अवांतर

पळा पळा कोण पुढे पळे असे ते पळपुटे

Submitted by चैतन्य रामसेवक on 8 August, 2019 - 22:38

संपता मुद्दे येती गुद्द्यांवरी
चर्चेतून पाय काढता घेती
संघोटे, भगवे आणि सनातनी
म्हणोनी दुषणे इतरां देती
नसता आडात कुठून पोहऱ्यात
तेच तेच गुर्हाळ लावितात
किती समजावूनी पडेना उजेड
पेडगावा जाती पांघरुनी वेड
नाही यांचे वागणे बोलणे सरळ
सत्य सांगू जाता होते जळजळ
स्वत:च्या डोळ्यात असे हो मुसळ
यांना मात्र दिसे दुसऱ्याच्या कुसळ
दाखविता आरसा करितात त्रागा
म्हणती आता येथे उरली न जागा
स्वत:चे कर्म दुसऱ्यावर थोपिती
लावून पाय ..णा दूर ते पळती
अशांच्या नशीबी केवळ फजिती
चैतन्य म्हणे विचारा मनाला

विषय: 

आंबट गोड गाभुळलेल्या चिंचा

Submitted by चकाकी on 7 August, 2019 - 16:58

आंबट गोड गाभुळलेल्या चिंचा

एक दिवस सकाळी उठून फोन हातात घेते, तर अचानक एका व्हॉट्सऍप ग्रुप चं आमंत्रण येऊन पडलेलं असतं. अजून एक ? आधीच इतके ग्रुप्स आहेत की मॅनेज होत नाहीयेत. आता अजून एक कुठला ? बघायला गेले तर पहिलीच्या शाळेचं नाव दिसतं - आता जरा उत्सुकता ताणली जाते. हे कोण असेल? डोळे चोळत, दोन वर्षांपूर्वीच लागलेला चष्मा घालून क्लिक करते तर काय ! एकदम जादूनगरीचा दरवाजा उघडल्यासारखं वाटतं.

बहकीसी बारीश ने फीर...

Submitted by 'सिद्धि' on 5 August, 2019 - 03:00

हिरवाई चा शालू लेउनी ही धरा उभी आहे स्वागतासाठी. झाडा, फुला-पानांवरती, घरावरती, छपरावरती अन मनावरती येणारी मभळ बाजुला सारुन सैरभैर पळणार्या ढगांचा लपंडाव सुरु झाला आहे. कडक उन्हाचा दाह शमवण्यासाठी कातर वेळेस नभ उतरु लागले आहेत. अशा वेळी रातकिड्यांची किर्र आणि काजव्यांची सोनेरी रांगोळी सळसळणार्या गवताच्या पात्यामध्ये नवलाईचे स्मित घेउन आली आहे. मदनाचे चाप जणू असे ईन्द्रधणू नभी उमटले आहे. चींब भीजूनही चमचमणारे ऊन म्हणजेच नव चैतन्याचा जन्म झाला आहे. कारण ऋतुचे सोहळे घेऊन आता माझा श्रावण आला आहे .

विषय: 
शब्दखुणा: 

नलुची गोष्ट !!!!!

Submitted by Sujaata Siddha on 5 August, 2019 - 01:14

“या या मंडळी बसा… , अहो sss पाणी आणा जरा , पाहुणे आलेत बाहेर” भाऊंनी ओसरीतून वर्दी दिली तशी सुशीला लगबगीने बाहेर आली आणि ओसरीत आलेल्या पाहुण्यांना बघून तितक्याच लगबगीने परत आत गेली ,आतल्या खोलीच्या दाराशी हळूच जाऊन कुजबुजत्या स्वरात तिने नलूला विचारलं “निलेश्वरी , पाहुणे आलेत बाहेर , भाऊ हाका मारतायत, येता ना ?”

विषय: 

कानाला खडा: भाग १ - मुंबईचे डांस बार

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:40

कानाला खडा: भाग १ - मुंबईचे डांस बार

१९९६ मधली गोष्ट आहे. हिंदुस्तान सीबा गायगी कंपनीत निवड होऊन ट्रेनिंग साठी गोरेगावात (हे मुंबईचे एक उपनगर आहे) मुक्कामी होतो. ट्रेनिंग साठी संपूर्ण भारतातून निवडक ३० जण आले होते. त्यापैकी काही जण जरा ‘रसिक’ होते. त्यांना प्रत्यक्ष नाचणार्‍या ‘बार गर्ल’ असणारे डान्स बार बघायचे होते. ते म्हणायचे

“तू तो महाराष्ट्र का हैना, तेरेकु तो मालूमच होंगी सब बंबई?”

विषय: 

पुरुषांचे नाचाचे वर्ग (क्लास) असतात काय?

Submitted by परत चक्रम माणूस on 24 July, 2019 - 10:45

बऱ्याच दिवसांपासून मला नाच शिकायची इच्छा आहे. पुरुषांसाठी नाचाचे कोणते प्रकार आहेत. भरतनाट्यम सारखे प्रकार सोडून, बाल्या डान्स सोडून. आणि असे क्लास अस्तित्वात आहेत का, कुणी अशा ठिकाणी शिकलं आहे का. सालसा वगैरे प्रकार काय आहे.
छान छान प्रतिसाद लिहा व आपण छान प्रतिसाद लिहालच ही अपेक्षा.
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 

बाळासाठी ' स्वानंदी' अर्थाचं नाव सुचवा

Submitted by माउ on 23 July, 2019 - 12:43

मायबोलीकरांनो,
मला मुलीसाठी "स्वानंदी- स्वतःचा आनंद शोधणारी" ह्या अर्थाचं नाव हवं आहे. स्वानंदी ठेवता येत नाही कारण तिच्या चुलत बहिणीचं नाव आहे.
या अर्थाची अजून नावे असतील तर सुचवा प्लीज!!
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 

गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी

Submitted by 'सिद्धि' on 21 July, 2019 - 06:51

आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येक घरी एक विशिष्ट प्रकारचा मसाला वापरात असतोच. कांदा-खोबर मसाला,तिळकुट,गरम मसाला,घाटी पद्धतीचा मसाला, मालवणी मसाला, कोंकणी मसाला वगैरे वगैरे. असे मसाल्याचे खुप प्रकार आहेत आणि त्यांचा वापर ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण ऐनवेळी पाहुणे वैगरे आले आणि एखादा मसाला करायचं झालं तर वेळ जास्त लागतो आणि जेवणासाठी उशीर होऊ शकतो.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर