संख्याशास्त्र

जॉन स्नो ने वापरली सनीची 'ती' युक्ती, झाला 'हा' परिणाम

Submitted by मेघना. on 28 June, 2022 - 08:51

काय? गोंधळात पडलात ना? जॉन स्नोने सनीची युक्ती वापरली? कुठली युक्ती? कुठल्या सीझनमध्ये? कुठला एपिसोड? हे काय गौडबंगाल आहे?

शेक्सपिअर आणि संख्याशास्त्र

Submitted by मेघना. on 27 May, 2021 - 08:19

साल १९८४. नोव्हेंबर महिना चालू होता. शेक्सपिअर अभ्यासक डॉक्टर गॅरी टेलर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बडलेयन लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसून एक कवितासंग्रह चाळत होते. बडलेयन लायब्ररीला हा हस्तलिखित कवितासंग्रह होता १७७५ सालचा. आणि त्यातल्या संग्रहित कविता होत्या त्याहीपूर्वीच्या, सतराव्या शतकातल्या. हे संकलन चाळताना टेलरची नजर एका कवितेवर पडली. ही कविता होती नऊ कडव्यांची. प्रत्येकी आठ ओळी म्हणजेच ७२ ओळींची ही कविता, ज्यात मोजून ४२९ शब्द होते. त्या कवितेच्या काही ओळी अशा..

युद्धस्य कथा रम्या : जर्मन टॅंक प्रॉब्लेम

Submitted by मेघना. on 7 December, 2020 - 08:45

बुद्धिबळाची स्पर्धा कधी पाहिली आहे तुम्ही? हे जे प्रथितयश खेळाडू असतात त्यांची काय खासियत असते? कशा प्रकारे तयारी करतात एखाद्या गेमची? समजा ‘अ’ या स्पर्धकाला ‘ब’ ला हरवायचे असेल तर त्याने गेम ची तयारी कशी करायला हवी? नुसते बुद्धिबळच नाही, दुसरं काहीतरी उदाहरण घेऊ – मुष्टीयुद्ध असो, क्रिकेट असो, किंवा फुटबॉल असो वा टेनिस असो, (खरंतर सगळ्याच स्पर्धांमध्ये) जिंकण्यासाठी काय आवश्यक आहे बरं? स्वतःचा खेळ उंचावायचा असेल तर स्वतःची ताकद वाढवणे, खेळासंबंधी कौशल्य आत्मसात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण फक्त स्वतःचे कौशल्य वाढवणे पुरेसे आहे का? या सगळ्यांमध्ये कौशल्याला चातुर्याची जोड हवी!

चहाबाजांचे भांडण आणि संख्याशास्त्राचा लाभ

Submitted by मेघना. on 30 June, 2020 - 04:37

असं म्हणतात, की जगामध्ये सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांमध्ये चहाचा नंबर पाण्याच्या खालोखाल लागतो. चहाचे प्रकार आणि करण्याची पद्धत यामध्ये जगभरात प्रचंड विविधता आहे. आपल्यापैकीही बऱ्याच जणांना आपण करतो तीच पद्धत योग्य असे वाटते, आणि त्याच प्रकारचा चहा सहसा आपण पिण्यास प्राधान्यही देतो. दूध घालून केलेल्या चहामध्येही चहा, पाणी, दूध आणि साखरेचे प्रमाण, यांचे गुणोत्तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे असू शकते, नव्हे, असतेच म्हणायला हवं खरं तर.

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - ३

Submitted by kanksha on 4 March, 2014 - 23:35

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - २

Submitted by kanksha on 14 March, 2013 - 09:04

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - १

“To understand God's thoughts we must study statistics, for these are the measure of his purpose.”
- Florence Nightingale

शब्दखुणा: 

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - १

Submitted by kanksha on 1 February, 2013 - 02:10

२०१३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र वर्ष', म्हणून साजरं केलं जातंय. आपल्यापैकी बहुतेक जण हे गणित / संख्याशास्त्र म्हटलं की "भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर", याची आठवण होणारे. पण या संख्यांशी मैत्री झाली की संभव - असंभवतेची गणितं उलगडायला लागतात आणि मग अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर १९४७ सालची एक घटना आठवतेय; तीसुद्धा आपल्या भारतातच घडलेली. फाळणीमुळे देशातील वातावरण तंग होतं. दिल्लीतला लाल किल्ला निर्वासितांनी व्यापला होता. त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट सरकारनं एका कंत्राटदाराला दिलं होतं.

शब्दखुणा: 

डॉ. सुखात्मे - नीलफलकाच्या निमित्ताने

Submitted by kanksha on 15 August, 2012 - 05:51

image001.jpgआजच्या स्वातंत्र्यदिनी भारतमातेच्या एका सुपुत्राबद्दल लिहावं वाटलं, म्हणून ही पोस्ट. आजवर अनेक क्षेत्रात अनेक महान हस्ती होऊन गेल्या. पण बहुतेकदा त्या त्या क्षेत्रातील लोकांनाच त्यांच्या कार्याची महानता जाणवते. इतरांपर्यंत ती फारशी पोहोचतही नाही. कधी कधी तर अगदी आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या दिग्गजांचीही आपल्याला माहिती नसते. "पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती"च्या नीलफलक लावण्याच्या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमामुळे आपण सामान्य लोक निदान आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ - श्रेष्ठांना ओळखायला लागूत.

Subscribe to RSS - संख्याशास्त्र