अवांतर

एमपीएससी परीक्षा

Submitted by अव्याशास्त्री on 6 April, 2013 - 04:55

नवी तारीख आयोग ठरवणार

म . टा . प्रतिनिधी , मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ( एमपीएससी ) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा ठरल्याप्रमाणेच ७ एप्रिल रोजी होईल , असे बुधवारी जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गुरुवारी दुसऱ्याच दिवशी आमदारांच्या दबावापुढे झुकत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला . एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी राज्य विध ‌ िमंडळाच्या उभय सभागृहात केली . परीक्षेची नवी तारीख आयोग जाहीर करील , असेही त्यांनी स्पष्ट केले .

विषय: 
शब्दखुणा: 

मला न आवडणारा आयडी

Submitted by शिबा on 5 April, 2013 - 07:59

या इथे या धाग्यावर धाग्यावर कुणीतरी सुचविले म्हणून हा नवा धागा काढते आहे. माझा नावडता आयडी. कारणांसहित लिहा. पण फार पर्सनल होऊ नका कृपया. आयडी बद्दल लिहा व्यक्ती बद्दल नको Happy

विषय: 

मला आवडणारा आय डी.. :)

Submitted by सर्वदा_ on 5 April, 2013 - 07:31

नमस्कार,
मी मायबोली वर येऊन थोडेच दिवस अथवा महिने झाले आहेत..
इथे येताना वाचताना खुपच मज्जा येते...
इथले आय डी , त्यान्ची नावे , प्रत्येकची उत्तर देण्याची, मतं मंडण्याची, प्रत्युत्तर देण्याची, कधी कधी टर उडवण्याची पद्धत अगदी मजेशीर आहे..
कधी कधी एखदा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचताना त्या त्या लिहिणार्या व्यक्ती बद्दल खुप काही समजुन जाते.. कोणि अगदी आपल्या सरखेच वाटते , कोणी मजेद्दर आणि बरच कही..
कधी कधी प्रश्न पडतो इतरांना काय अनुभव येत असतिल ..
आपल्या आवडता आय डी, तो का आवडतो ई. बद्दल वाचायला खुप आवडेल...
pls. share करा मज्जा येईल..

विषय: 

थोड वेळेआधी

Submitted by rasika_mahabal on 2 April, 2013 - 08:41

भारतातील रिती, रुढी, रिवाज, परंपरा, प्रथा ह्यांच्या नावाखाली स्त्रीयांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. उदाहरण द्यायची झालित तर भरपूर आहेत.

विषय: 

कौतुक न लगे

Submitted by हेमंततनय on 1 April, 2013 - 14:04

ओपन-डे ची विवेकच्या मनांत तशी दहशतच होती, त्याउलट ज्याच्यामुळे विवेकवर ही आफत ओढावत असे तो त्याचा एकूलता एक कुलदिपक, रोहन मात्र कुऽऽऽल असे.

विषय: 
शब्दखुणा: 

तोतया

Submitted by सत्यजित on 29 March, 2013 - 03:01

भावनांच्या भाऊगर्दीत
हरवत जातं माझ मन
आणि शोध घ्यावा
लागतो मलाच माझा

नाती धुंडाळावी लागतात
उपकारांचे हिशोब मांडावे लागतात
पालथे करावे लागतात
भुतकाळाचे अनेक खण

अनेक चाव्या लावुनही
न उघडणारे अनेक कप्पे तसेच..
नक्की कुठे दडलोय?
की हरवलोय मी?
काही सुगावा नाही...

जुन्या अल्बमच्या ढिगात
शोधतो मी माझा फोटो
माझ्या सारख्या दिसणार्‍या
एका व्यक्तीच अस्तित्व जाणवतं
पण मी कुठेच नाही
तो तोतया का मी तोतया?

