बेळगाव झाले बेळगावी

Submitted by हतोडावाला on 18 October, 2014 - 02:15

महाराष्ट्राच्या निवडणूका आटपून दोन दिवस उलटत नाही तिकडे मोदी सरकारने सात आठ वर्षा पासून भिजत पडलेले बेळगावचे घोंगळे निकाली काढले. आता बेळगावचे नाव बेळगावी झाले.
मराठी माणसाच्या बेळगाव नावाच्या जखमेवर अनेकानी फुंकर घालून स्वतःचे राजकीय बस्तान बसविले तर सत्ताधा-यानी अनुल्लेख व उदासीनता दाखवत ही जखम भळभळती सोडली. प्रत्येकानी बेळगाव मुद्याचे आजवर स्वतःसाठी वापर केले असेच दिसते. आज मोदीशेठनी तर मराठी माणसाच्या भावनेला फाट्यावर मारत चक्क कानड्यांच्या मागणीला रातोरात मान्यता देऊन टाकली. हे काम करायचेच होते तर मोदीनी १५ तारखेच्या आधी हिंमत दाखवायला हवी होती. ती दाखविली नाही याचा अर्थ मराठी माणूस बेळगावच्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया देऊ शकतो याची मोदीला जाण होती. याचा अर्थ मोदिनी विचार पुर्वक मराठी माणसाशी डाव खेळला. प्रश्न असा पडतो की दिल्लीतले नेते मराठी माणसाला एवढी दुय्यम वागणूक का देतात? काँग्रेस असो की भाजप, दिल्लीतल्या नेतृत्वाने नेहमीच मराठी मनाची व भावनेची खिल्ली उडविली. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी तर कर्नाटकाची ६ कोटी. अकरा कोटी लोकं नेमकी कुठे कमी पडतात म्हणून सहा कोटी कानडी दिल्ली दरबारी आपल्याला मात देऊन जामात? मोदी वा काँग्रेसीनी नेहमी तुलनेने कमी असलेल्या कानड्यांची बाजू घेतली यामागे कानड्यांचे बळ आहे की मराठी माणसाची मागणीच अवास्त असून कानड्यांचि बाजू सत्य आहे ते कळेनासे झाले.

आता विदर्भाची पण वाटणी करुन मोकळे व्हा!

असो.

भाजप व मोदीचा निषेध!
(आपण यापेक्षा जास्त काय करु शकतो!)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=1&section=top-stories

छत्रपतींचे आशिर्वाद मोदीना द्या ! मोदीना मत द्या !

मोदीनी महाराष्ट्राचा कोथळा काढला !

मोदीप्रेमी कुठे गेलेत ?

मी महाराष्ट्राचे तुकडे पडु देणार नाही .. मोदीजी !

Proud

अडकलेले असे बरीच निर्णय, योजना, घोषणा आता निवडणूकीनंतर बाहेर पडणार आहेत.
२०१९ ची वाट बघूया आता. आणि तोपर्यंत आपली अस्मिता टिकवण्यात यश मिळवूया.

मला सांगा बेळगाव जेव्हा बेळगाव होते तेव्हा तरी ते महाराष्ट्राचे होते का? समजा बेळगावचे बेळगावी करुन लोकांच्या मनातील महाराष्ट्राबद्दलचे प्रेम कानडी सरकारला पुसता येणार आहे का?

अय्ययो, हे काय करुन सोडले म्हणते मी. ते कोण ते शेक करुन सोडणारे शेक्सपीअर म्हणून गेले ना की नावात काय असते, तसेच झाले की वो. बेळगाव काय न बेळगावी काय, नावात फरक पडला, माणसात पडला नाय की वो.

बॉम्बेचे मुम्बई होऊन पण मराठी लोक त्येला अजून बॉम्बेच म्हणतात ह्या कर्माला काय म्हणावे वो? ( मी सध्या कुम्पणावर आहे, वारा आला की बघु)

आणी शक्य असेल तर बर्‍याच देशान्च्या एम्बसीत इन्ग्लिश, हिन्दी आणी गुजरातीत सुचना असतात, ते ही मुम्बईच्याच एम्बसीत हो. तिथे मराठी फलक लावता आला तर बरे, काय!

मला सांगा बेळगाव जेव्हा बेळगाव होते तेव्हा तरी ते महाराष्ट्राचे होते का? समजा बेळगावचे बेळगावी करुन लोकांच्या मनातील महाराष्ट्राबद्दलचे प्रेम कानडी सरकारला पुसता येणार आहे का?
>>>>>

एक सहज,
उद्या भारताचे नाव बदलून इस्लामाबाद केले, आणि महाराष्ट्राचे नाव बदलून दक्षिण बिहार केले, तर ते आपल्याला घ्यायला आवडेल? आपला पत्ता म्हणून सांगायला आवडेल? मेरा भारत महान आणि जय महाराष्ट्र या घोषणांमध्ये आपल्याला वरीन दोन नावे टाकायला आवडतील?

