प्रादेशिक पक्ष आणि फाजिल अस्मिता

Submitted by उडन खटोला on 20 October, 2014 - 10:09

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॉंग्रेस-मुक्त भारताचे स्वप्न साकार होताना दिसत आहे,ही अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याचबरोबर फाजील प्रादेशिक अस्मिताना पायबंद घालून प्रादेशिक पक्षांचे कंबरडे मोडणे देखील अपेक्षित आहे . याचे कारण गेल्या 20-25 वर्षात प्रादेशिक पक्षांच्या लांगूलचालन करीत कसेबसे केंद्रसरकार् चे पांगूळगाडे हाकणारे दुर्बल पंतप्रधान भारताला पहावे लागले .
दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचा सुद्धा नायनाट झालाच पाहिजे . करुणानिधी आणि जयललिता आपल्या बापाची जहागीर असल्यासारखे तामिळनाडू ला लुटत आहेत , मला भेटलेले कित्येक तामिळी त्याबद्दल खंत व्यक्त करतात , त्यात पुन्हा हिन्दी-द्वेष ,त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला सुरुंग लागतो तो निराळाच ! प्रादेशिक पक्षांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही !
भारत देश म्हणून टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर फाजील प्रादेशिक अस्मिताना खतपाणी घालून चालणार नाही ,आज ईशान्येकडील राज्यांमध्ये भारताविषयी भावनिक दुरावा आहे ,उद्या त्याची परिणीती वेगळे राष्ट्र मागण्यात होऊ शकते . केरळ मध्ये तर इस्लामिक स्टेट वाले सक्रिय आहेतच ,त्यात आता औवेसी महाराष्ट्रात देखील हातपाय पसरू लागला आहे. ह्या धोकादायक परिस्थिति चा विचार करता एक देश आणि राष्ट्रीय पक्ष यांना महत्त्व दिलेच पाहिजे. अन्यथा भारताचा रशिया व्हायला वेळ लागणार नाही...

(आधारित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता एवढं साधं सोप्पं पण 'आधारित' असावं लागतं?
आधारित म्हणजे काय? कशावर आधारित? ज्याच्या लिखाणावर आधारित त्याची परवानगी घेतली का?

काँगेस आणि सगळ्या सो-कॉल्ड सेक्युलर पार्ट्यांनी अशी नॉन सेक्युलर पार्ट्यांची 'विषवल्ली आम्हा सोयरी' म्हणून कवटाळली आहे पण ह्या विषवल्लीचा नायनाट काही एका रात्रीतून होणार नाही आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या अस्त्राने तर आजिबातच नाही. ह्यासाठी भाजपने फ्लॉड आयडिओलॉजी असलेल्या नेत्यांच्या 'सेपरेटिस्ट' मानसिकतेने प्रभाव पाडलेल्या प्रादेशिक जनता समुहातील लोकांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा धोका ओळखून जाणीवपूर्वक मंत्रिमंडळामध्ये त्यांचे काही नेते सामावून घेणे नितांत गरजेचे आहे. पण असे नेते घेतांना भाजपचा काँग्रेस होऊ नये म्हणून, विकासाचा आरसा दाखवणारे स्ट्राँग लीडर्स भाजप मधूनच तयार केले पाहिजेत जे त्या प्रादेशिक जनतेचे नेते बनू शकतील. पुढे जाऊन अश्या भाजपप्रणित नेत्याचीही 'सेपरेटिस्ट' मानसिकता ऊदयास आली की त्याला बाजूला सारून त्याची जागा घेणार दुसरा नेताही तयार पाहिजे पण हे सगळे भाजपच्या बॅनर खाली झाले पाहिजे.

राज्यांची रचना भाषिक आधारावर झाली असताना (जी योग्यच आहे) प्रादेशिक अस्मिता ओघाने येणारच .. त्यामुळे फाजील प्रादेशिक अस्मिता हे विशेषण तेथील जनतेसाठी नसावे अशी अपेक्षा Happy

तुम्ही म्हणता जवळपास तश्याच प्रकरची मोगलाई अमेरिका आणि बर्‍याच राष्ट्रांमध्ये आहे आणि त्या मोगलाईने ह्या राष्ट्रांना मागासचा बनवण्याचा खूप प्रयत्न केला पण चुकून ते विकसित झाले.

अहो प्रादेशिक पक्ष, मग त्यांची विधानसभेच्या जागांच्या बदल्यात राष्ट्रीय पक्षाशी लोकसभेच्या जागांसाठी आघाडी, युती किंवा नुसताच आतून बाहेरून पाठिंबा, गुन्हेगारी कारवायांपाई गुंतलेले हितसंबंध, केंद्रातलं अडवाअडवीचं राजकारण ह्यापाई देशाचं वाटोळं होतांना, तुमची ऊमेदीची दशकेच्या दश्के तुमच्या डोळ्यादेखत वाया जात आहे आणि तरी तुम्ही म्हणता राष्ट्रीय पक्ष सोडून प्रादेशिक पक्ष पाहिजेत कमाल आहे.

लालू यादव आणि पप्पू यादव, समोर मुजरा चालू असतांना आंतरराष्त्रीय अणू करारावरून अडचणीत आलेल्या कॉग्रेस सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव पाडायचा की तारायचा ह्यासाठी किती देणार किती घेणार ह्याची चर्चा करतात, आणि तुम्ही दिवाळीतला ऊपकार म्हणून भारनियमन जरा कमी करून तुमच्या पर्यंत अव्वाच्या सव्वा किंमतीत पोहोचवलेली वीज वापरून की बोर्ड बडवत आहात 'प्रादेशिक पक्ष वाचले पाहिजेत'. धन्य आहे.

हो मागचे सरकार नव्हतेच धुतल्या तांदळासारखे (नव्हे तांदुळही पोखरणार्‍या किड्यांचेच सरकार होते ते) म्हणूनच टराटरा खेचले लोकांनी.
आणि आता मनसे, राष्ट्रवादी, आयएनएलडी सारख्या प्रादेशिक पक्षांचीही तीच गत होत आहे. सेना सध्या तरली पण लागेल तिचाही नंबर लवकरच.

ए राजांबद्दल मनमोहन सिंगानीच काय म्हणून ठेवले आहे ते ऐका की राव जरा.

१) राजिव गांधींच्या खुन्याची फाशी माफ करा.
२) गुरु अफजल ला फाशी देऊ नका

अश्या मागण्या प्रादेशीक पक्ष करतात. हे योग्य नाही.