राजकारण

किंगफिशर देशोधडीस. सरकारी खजिना कोणासाठी?

Submitted by विजय आंग्रे on 15 November, 2011 - 00:16

एअर इंडियाचा महाराजा कंगाल, भिकारी झाला व त्यास भिकारी करणारे मंत्री व लुटमार करणारे अधिकारीच होते. आता अति श्रीमंत, गर्भश्रीमंत वगैरे उपाध्यांनी प्रख्यात असलेले विजय मल्ल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही देशोधडीस लागली. अर्थात किंगफिशर देशोधडीस लागल्यामुळे मल्ल्या यांची श्रीमंती, त्यांचे ऐटबाज राहणीमान, त्यांची छानछोकी यात कुठेही कमी झालेली नाही. त्यांचे रंगढंग सुरूच आहेत, पण किंगफिशर देशोधडीस लागल्याचा सगळ्यात जास्त फटका प्रवाशांना व त्यांच्या कर्मचार्‍यांना बसला आहे. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरचे काय होणार याची सर्वाधिक फिकीर लागली आहे ती अर्थशास्त्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांना.

विषय: 

शून्याचा शोध नक्की कुणी लावला

Submitted by नरेंद्र on 7 November, 2011 - 03:41

शुन्याचा शोध भारताने लावला असे शाळेत सांगितले होते. पण नुकतेच वाचले की तो शोध अर्बी लोकान्नी लावला होता. भारतात आर्यभटाने शुन्य शोधुन काढले असे वाचून अभिमान वाटला होता. विमानाचा शोधही एका भारतातल्या माणसाने खुप पुर्वी लावला होता. पण ते क्रेडीट राईट ब्रदर्सला गेले. तसेच शुन्याच्या शोधाचे झाले असेल का ? सर्च इंजिनवर सर्च केल्यावर शुन्याचा शोध अरबान्नी, ज्युन्नी व भारतियान्नी लावला अशा लिन्क्स येतात. म्हणजे शून्य नक्की कुणी शोधले होते ? तुम्हाला काय वाटते ?

विषय: 

टगे (गीरीचा) पराभव

Submitted by विजय आंग्रे on 18 October, 2011 - 01:16

खडकवासला पोटनिवडणुकीत पैसा, सत्ता आणि टगेगिरीचा पराभव झाला आहे. शिवसेना-भाजप व रिपाइं महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांना घरीच बसवले व स्वत: विधानसभेत पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुरती लाज खडकवासला निकालाने गेली आहे. फक्त पैसा व टगेगिरीच्या जोरावर राजकारण करता येत नाही, निवडणुका जिंकता येत नाहीत हाच इशारा खडकवासल्यातील शहाण्या मतदारांनी अजित पवारांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ३,६२५ मतांनी पराभव केला.

विषय: 

महालेखापरीक्षण कितपत संवेदनाशील आहे?

Submitted by गामा पैलवान on 3 October, 2011 - 08:03

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

Submitted by अभय आर्वीकर on 26 September, 2011 - 01:03

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

जनलोकपाल बिल - सर्व भारतीयांना शुभेच्छा!

Submitted by केदार on 27 August, 2011 - 22:57

जनलोकपालबिल पास होणार. आज अण्णा १० वाजता उपोशन सोडणार. अण्णांनी हे सर्व करून दाखविले. सर्व भारतीयांना शुभेच्छा!

आता वाट लोकपाल नियुक्त होण्याची .. तो पर्यंत हा क्षण साजरा करायला काय हरकत? जय हो!

अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

Submitted by उदयन. on 16 August, 2011 - 02:52

http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669

अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे...
दोघांचे अवलोकन करण्यात यावे..
यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे
१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो

विषय: 

सुपरसेन्सॉरशिप : आरक्षण या चित्रपटाला विरोध बरोबर कि चूक ?

Submitted by मथुरादास दावणगिरी on 10 August, 2011 - 04:18

सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला आरक्षण हा पिकचर काही नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या वर ही सुपरसेन्सॉरशिप असावी का ? सेन्सॉर बोर्ड नीट काम करते असे वाटते का ?

अति

Submitted by डी.आर्.खैरे on 15 July, 2011 - 12:21

*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .

पुन्हा पुन्हा स्फोट, दरोडे, बलात्कार

Submitted by Kiran.. on 13 July, 2011 - 12:20

महाराष्ट्राचं गृहखातं काय करतंय ?

मुंबईत पुन्हा स्फोट झाले. दहशतवादी कारवायांना पोलीस पुरे पडू शकत नाहीत हे १००% मान्य. पण म्हणून काय एकदाही त्यांना होणारी घटना थांबवता येऊ नये ? किंवा इतक्या घटना घडूनही पाळंमुळं खणून काढता येऊ नयेत ?

तीनच दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली. वडिलांच्या दहाव्याला आलेल्या विवाहीत मुलींवर सर्वांदेखत बलात्कार करून अंत्यविधीसाठी जमवलेल्या पैशांवर दरोडा घातला गेला. गृहमंत्र्यांनी आज पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचं कबूल करून पोलिसांना निलंबित केलं. पण पुन्हा त्यांना सेवेत घेतलं जाणार नाही कशावरून ?

Pages

Subscribe to RSS - राजकारण