ता.क. - इस्लामाबाद आणि दक्षिण बिहार ही नावे अगदी काहीच्या काही वाटली तरी त्यावर लक्ष न देता मुद्दा लक्षात घ्या. ते सोयीने जे आठवले ते टंकले. आपल्या गाव-शहर-राज्याचे नाव कसे आपल्या अस्मितेशी जोडले गेलेले असते हे दाखवण्यासाठी ..

बरंय नाव बदललेल ते. त्या बेळगांवच्या स्पेलिंगपायी अख्ख्या देशामधून बेल्जियमला जाणारे पोस्ट पार्सलं बेळगांवात पोचत होती.

मला कसलीच अस्मिता वगैरे नसल्यानं महाराष्ट्राचं नाव बदलून कर्नाटक केलं आणी कर्नाटकाचं नाव बदलून रत्नागिरी केलं तरी फरक पडत नाही Proud

एक सहज,
उद्या भारताचे नाव बदलून इस्लामाबाद केले, आणि महाराष्ट्राचे नाव बदलून दक्षिण बिहार केले, तर ते आपल्याला घ्यायला आवडेल? आपला पत्ता म्हणून सांगायला आवडेल? मेरा भारत महान आणि जय महाराष्ट्र या घोषणांमध्ये आपल्याला वरीन दोन नावे टाकायला आवडतील?

ता.क. - इस्लामाबाद आणि दक्षिण बिहार ही नावे अगदी काहीच्या काही वाटली तरी त्यावर लक्ष न देता मुद्दा लक्षात घ्या. ते सोयीने जे आठवले ते टंकले. आपल्या गाव-शहर-राज्याचे नाव कसे आपल्या अस्मितेशी जोडले गेलेले असते हे दाखवण्यासाठी ..

>>>>> ऋन्मेऽऽष, येथे ही उपमा किंवा संदर्भ out of context आहे असे वाटत नाही का?

अस्मिता शाळेत असतांना आवडायची. आणि ती बेळगांवची नव्हती. >>>> आता ती झी मराठीवर महिला गुप्तहेर म्हणुन काम करते - दर बुधवारी व गुरुवारी.

नंदिनी,
मला कसलीच अस्मिता वगैरे नसल्यानं महाराष्ट्राचं नाव बदलून कर्नाटक केलं आणी कर्नाटकाचं नाव बदलून रत्नागिरी केलं तरी फरक पडत नाही
>>>>>

नंदिनी ओके, हे आपले विचार झाले. यात चूक की बरोबर असे काही नाही. पण नावाशी अस्मिता निगडीत असते हे तरी आपल्याला कबूल. कदाचित एखाद्याची अस्मिता आपल्या राज्याच्या नावाशी जोडली गेली नसेल पण बरेचदा स्वताच्या नावाशीही जोडली गेल्याचे जाणवते. सोपे उदाहरण द्यायचे झाल्यास इथल्या कित्येकांना त्यांच्या नावाची स्पेलिंग तोडमरोडून किंवा काहीतरी दुसर्‍याच नावाने हाक मारली तर आवडत नाही. एवढेच नव्हे तर अनवधानाने साधीशी शुद्धलेखनाचीही चूक कोणी केली तरी ती संबंधिताकडून लागलीच कर्रेक्ट केली जाते, आणि समोरचाही माफी मागतो, जसे की चुकीचे नाव टाईपने म्हणजे एक मोठी चूकच हे त्यालाही कबूल असते. इथेही आपण युक्तीवाद कराल की मला नाही फरक पडत, तरी फरक पडणारे बहुतांश आहेत हे तर कबूल करालच Happy

...

अतुलनीय
ऋन्मेऽऽष, येथे ही उपमा किंवा संदर्भ out of context आहे असे वाटत नाही का?
>>>>>>

मला तसे नाही वाटत म्हणून तर उदाहरण दिलेय Happy आपण कर्रेक्ट केलेत तर आवडेल.

पण मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर नावाशी अस्मिता निगडीत नसते तर आधीचे नाव नक्की कोणत्या कारणासाठी बदलले?

अस्मिता शाळेत असतांना आवडायची. आणि ती बेळगांवची नव्हती. >>>> आता ती झी मराठीवर महिला गुप्तहेर म्हणुन काम करते - दर बुधवारी व गुरुवारी. >>>>>
Lol

गेल्या महिन्यात " बेळगावी " जाणे झाले, हे वाक्य आता नवीन नावानुसार कसे म्हणायचे ? Wink

कानडी भाषेत "अ" नाही. त्यामुळे ज्या ज्या गावाचा शेवट अ नी होत आहे ते बदलणे आलेच. उत्तर कर्नाटकात अशी बरेच नावे आहेत जी बदलु शकतात. उदा आळंद , कारवार, बिदर , गाणगापुर .....

माझी आई बेळगाव ( वी) ची आणी वडील विजापुर (रा) चे. तसेच बरेच नातेवाईक आजुन ही त्या भागात राहतात.

"Whatsup" बोलताना वर आम्ही जुनीच नावे वापरतो, त्यामुळे तसा काही फरक पडला नाही. जुनी नाव उत्तर कर्नाटक आणी उत्तर भारतिय लोकाना उच्चार करण्य्यात सोपी असल्याने बोली भाषेत काही फरक पडणार नाही.

नावं बदलल्याने काहीच फरक पडत नाही असे लोक या जगात अधिक प्रमाणात असायला हवेत असे माझे मत आहे.
उगं नामांतराचे वाद उभे करून चळवळीच्या नावाखाली हाणामार्‍या करीत होती लोकं पूर्वीच्या काळी.

कानडी भाषेत 'अ' नाही?
ऐ़कावे ते नवलच.
आम्ही आपलं 'अ यिंद अरसा' अशीच भाषा शिकलो हो लहानपणीपासून.

कानडी भाषेत अकारांत म्हणजे 'अ' शेवट असलेले उच्चार करत नाहीत असे म्हणा.
म्हणजे जनरली अ शेवट आला की उ तरी म्हणायचं, आ तरी म्हणायचं असा प्रकार.
लिहिताना शेवटी अकारांत लिहिलं तरी म्हणताना आकारांत म्हणतात.
खास करून स्त्रीयांची नावे. 'शुभ' लिहिलं तरी वाचताना 'शुभा' वाचायचं. (म्हणजे खरं तर ते शुभाच लिहलेलं असतं कानडीत. Happy )

बरं मग ते दक्षिण सोलापूर तालुका, मंगळवेढा तालुका, अक्कलकोट तालुका इ. ठिकाणी गावंच्या गावं एरवी कन्नड भाषिकांची आहेत. तेही 'बिचारे' मराठी शाळांतच शिकतात. त्यांना कन्नड शाळांची सोय नाही. किंवा कुठल्या राज्यात रहायचंय वगैरे विचार करायचीही सोय नाही. खुद्द पंढरपूरचं नाव चांगलं सणसणीत कन्नडी पंडरगे वरून काळाच्या ओघात पंढरपूर झालंय किंवा केलंय. त्याचं काय करायचं?
जाऊदेत की ती गावं तिकडे कर्नाटकात. मग घेऊ बेळगाव निपाणी इकडे Wink

माझ्या माहितीनुसार कर्नाटक शासनाचा प्रस्ताव केवळ बेळगांवच नाही तर बेंगलोर, मेंगलोर, मैसूर अशा इतर शहरांचीं नांवंही मूळ कानडी उच्चाराप्रमाणे बदलण्याचा आहे.

<< मोदीनी महाराष्ट्राचा कोथळा काढला !>> केवळ शहराचं नांव बदलण्याच्या त्या राज्यशासनाच्या प्रस्तावाच्या मंजूरीवर देशाच्या पंतप्रधानांबद्दल ही प्रतिक्रिया ! Sad

बेळगाव हे शहर कोणत्या राज्यात आहे हो?

चुकूनमाकून कर्नाटकात तर नाही ना?

मोदींचे काही सांगता येत नाही. छत्तीसगढवाले म्हणाले म्हणून कोकणचे नांव उद्या तुर्कस्तान ठेवतील.

बंगालीत व शब्द नाही व ला ब करतात
म्हणून हावडा चे हाबडा केले आहे का? या असेच जिथे व आहे ते बदललेल आहे का?

<< म्हणून हावडा चे हाबडा केले आहे का? >> प्रश्न सर्वस्वीं त्या राज्यशासनाचा आहे. कलकत्याचं 'कोलकता' करावसं वाटलंच ना त्याना! बॉम्बेचं मुंबई, मद्रासचं चेन्नई,
झालंच ना. आलंच बेळगावी महाराष्ट्रात तर करूंया ना पुन्हा त्याचं नांव 'बेळगांव'. तो मुख्य प्रश्न भिजत ठेवायचा आणि त्या राज्यशासनाने नांव बदललं तर ' मोदीनी महाराष्ट्राचा कोथळा काढला' ? खरंच अप्रशस्त नाही वाटत ही प्रतिक्रिया ? कीं, माझंच वय होवून मींच कालबाह्य झालोय ?

हावडा लिहिताना बंगालीत व्/ब या अक्षराचा वापर करत नाहीत. হাওড়া हाउडा असं लिहितात आणि उच्चारतातही. एक आणखी हाबडा म्हणून छोटं शहर आहे ते लिहिताना मात्र ब चा वापर करतात. दोन्ही वेगवेगळी ठिकाणे आहेत.

