एक ठोस शास्त्रीय आधार असतो. हे नक्की कसे? त्याबद्दल आज आपण येथे तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांमधून जाणून घेऊ.

बालवैज्ञानिक - लहानग्यांसाठी "विज्ञान प्रकल्प" उपक्रम (मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.)

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

Wow!

Submitted by अभि_नव on 15 August, 2019 - 00:00

१५ ऑगस्ट १९७७.

बिग इअर रेडिओ दुर्बीनीच्या व परग्रहवासीय शोधमोहीमेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस. ओहियो स्टेट युनिवर्सिटीमधे ही बिग इअर दुर्बीन १९६३ ते १९९८ या काळात कार्यरत होती. कोलंबस, ओहियो, अमेरीका इथे पर्किन्स ऑब्झरवेटरीच्या प्रांगणात असलेल्या या दुर्बीनिचे मुख्य काम परग्रहवासीयांकडुन आलेल्या रेडिओ संदेशांवर लक्ष ठेवणे असे होते. १५ ऑगस्ट १९७७ या दिवशी ०२:१६ UTC वाजता बिग इअर रेडिओ दुर्बीनिला एक नेहमीपेक्षा वेगळा रेडिओ सिग्नल मिळाला.

तुम्हा निष्पापांचं असंच असतं (चिमणी)

Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 04:25

तुम्हा निष्पापांचं असंच असतं (चिमणी)

कसे तुम्ही मख्ख बाई
संसाराची कशी फिकीरच नाही

त्या दृष्ट काकाने पळविले छकुल्याला
तुम्हास कशी चिंता नाही

चिवचिव चिवचिव करशील किती
धावपळ ओरड करशील किती

बछडा तुझा गं मिळणार नाही
कारण काय तुला कळणार नाही

तुम्हा निष्पापांचं असंच असतं...
कसेही रहा, कुणी वाली नसतं

पहा ती चिऊताई धावून धावून
बसलीय शून्यात नजर लावून !

(१९९१)

Pages

Subscribe to RSS - विज्ञान