विषय: 

अवलिया

Submitted by Mandar Katre on 27 March, 2013 - 13:01

अवलिया

नमस्ते ,मी चंदू खानविलकर
अबुधाबी साठी जेट एअरवेज ची फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्ट वर उभा असताना एक चाळीशीचा चष्मेधारी मराठी माणूस जवळ येवून उभा होता. त्याने माझ्या पासपोर्ट वरील नाव पाहून लगेच हस्तांदोलना साठी हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली.

तुम्ही Costain साठी जाताय का? तो म्हणाला
होय,पण तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय –मी
हो, आपण कतार ला भेटलोय आधी , तुमच्या कॅम्पमध्ये तो अन्वर होता ना, त्याच्या रूमवर आलो होतो मी एकदा . तो म्हणाला
अच्छा. मग आत्ता कुठे चाललात ?
आत्ता मीही Costain लाच चाललोय , आयलंडला.

विषय: 

स्मशान

Submitted by ashishcrane on 26 March, 2013 - 07:38

आज मी स्मशानात आलो जाऊन ....
पाहिले थोडा वेळ....मी त्या मुडद्यांत राहून....
शांत वाटले त्यातले काही ...
पाहिले काहींना मरूनही...इच्छांसाठी अजूनही जिवंत पाहून....

काही देह....तेथे हि हसरे होते....
जितके मिळाले त्यातच सुख त्यांचे..मागणे ना अजुनी कसले होते....
सज्जनाच्या बाजूला देह एका दुर्जणाचाही होता....
काही फरक न दिसला मजला त्यांत...दोघेही जळतच होते....

काहींच्या ओठी काळजी मुलाबाळांची होती,
काहींच्या ओठी....गाणी रडकी....भूतकाळाची होती,
काहींच्या मनी अजूनही......न सुटलेले हिशोब होते,
दहाच बोटे हाताची....तरी पुन्हा तीच तीच ते मोजत होते....

शब्दखुणा: 

मृत्यू

Submitted by ashishcrane on 26 March, 2013 - 06:55

मृत्यू...
किती हि वाटलं तरी ज्याची भेट टाळता येत नाही असा.
'आहे' ला 'होतं' करणारा,वर्तमानाला भूतकाळ बनवणारा.
बोललेलं एखादं वाक्य 'शेवटचं' ठरवणारा.
वाक्यामागे स्वल्पविराम लावावा कि अल्पविराम लावावा ह्या संभ्रमात असतानाच अचानक येऊन पूर्णविराम लावणारा.

अंत म्हणजे आयुष्य आणि अनंत यांमधली एक सूक्ष्म रेषा.
एका भेटीतच या अंताच्या अलिकडचे पलीकडले होऊन जातात.
हिशोब थांबवणारा, जगणं लांबवणारा...
घराला किती हि मजबूत दारं लावली तरी त्यांना न जुमानणारा.

मृत्यू काहीतरी देऊन जातो कि काही घेऊन जातो?
वर्षानुवर्षे अडगळीत असेच पडून राहिलेल्या खटल्यांचा क्षणात निकाल लावणारा..

शब्दखुणा: 

ये फुलोंकी राणी

Submitted by राजेंद्र देवी on 26 March, 2013 - 05:26

ये फुलोंकी राणी .. या सुप्रसिद्ध गाण्याचे मी केलेला भाषांतराचा प्रयत्न

तू फुलांची राणी वसंतातील कलिका
तुझे हासणे हे भुलविते मना
न हृदय माझे ताब्यात माझ्या
तुझे पाहणे हे खुलविते मना

तुझे ओठ जणू गुलाबाचे कमळ
प्रत्येक पाकळी हि प्रेमगीत आहे
त्या नाजुक ओठांवर प्रेमाची गाणी
ऐकवून आम्हाला तू भुलविते मना

कधी गाढ आलिंगन तर कधी संकोचणे
कधी बावचळणे तर कधी उसळणे
ह्या नजरेच्या पापण्या अलगद मिटविणे
मिटवून उघडणे भुलविते मना

Pages

Subscribe to RSS - अवांतर