भाऊ, प्रतिसाद पटलाच एकदम Happy

भाऊ प्रतिसाद पटला एकदम. ़आलबाह्य होवोत तुमचे दुश्मन. टुम्ही आम्हासाठी चिरतरुण देव आनण्द ahaat.

बॉम्बेचं मुंबई आणि बेळगावच्या उदाहरणात काहीच फरक नाही का?
याला आणखी काही पार्श्वभूमी नाही का?
बेळगावचा प्रश्न अजूनही सुप्रीम कोर्टात भिजत पडला आहे ना (हे चुकत असेल तर प्लीज कर्रेक्ट करा)

असो, मुंबईवरून आठवले, एकतरी मुंबईकर आहे का ज्याला बॉम्बेचे मुंबई झाल्याने वाईट्ट वगैरे वाटले. ज्याला कोणाला झाला तो आनंदच झाला असेल ना.

असो, पण ईथे मुळात हे नामांतर करावेसेच का वाटले ... या प्रश्नाला कोणीच उत्तर दिले नाही.

संभाजीनगर नामकरण होऊन दीडदोन दशके झालीत पण आम्ही अजून औरंगाबादलाच जात आहोत. एस टी बसेसही अजून १००% संभाजीनगरला जात नाहीत म्हणून सामान्य नागरिकही संभाजीनगरच्या आधी औरंगाबाद स्टॉपवरच ऊतरून राहिले.

पुण्याचं मात्रं पुना असं नामकरण लवकरच करावं लागेल असं दिसतंय.

टॉप डाऊन बदलांनी फार काही फरक पडत नाही. फक्त सरकारी कार्यालयांना स्टेशनरी पुरवणार्‍यांना त्यांच्या पणज्याने शतकापूर्वी बनवलेल्या छपाईच्या ब्लॉकमध्ये थोडाफार फरक करावा लागत असेल तेवढंच काय ते.

कोकणचं कॅलिफोर्निया आणि मालवणचं मेलबर्न असं नामकरण होणार होतं ना त्याचं काय झालं?

नाही तर सरळ आपलं ते दुसर्‍या विदेशी भुमीवरची भारतीय राज्य धाग्याप्रमाणे मुंबईला ईस्ट न्यू यॉर्क, विदर्भाला ईस्ट नेवाडा, कोकणाला ईस्ट कॅलिफोर्निया, पुण्याला ईस्ट मॅसॅच्युसेट्स अशी सुटसुटीत नावं देऊन टाका कायमची.

आमच्या नगरला ईस्ट हवाई म्हणा बरं का.

बेळगाव चं बेळगावी करण्याची मागणी आणि निर्णय कोणाचा होता? जर बेळगावी (हे कसं म्हणायचं आता!) जनतेच्या मागणीने निर्णय झाला असेल तर उत्तमच!
भाऊ, प्रतिसाद (शेवटचं वाक्य वगळून) पटला.
ऋन्मेऽऽष, माझ्या अनेक मुंबईकर (मराठी आणि अमराठी) मित्र मैत्रिणींना नव्हतं पटलं बॉम्बेचं मुंबई झालेलं.

ऋन्मेऽऽष, माझ्या अनेक मुंबईकर (मराठी आणि अमराठी) मित्र मैत्रिणींना नव्हतं पटलं बॉम्बेचं मुंबई झालेलं.
>>>
ईंटरेस्टींग ! यामागचे कारण जाणून घ्यायला आवडेल. बरेचदा न पटण्याचे कारण राजकीयही असते.

पण यावरून एक गंमत बघा हा, बॉम्बे या ईंग्रजाळलेल्या नावाला मुंबई हे नाव जे आधीपासूनच प्रचलित होते ते फक्त अधिकृत करून घेतले. तर ते देखील न आवडणारी मुंबईकर मराठी-अमराठी जनता होती.
तर तेच बेळगाव हे भारतीय भाषेतले नाव, का ते अजून कोणी मला सांगितले नाही, पण बदलले, त्यावर मात्र आक्षेप घेणे अयोग्य Happy

कानडी भाषेत "अ" नाही.>>>> हे कुणी सांगितले तुम्हाला....

'अम्मा'(आई), अज्जी (आजी),अज्जा(आजोबा) हे सगळे अ पासून सुरु होणारे शब्द आहेत.....

बेळगाव चे बेळगावी झाले म्हणून आपल्या नातेसंबंधात काही फरक नाहि पडत ना,झाल तर.....मी अस म्हणतीये कारण मी बेळगाव (बेळगावी) ची आणी सासर महाराष्ट्रात असलेली आहे.असे इथे बरेच जण आणी व्हाईस वेर्सा असलेली मंडळी असतीलच

Pages