अवांतर

भूल-भुलैया (सौदी अरेबिया चे मॄगजळ)

Submitted by Mandar Katre on 20 March, 2013 - 14:19

भूल-भुलैया

चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो.

विषय: 

अलिबाग

Submitted by अनिश्का. on 16 March, 2013 - 00:29

मी अनिश्का..... राहते मुंबईत..पण जन्माने आणि मनाने अलिबागकर आहे....चला अलिबागकरांनो नवीन नवीन ओळखी करुया माणसं आणि मनं जोडुया.. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

वंश वृक्षाची अनुभूति

Submitted by bnlele on 15 March, 2013 - 01:00

उभ्या आयुष्यात कुलाच्या मूळ गावी भेटिची इछा सतत खुणावत होती पण संधी मिळाली नव्हती.
कोकणात देवाचे गोठणे हे मूळ गांव असल्याच कानावर होत.
अचानक, ओ़अरती का होईना, भेटीची संधि मिळाली. नारळ्.काजू,पोफळीनी बहरलेला आसमंत्,पाटाच पाणी आजवर केवळ कल्पनेतल चित्र प्रत्यक्ष पाहता झालेला आनंद शब्दात सांगण कठिण आहे.
पूर्वजांची वास्तू अत्याधुनिक झालेली असली तरि आसमंत तसाच होता.
अचानक मनात चार ओळी सुचल्या आणि कागदाच्या एका कपट्यावर उतरल्या--
"या मातीचा गंध आगळा॓-
गोडवा शहाळी पाण्याला,
अन आकाशाचा रंग निळा !
इथेच घ्यावा श्वास मोकळा "

विषय: 

अगदी आजचा अनुभव . ....

Submitted by मी मी on 14 March, 2013 - 14:23

आईचा निरोप घेऊन निघाले तेव्हा अंधारलेच होते जरा. कालंच पाउस पडून गेलाय वातावरण पण गार झालय छान. मी माझ्याच तंद्रीत वातावरणाची मजा घेत पुढे चाललेले, थोडी भाजी फळे घेऊन डिक्कीत टाकले आणि गाडी वळवली... संध्याकाळची वेळ आणि धंतोली एरिया ....पुढे बघते तर सिग्नलवर लांबच लांब गाड्या उभ्या मग तशीच वळवलेली गाडी सिग्नल च्या आधीच्या गलीतून टाकली.

विषय: 
शब्दखुणा: 

बेरीज वजाबाकी

Submitted by मानुषी on 14 March, 2013 - 09:55

बेरीज वजाबाकी

माणसाचं मन खरंच अनाकलनीय आहे!
एखाद्या वरवर साध्या वाटणार्‍या गोष्टीचा आपण किती विचार करतो! एखादी साधीशीच गोष्ट दिवसभर मनात घोळत रहाते! म्हणूनच हा परवा आलेला अनुभव इथे शेअर करावासा वाटला!

........बरेच दिवस बरंच शिवण झाल्यावर शिलाई मशीन कुरकुर करायला लागलं. जेवढं मला जमायचं, तेवढं खोलून अगदी आतपर्यंत तेल घातलं. पण नाहीच. मग बॉबिनही काढून सगळे पार्ट्स खोलून साफ़ केले, परत जोडले, बॉबिनवरचा एक सूक्ष्म स्क्रू जरा सैलावलेला वाटला तोही काढून परत टाइट केला. तरी काही टीप चांगली येईना. वाटलं किती इमाने इतबारे सेवा दिलीय या मशीनने आपल्याला. दुरुस्तीची वेळ आलेली दिसते.

विषय: 

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - २

Submitted by kanksha on 14 March, 2013 - 09:04

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - १

“To understand God's thoughts we must study statistics, for these are the measure of his purpose.”
- Florence Nightingale

शब्दखुणा: 

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

Submitted by डॉ. बंडोपंत on 13 March, 2013 - 01:46

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

नेत्रदान केल्याने गरजुला दॄष्टी देण्याचे महान कार्य होते हे महत्व पटुन अनेकांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. कित्येकांनी नेत्रदान केलेही आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार शासनाच्या पेढीतुन ७० टक्के बुबुळे निकामी झाली आहेत. काहीच बुबुळे दॄष्टीहीन व्यक्तीला बसविली गेली आहे. तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे. असे शासनानेच जाहीर केले आहे.
असेच जर चालु राहीले तर भविष्यात नेत्रदानाला कितपत मह्त्व उरेल देव जाणे.
मध्यंतरी अशी बुबुळे कुठेतरी फेकुन दिल्याचेही वाचनात आले होते.

अाकाशगंगा

Submitted by kaushiknagarkar on 12 March, 2013 - 11:58

आकाशगंगा

पाहीली मी एकदाची फिरुनी ती आकाशगंगा
मंद्रशीतल नादलहरी खुलवून जाती अंतरंगा

पाहता पाहिला तो सूर्य जाता मावळूनी
पक्षी गेले निजघराला ऊन त्याचे अावरूनी

श्यामवर्णी नभाची नीलकांती पारदर्शी
एक झाला गौरप्रभु ज्या सर्वगामी सागराशी

दिव्य व्योमाची निळाई ओसरूनी गेली जशी
गाव अाला तारकांचा पाहण्या पृथ्वी अशी

कृष्णवदनी गगन होता हर्षवेगे सज्ज झालो
दूरदर्षी जोडून नेत्रा अमृताचे पूर प्यालो

दर्षिला तेजस्वी गुरुराज सोबत सौंगडी
पृथ्वी नाही विश्वकेंद्री सांगते जी चौकडी

वेध घेऊनी मृगाचा गर्भोदरी अवलोकीले
तरल धूसर मेघजाली चार हीरक जन्मले

मोडवेना निजसमाधी अनिवार तरी होतेच जाणे

धूमकेतु - मृत्यूघन्टा की जीवनदाता ?

Submitted by kaushiknagarkar on 10 March, 2013 - 23:53

हॅलो ...

अरे एक प्रश्न आहे. 'मी' बोलतोय.

बोल ना. 'मी' बोलतोय ते लगेच समजलं मला. काय हवय?

कॉमेट. कॉमेट बद्दल विचारायच आहे.

कसली कॉमेंट? कुणी केली?

कॉमेंट नाहीरे. बहिरा झालास की काय? कॉमेट म्हणालो मी? ते आकाशात असतात ते. कॉ मे ट.

हो, हो. समजलं. ओरडू नकोस, फक्त स्पष्ट बोल. काय विचारतोयस?

कॉमेटला मराठीत काय म्हणतात?

धूमकेतु म्हणतात. शेंडेनक्षत्र असं सुध्दा म्हणतात.

म्हणतात ना? म्हणतात ना? काय म्हणालो मी. जिंकलो की नाही? हा हा हा.

अरे मित्रा, काय म्हणालास? काय जिंकलास?

Pages

Subscribe to RSS - अवांतर