राजकारण

दैनंदिन जीवनात,...

Submitted by vishal maske on 16 March, 2015 - 08:58

कधी मनं खवळले जातात
कधी मनं कळवळू शकतात
कधी विरोध उफाळले जातात
कधी विरोध मावळू शकतात

परिस्थितीचा आढावा घेत
कधी शाब्दिक उधाण असावेत
तर बदलत्या परिस्थितीनुसार
कधी वाणीवर लगाम असावेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१६/०३/२०१५ दै. प्रजापत्र

शब्दखुणा: 

दिमापूर रेप केस - खरं काय ?

Submitted by बाळू पॅराजंपे on 10 March, 2015 - 07:26

दिमापूरमधे लोकांनी एका बलात्कारी आरोपीला कोठडीतून खेचून ठार मारलं अशा बातम्या होत्या. त्या आरोपीचं तहे सूचित करत होतं की तो कोणत्या समाजाचा आहे. त्यातच मिडीयाने तो बांग्लादेशी असल्याचा निवाडा सुद्धा केला. लोकांनी पण मीडीया ट्रायल वर विश्वास ठेवला. या घटनेतून कुणाचा काय फायदा झाला हे अलाहिदा. पण आता या घटनेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्हं उभी राहीली आहेत.

शब्दखुणा: 

चुनावी जुमला म्हनजे काय?

Submitted by बाळू पॅराजंपे on 9 March, 2015 - 04:48

सगळीकडं चुनावी जुमला चुनावी जुमला चुनावी जुमला चुनावी जुमला असा जयघोश चालु आहे. याचा अर्थ काय ? काही काही मेसेजेसवरुन याचा अर्थ खोत बोलले असा असतो का ?

विषय: 
शब्दखुणा: 

सोमाटणे फाट्याच्या टोलवर आपण टोल भरता का?

Submitted by नितीनचंद्र on 23 February, 2015 - 00:28

आज टी व्ही ९ या चॅनल वर एक सनसनाटी बातमी ऐकायला मिळाली. सोमाटणे फाटा देहुरोड - जुना मुंबई - पुणे रोड या ठिकाणी आकारला जाणारा टोल २००८ सालापासुन जे काम पुर्ण करुन आकारला जाणे आवश्यक होते ते काम पुर्ण न होताच आकारला जातोय.

निगडी चौक ते टोलनाका हा साधारण ६ किमी चा रस्ता चौपदरी होणे आवश्यक होते. हे काम पुर्ण न करताच आधीच्या सरकारने हा टोल आकारायला परवानगी दिली आहे अशी धक्कादायक माहिती याच भागात रहाणारे आर टी आय कार्यकर्ता श्री आगरवाल यांना या कायद्याच्या अंतर्गत मिळाली आहे.

यामागे स्थानिकांचा विरोध किंवा याच भागात असलेली डिफेन्स ऑफिसेस च्या परवानग्या ही कारणे असु शकतील.

शब्दखुणा: 

आर आर उर्फ आबा पाटील यांचे निधन

Submitted by नितीनचंद्र on 16 February, 2015 - 07:07

गेले १० वर्षे राज्याचे गृहमंत्री आणि त्या आधी ग्रामविकास मंत्री म्हणुन आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आर आर उर्फ आबा पाटील यांची तब्येत चिंताजनक आहे.

टाइम्स ऑफ इंडिया च्या एक तासापुर्वीच्या न्युज प्रमाणे ते सध्या मुंबईला अ‍ॅडमिट असुन लाईफ सपोर्टवर आहेत.

त्यांच्या तब्येत सुधारावी यासाठी प्रार्थना.

MUMBAI: Former Maharashtra home minister and senior NCP leader RR Patil, who has been undergoing treatment for oral cancer, is in critical condition and on life support, a doctor attending on him said here on Monday.

शब्दखुणा: 

दिल्लीला पुर्ण राज्य दर्जा: केजरीवालयांची मागणी, रास्त की एक पळवाट ?

Submitted by रमाकांत कोंढा on 14 February, 2015 - 08:31

निवडणुकीचे निकाल आल्या आल्या केजरीवाल व त्यांच्या टिम ने केंद्र सरकारला भेटून दिल्लीला पुर्ण राज्य देण्यासंबंधी मागणी केली.

आता पर्यंत दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश म्हणुन माहीती होती. मध्ये मध्ये दिल्लीला राज्य व्हावी अशी मागणी होत होती. पण त्याला पुर्णत: मान्यता मिळालेली नव्हती. गेले बरीच वर्षे दिल्लीत आणी केंद्रात काँग्रेसचे सरकार असुनही हा महत्वाचा निर्णय त्यावेळच्या संपुर्णपणे जनसेवेला वाहीलेल्या, सतर्क अश्या सरकार ने कधीही घेतला नाही. याचा अर्थ हा प्रश्न जनतेच्या प्रगतीशी पर्यायाने देश्याच्या भविष्याशी जोडलेला नसावा !!

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व

Submitted by चौकट राजा on 13 February, 2015 - 13:33

ओबामांच्या भारतभेटी दरम्यान त्यांनी भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व देण्यास पाठिंबा दर्शवला. भारतही ते सदस्यत्व मिळण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. माझ्या माहितीप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीन वगळता बाकिच्या सर्व सभासद देशांनी भारताला कधी ना कधी कायम सदस्य होण्यास अनुकूलता दर्शविली आहे व केवळ चीन च्या विरोधामुळे ते झालेले नाही.

विषय: 

दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ

Submitted by नितीनचंद्र on 10 February, 2015 - 08:30

आज लागलेल्या निकालाने राजकारणात अनेक अन्वयार्थ नव्याने दिसत आहेत. निकालाने नविन उच्चांक निर्माण झाले आहेत हा भाग आणखी वेगळा आणि आश्चर्यकारक आहेत.

१) आम आदमी पार्टी ५५ % मते आणि ९६ % जागा मिळवुन सत्तेवर येत आहे. आजकाल हे % प्रथमच पहाण्यात येत आहे.अश्याप्रकारे प्रथमच जागा आणि % या दोन्ही स्तरावर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे.
२) ३३% मते मिळवुन भाजपला फक्त ४ टक्के जागा मिळवौन भाजप दिल्लीत हारला आहे.
३) दिल्लीला प्रथमच नविन पक्षाला एक वर्षाच्या अंतराने जनतेने पुन्हा कौल मिळाला आहे.
४) तिसरा पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत जनतेने संपुर्णपणे नाकारले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण