आठवणीतील निवडणूक प्रचार घोषणा ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2014 - 13:31

नव्वदीचे मजेशीर दशक .........

ताई माई अक्का,
विचार करा पक्का ..
आणि हातावर मारा शिक्का !

विळा हातोडा तारा, यावर शिक्का मारा !

लक्षात ठेवा,
आमची निशाणी
धनुष्यबाण .. धनुष्यबाण .. धनुष्यबाण

अरे हा आवाऽऽज कोणाचा
....... शिवसेनेचा !

एक जलेबी तेल मे
अमुक तमुक जेल मे ..

गली गली मे शोर है
अमुक तमुक चोर है ..

..
..

जुन्या जाणत्या लोकांनी भर टाकावी ..
आठवणी जागवाव्यात..
बिनधास्त ..
काल निवडणूका संपल्या आहेत Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे का रंजले गांजले; त्यांसी म्हणे जो आपुले|
तोचि मधु मोरे ओळखावा; नगरसेवक तेथेचि जाणावा||

वोह तूफां है वोह आंधी है,
नाम राजीव गांधी है !!

आजच्या तारखेला इथे राहुल गांधीही टाकू शकता ..................... आपल्या रिस्कवर Wink

अरे बघतोस काय रागाने, पंजा मारलाय वाघाने!

अरे येऊन येऊन येणार कोण, अमुक तमुक शिवाय आहेच कोण!

पूर्वी (कदाचित अजूनही असेल) पहिली-दुसरीच्या बालभारती मधे काना-मात्रा-वेलांट्या नसलेली "जगन कमळ बघ" टाईप वाक्ये असत. त्यातच फेरफार करून पूर्वी भाजपवाले "शरद कमळ बघ" वगैरे लिहीत भिंतींवर.

आमच्या येथे नगरसेवक निवडणुकीत "काका" म्हणून ओळखले जाणारे एकजण उभे होते. त्यांची स्लोगन
"समय आया बांका,
चुनके दो ___ काका"
(हेच मराठीत समय आला बाका, निवडून द्या... असे होते)
अशी भिंतीवर लिहीलेली निवडणुकीनंतर अनेक वर्षे तशीच होती. जवळजवळ १००% मराठी वस्ती असलेल्या त्या मनपा वॉर्ड मधल्या नगरसेवकाची घोषणा हिन्दीत सुद्धा का होती याचे आता आश्चर्य वाटते.

आमचा एक कुंजीर आडनावाचा मित्र निवडणुकीला उभा राहणार हे आम्हीच ठरवले होते व त्याची स्लोगन केली होती

इश्काचं अंजीर, ___ कुंजीर!

इश्काचं अंजीर, ___ कुंजीर! >>>> Lol Wink Proud Rofl

मला वाटत शिवसेनेची बजाव पुंगी हटाव लुंगी अशी काहीशी घोषणा होती

देव दिनाघरी धावला
जनसंघ जनतेला पावला

ही घोषणा पुण्यात अनेक वर्ष बहुदा शनीपारापाशी लिहलेली अनेक वर्ष दिसत होती.

त्यानंतर जनता पक्षाच्या काळात

नांगरधारी शेतकरी
लोकसभेचा मानकरी

" नका विसरु गाय वासरु" (दुसर्‍या दिवशी कोणी तरी 'नका' चे 'नक्की' असे करुन टाकत असे ! काँग्रेसला मते द्या ह्यातल्या 'मते' चे याच पद्धतीने काय होत असेल हे मी लिहून सांगायला नको !!)

खूप पूर्वी कै . र. के. खाडिलकर निवडणूकीला अभे राहत , तुव्हा भिंतींवरच्या 'र. के.र' चे 'र ड के' करण्यात मजा यायची !

"मताला तुझ्या हिताला कॉंग्रेस आलीय दाराला.." हे कवन फार सुंदर चाल लावून म्हणले जात होते.

" राजू तेरे शासन मै भुस्सा मिलता राशन में" हे रा़जीव गांधी साठी

"आई ग वैतागले बाई या इलेक्शन ला.. अग मग काँग्रेस ला मत दे ना..तू लहान असल्या पासून मी काँग्रेसलाच तर मत देत आहे"

"काय झाले ? ईलेक्शन आल्या.. अग मग काँग्रेस ला मत दे ना..तू लहान असल्या पासून मी काँग्रेसलाच तर मत देत आहे

"कोइ कहता है अमन बदला है कोई कहता है चमन बदला है , लेकिन लाश वहीं है सिर्फ कफन बदला है" - हे १९७७ च्या जनता पक्षा विरुद्ध होते आणि त्यात तथ्य ही होतेच म्हणा !

