परवा आमच्या गणोबाचे लग्न जुळल्याची बातमी उडत उडत आमच्यापर्यन्त पोहचली. बरेच दिवस ताटकळला होता. बातमी ऐकून आनंद वाटला. लग्न जुळत नाही म्हणून मध्यंतरी त्याने अविवाहित तरुणांची बैठक बोलाविली होती. मुली मिळत नाहीत म्हणून बैठकीत गणोबाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्याच्या मित्राने त्याच्या मनसुब्यावर पाणी ओतले होते. निराश गणोबाच्या नशिबात नियतीने मुंडवळया बांधल्या नसाव्यात, असा समज करून घेतला होता. नियती ज्या प्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याच प्रमाणे कोणाच्या येण्याने ते पूर्ण होणार किंवा नाही हे नियतीला पूर्णत: ठाऊक असते.
घोडपदेवची तेजस्विनी: मनीषा जाधव
घोडपदेवची तेजस्विनी: मनीषा जाधव
मान सदोदीत खाली, कुणाशीही नजर न भिडविणारा मितभाषी सहादू एकदा घाम आणि चष्मा दोन्ही एकाच वेळी पुसत घरी आला होता. त्यांनी तीन रंगाचे मास्क एकावर एक लावले होते. तिरंगा आपल्या मुखावर दिसत होता. त्यांना चहा विचारला. मानेनेच नकार देत त्यांनी एकेक मास्क उतरवला. संघर्ष, कष्ट, धावपळ ही जीवनगाथा आपल्या सहादूची. मनात एक आणि जनात एक असा कधीही डाव न टाकणारा माणूस. तोंडावर ग्वाड आणि आतून द्वाड असा कधीच दिसला नाही. वादळात बरेच काही पाण्यात गेल्याने सहादू निराश होता. पण काही मदत मिळते का.. धावपळ करण्यात त्यांनी सायास केले होते. पायाला भिंगरी लावून फिरला होता. हे मला ठाऊक होते.
केशव शिंदे हा एक लहानपणापासूनचा माझा एक मित्र.माझा मित्र म्हणण्याऐवजी मी त्याचा मित्र असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.कारण त्याच्या दारापुढे त्यानेच लावलेले अशोकाचे झाड हे आमच्या दृढ मैत्रीचे खास द्योतक. श्रीकापरेश्वर निस्सीम भक्त असलेल्या भागोजी शिंदे यांचा द्वितीय सुपुत्र. एड्गाव, जुन्नरचे मूळ रहिवासी असलेले भागोजीबाबा निर्वतल्यावर त्यांची गादी खुल्या मनाने स्वीकारीत सांजसकाळ कापरीबाबाच्या चरणीलीन होत नामस्मरणाचा रोग जडलेले आगळे वेगळे दिलखुलास व्यक्तिमत्व. चांगल्या विचाराची उंची असलेला सहा फुटी मध्यम बांध्याचा एखाद्या स्वच्छ सुंदर निर्झरा सारखा खळाळून हसणारा.
उत्सव म्हणजे लखलखणाऱ्या लाख दिव्यांची झगमगणारी धरती. या वर्षी गणपती नवरात्र उत्सवाच्या वर्गणीवर उत्सव होईल का....? मंडळ कार्यकर्त्यांना नेहमी प्रमाणे पडलेला घोर प्रश्न. एक म्हणजे गणपती बाप्पा असो वा आई जगदंबा...! भक्ती असेल तेथे शक्ती धाव घेते. कार्यकर्त्यांच्या मनात बळ निर्माण करणारी ती अदृश्य शक्ती कोणी पाहिली नाही. पण गणपती बाप्पा, आई जगदंबा हे आपले त्राता आहेत. ते आहेत म्हणून हे जग आहे. त्यांना भक्तामध्ये विराजमान व्हायचे असेल तर ते त्याची तजबीज करूनच स्थानापन्न होतात. हा अनुभव आम्हांला अनेकदा आला. एक वेळ तर अशी होती, मूर्ती आणायची तर पैसे द्यायला हवेत...!