अण्णा हजारे, भाजप आणि आंदोलन।

Submitted by ashokkabade67@g... on 31 August, 2021 - 12:53

भ्रषटाचार विरोधी आंदोलन सुरु करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा देत भाजपने अण्णांच्या आंदोलनाचा फायदा उचलत भाजपने सत्ता मिळवली आणि भाजप सत्तेवर आल्यावर अण्णांनी ज्या लाखो करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराची दंवडी पिटली आणि भाजपने सांगितलेले काही ट्रक भरुन असलेले पुरावे अचानक कुठे गेले ते कुणालाच कळले नाही त्यामुळेच कदाचित बिचारी भाजप अनेक भ्रषटाचाऱ्यांना जेलमधे टाकण्याचे आश्वासन पुर्ण करु शकली नाही पण सत्ता मिळाली हेही नसे थोडके पण भाजप सत्तेत आल्यानंतर अण्णांचा आवाजच बंद झाला .स्वताला जनसेवक आणि मोदीजींनी शब्दकोषात नव्याने भर टाकलेल्या आंदोलनजीवी या शब्दामुळे अण्णांनी आंदोलनच काय पण स्वताला समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या यामहान समाजसेवकाने मौन पत्करले महागाई वाढली ,बेरोजगारी वाढली देशातील अनेक उद्योग उद्योगपतींच्या घशात घातले गेले फडणवीस मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण मौनात गेलेल्या अण्णांचा आवाज मात्र जनतेला ऐकु आलाच नाही पण भाजपने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनाची हाक देताच शेतकरी आंदोलनावरही मौन बाळगणारे अण्णा अचानक सक्रिय झालेत पण यांना मोदीजींच्या आदेशाने निघालेली जन आशिर्वाद यात्रा मात्र दिसली नाही विरोधात असतांना महागाईच्या नावाने शंख करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आंदोलनजीवी शब्दाला जागत आंदोलने केली पण जनतेच्या प्रश्नांवर नाहीत तर आत्महत्या केलेल्या सेलेब्रिटी साठी आणि अतिक्रमण पाडण्यात आलेल्या नटीसाठी मग मंदिरासाठी अण्णा व भाजपला लाखो लोक बेरोजगार झालेत महागाई गगणाला भिडल्यामुळे गरीबांचे जीने मुश्कील झाले हे कदाचित दिसलेच नसेल पण मंदिरे बंद असल्याने पुजाऱ्यांचे होणारे हाल पाहुनच अण्णांच्या डोळ्यात आसवे आली आणि त्यांनी त्वरीत आंदोलनाची हाक दिली तसे ते दयाळू आहेत .पण भाजप नेत्यांसह अण्णा हे विसरले की हे मा.मंत्रीमहोदय अमित शहा यांच्या आदेशावरून घडत आहेआज अंजली दमानियांच्या एका प्रश्नाने भाजप नेते भाजप नेते निरूत्तर झाले आणि त्यांनी उत्तर देणे टाळत मौन स्विकारले त्यांची ती सवयच आहे म्हणा अडचणिंच्या प्रश्नांवर मौन पाळण्याची मोदीजींची परंपरा ते पाळत आहेत प्रश्न साधा होता मग राणेंनी एव्हढी मालमत्ता कोठुन जमा केली हेच अंजली दमानियांनी विचारले होते फडणविसांच्या हातात असते तर त्यांनी ताबडतोब क्लीनचिट दिली असती पण हातात नाही ना। अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन कशासाठी व कुणाच्या आदेशावर चालते हे आता जनतेच्याही लक्षात आलेले आहे आणि अण्णांना हे मान्य नसेल तर त्यांनी महागाई ,बेरोजगारी, चालू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रश्नांसाठी आंदोलन करावे ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आंदोलनजीवी शब्दाला जागत आंदोलने केली पण जनतेच्या प्रश्नांवर नाहीत तर आत्महत्या केलेल्या सेलेब्रिटी साठी
>>>>
खरेच की ,सर्वात जास्त आंदोलने तर हेच करत आहेत.

सर्व पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जितकी धडपड करतात, आधीपासून तयारी करतात डावपेच आखतात,पण यातील थोडे प्रयत्न जर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केले तर आपोआप निवडून येतील.

हर हर महादेव !

"लोक्स" धागा "योग्य" वळणावर आणतिलच!!

शुभम् भवतु!

मंदिरे बंद , दारू सुरू

हा केंद्रीय मोदी सरकारचा आदेश आहे , भाजपा राज्यातही हेच आहे

इथे महाराष्ट्रात दारूची दुकान बंद केली तर मंत्र्याने महिन्याला 100 कोटी कसे गोळा केले असते ?
आणि कित्तेक वेळा केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात कोर्टातून थोबाड फोडून घेतलंय ना ?
मग तसेच गल्ल्यावर उदार होऊन दारू दुकान बंद करण्याची ऑर्डर काढायची ना !!

मंत्र्यान पैसे गोळा केले का नाही याची चौकशी चालुच राहील कारण येथे आता अहवाल बासनात बांधुन क्लिनचिट देणारे फडणवीस नाहीत ना पणत्यांनीच क्लिनचिट दिलेल्याखडसेंनी पक्ष सोडताच ईडीची चौकशी का सुरु होते गाडीभर पुरावे आहेत म्हणनारेसदैव किरकिर करणारेकिरीट सोमय्या अजीत पवारांना जेलमधे सडवणार होते पण फडणविसांनी शपथविधी आधीच त्यांना क्लिनचिट का दिली मी तर म्हणतो की फडणविसांनी क्लिनचिट दिलेल्या प्रत्येक मंत्री आमदाराची चौकशीईडीने करावी म्हणजे भाजपचा ब्लँकमेलिंगचा फंडा तरी उघड होईल पण तसे आदेश देणार नाही शेठ असो ,तुम्हाला कुणी सांगितल की दारुची दुकान ,बार फक्त बेवड्यांसाठी उघडले,राज्य सरकारच तर मोठ उत्पन्नाचे साधन आहे ते आधिच केंद्र सरकार जीएसटीचा हिस्सा देत नाही बर सरकारी मालमत्ता विकायची म्हटली केंद्र सरकार सारखी तर तो अधिकार नाही त्यामुळे राज्याचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी उत्पन्न हव ना नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देणार कोठुन का त्यांनीही आत्महत्या कराव्यात ? महागाई वाढत आहे आजच गँसच्या कितमतीत वाढ झाली जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगणाला भिडले त्यवर आंदोलन करावे की अण्णांनी व भाजपने पण करणार नाही कारण आदेश नाही ना ।