".... दुकान मै कोई तेल नहीं.. वक्त पे कोई रेल नहीं ... आपस मैं कोई मेल नहीं ... राज चलाना कोई खेल नहीं !" हे १९७७ च्या जनता सरकार च्या विरुद्ध होते आणि त्यात तथ्य ही होतेच म्हणा !

कै. वसंतराव जेव्हा विधानसभा (१९७८) लढवत होते तेव्हा "आपण वसंतदादांना पाडू शकता' एव्हढेच लिहलेल्या पट्ट्या सह्याद्री , महालक्ष्मी , महाराष्ट एक्स्प्रेस च्या प्रत्येक डब्यावर चिकटवलेल्या बघितल्यात मेसेज मुंबई पासून पार नागपूर गोंदिया पर्यंत पोहोचायचा !

" नका विसरु गाय वासरु" >>>> ही घोषणा "गाय वासरू, नका विसरू" अशी होती.

पुर्वी कुलाबा मतदारसंघातुन(आताचा रायगड मतदारसंघ) लोकसभेला काँग्रेसचे बॅ. अ.रे. अंतुले आणि शेकापचे प्रा. दि.बा. पाटील असा सामना असताना घरांच्या भिंतीवर रंगवलेली घोषणा"हे पहा झोपलेत गाढ पाटील डी.बी. , कोकणासाठी ह्यांनी केले नाही काय बी" घोषणेच्या वर खटार्‍यात झोपलेल्या माणसाचे चित्र असायचे(शेकापची निशाणी खटारा होती).

काँग्रेसच्या विरोधकांची घोषणा "हाथ करेल घात, देऊ नका हाताला साथ"

एक घोषणा राहिलीच

वारे इंदिरा ( नावे बदलुन घोषणा दिल्या जायच्या ) तेरा खेल
सस्ता बेवडा महंगा तेल

ते रिक्षावाले आणि स्पीकरवाले बिचारे बेकार झाले आता.. एक जुनी रिक्षा. तिला लांब नळक्याचा स्पीकर.. आत मध्ये एक माइक वर बोलनारा.. ताइ माइ आक्का धुनुष्या वर मारा शिक्का.. एक दोन तीन चार शिवसेनेचि पोरे हुशार.. माझ बालपण कोकणात दापोलित गेल आणि दापोली हा शिवसेनेचा कायम बाले किल्ला होता.. आणि आवर्जुन बाळासाहेबांच एखाद भाषण त्या काळात आझाद मैदानावर. लोक १० वाजल्यापासुन भाषण ऐकाला येवुन पोहचत.. पुर्ण मैदान फुल.. ते कायम ३/४ तास उशिरा येत पण लोक तिथेच वाट बघत भर उन्हात.. आणि हाच बाळा साहेबांचा करीष्मा तेव्हा भाव खाउन जायचा. मग ते मुक्त पणे १/१.३० तास बोलत.. सर्व लोक मंत्र मुग्ध. त्यांच्या सभांना कधी भाड्याने मानसं आनावी नाही लागलि दापोलित.. निवड्णुकीच्या दीवशी आम्हि पण शिवसेनेच्या बुथ वर बसायला.. कारण ते शिवसेनेच्या झेंडे, प्लस्टीकचे छोटे धुनुष्य हे संध्याकाळि घरी न्यायला मिळायचे. आणि त्या वेळेला त्या गोष्टींच फार आकर्षण होत.. कारण नैसर्गीक खेळणि फार होति. पण हे क्रुत्रीम काहि तरी शाळेत मीत्रांना दाखवयाला.. आणि एखाद्/दुसरा वडापाव दुपारी खायला. तेवढ्या साठी दीवस भर बुथ वर बसयाला. वेगळेच दिवस..

नकळतच शिवसेनेशी एक गाठ बालवयातच मनात बांधली गेली.. त्यात दापोलित कोब्रां चा प्रभाव जास्त त्यामुळे संघाच्या शाखा ही तेवढ्याच.त्यामुळे एक खाकी हाफ चड्डी आणि एक काठी घेवुन शाखेत.. संध्याकाळी हक्काच खेळण्याच ठीकाण. गोल् रींगन त्यात खेळ. मग प्रार्थना. त्यामुळे काहि औषी सघांचा हि प्रभाव..

पण तो काळ, ते दीवस... ती मानसे सगळच जादुमय..

ह्या वर्शी काहि खरे नाहि दापोलीत.संघ आणि सेना दोघही आमने सामने..त्यात तिसराच कोणि आला नाहि म्हंजे झाल....

कोकण्या,
आपले वाचून माझेही बालपण आठवले Happy
शिवसेनेचा वडापाव हादडून झाल्यावर शर्टाच्या खिशाला लावलेले प्लास्टीकचे धनुष्य लपवून काँग्रेसच्या टेबलावर पावभाजी आणि पुलाव खायला जायचे.

अवांतर - भगवा गोलाकार बिल्ला आणि त्यात सोनेरी रंगाचे धनुष्यबाण, हल्ली हे मिळते का हो कुठे?

धुळ्याला पूर्वी रेश्मा भोये नावाचे एक मौनी (पुरुष) खासदार निवडून येत असत. त्यांच्या विरोधातली एक घोषणा
'' ओये ओये, रेशमा भोये, पांच साल कहां खोये ""

भिंती रंगवलेल्या परवडल्या इतकी ती होर्डिंगं सगळी शहरं, गावं, मोहल्ले, गल्ल्या, फ्लायओव्हर्स आणि अजून काय असेल ते कुरुप करत असतात.

प्रचाराची नाही पण ७७ साली जेव्हा मृणाल गोरे लोकसभा निवडणूक जिंकल्या आणि इंदिरा गांधी पडल्या तेव्हाची घोषणा अजून आठवते!

पानिवाली दिल्लीमे... दिल्लीवाली पानीमे.

>>सांग जा पंजा आलाय.<<
हम्म... निवडणुकीच्या घोषणेपेक्शा रतन खत्रीची जाहिरात जास्त वाटतेय... Wink

१) जिलेबी जायेगी तेल में अमुक तमुक जेल में

२) तंदुरुस्ती कि रक्षा करता ही लाईफ बॉय | लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती है वहा || च्या चालीवर :-

गुंडागर्दी कि रक्षा करता है कॉंग्रेस आय |
कॉंग्रेस आय है जहा गुंडागर्दी है वहा ||

३) महाराष्ट्र का नेता कैसा हो अमुक तमुक के जैसा हो

४) स्थिरता कि आंधी राजीव गांधी (यावर प्रमोद महाजनांनी छान टिपण्णी केली होती)

५) निवडणुकीत पैसे वाटूनही शेवटी उमेदवार पडला की

पैसा पसरला , xxx घसरला

काही घोषणा ...आणखीही
अभविप च्या फी वाढ विरोधी आंदोलनातली
उठ मित्रा उगार मुठ..!!
शिक्षणाच्या बाजारातील तुच थांबव तुझी लुट....!!!
पैसा फेक , पदवी घे... जमत नसेल काहीच तर कॉलेज समोर जाळुन घे...

या काळात विनोड तावडे अभाविप मुंबै महानगर मंत्री, आशिष शेलार ,पराग अळवणि, कार्यकारणी सदस्य होते....

राम मंदीर आंदोलनांतरच्या काळातील ...
राम लल्ला हम आयेंगे , मंदीर वही बनाअएंगे .
तलवार निकली हे म्यान से मंदीर बनेगा शान से

त्या काळात कळवा -मुंब्रा हे रेल्वेचे अंत्र , रात्रभर वॉल पेंटीग करत , घोष्णा लिहीत जायचो ...
११.०० ते पहाटे ५.००

जेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी नरेन्द्र मोदी हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकरिता आव्हान नाहीत असे सांगितले तेव्हा आंतरजालावरील प्रतिक्रियेत एका वाचकाने दिलेली ही प्रतिक्रिया

हाथ पेर मे दम नही हम किसी से कम नही

http://navbharattimes.indiatimes.com/india/kejriwal-and-modi-not-a-chall...

अर्थात ही बरीच जुनी घोषणा आहे.

http://books.google.co.in/books?id=EvduPCCWVEUC&pg=PA242&lpg=PA242&dq=%E...

या जुन्या विस्मृतीत गेलेल्या घोषणेला पुन्हा उजाळा देण्याचे श्रेय महिला शास्त्रज्ञ डॉ अनिता शुक्ला यांच्याकडे जाते.

https://www.facebook.com/BharatiyaYoddhaSamuha/posts/185665281577833