अलीकडच्या काळातील पूर्ण जगावर परिणाम करणारी, आणि एका अर्थाने जग बदलवणारी घटना म्हणजे द्वितीय महायुध्द, ते घडून सुध्धा 80 , 82 वर्षे घडून गेली आहेत त्यामुळे त्याबद्दल नव्याने लिहिण्यासारखे माझ्याकडे काही नाही.मात्र आजकाल लोकांना 70 75 वर्षापूर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यात रस असल्याने मी पण थोडे खोदकाम केले आणि काही मनोरंजक माहिती समोर आली.
या पूर्ण युध्दाचा कल बदलवणाऱ्या 2 घटना,
पहिली ,पूर्ण माघारीची, पूर्ण नाचक्कीची
आणि दुसरी अतिशय आशादायी, एक नवी सुरवात.
अर्थात या घटना तुम्हाला माहिती असतीलच.
हिटलर आणि नाझी सैन्याचा उधळलेला अश्वमेधाचा वारू रोखणे ब्रिटन आणि मित्र राष्ट्रांना शक्य नव्हते. नक्की कुठे बांध घालायचा कळे पर्यंत देशाच्या देश हिटलरच्या पंखाखाली जात होते. माघार घेत घेत दोस्त सेना फ्रान्सच्या किनाऱ्यावर एकवटली होती. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला नाझी सैन्याचा समुद्र अशी स्थिती झाली. ब्रिटन किनाऱ्यावरून शेकडो, हजारो बोटी पाण्यात लोटल्या, आणि या लाखो सैनिकांना ब्रिटन भूमीवर आणले गेले.
इतक्या बोटी उपलब्ध करणे ब्रिटिश सरकारच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती, सामान्य ब्रिटिश नागरिकांनी आपल्या खाजगी बोटी समुद्रात लोटल्या आणि भरती, धुके, जर्मन हवाई दल या सगळ्याचा तोल सांभाळत आपल्या सैन्याला सुरक्षित जागी आणले.
हे ऑपरेशन डायनामो सुरू झालेले *26 मे* रोजी.
ही होती सपशेल माघार, हातचे युद्ध साहित्य सुध्धा फ्रान्समध्ये टाकून देऊन घेतलेली माघार. ब्रिटन was at its all time low.
ब्रिटन पुढे पर्याय होता या लढाईतून पाय बाहेर घ्यायचा, युरोप जर्मनीच्या पंखाखाली ठेऊन आपले सार्वभौमत्व टिकवायचा. पण ब्रिटन ने तो स्वीकारला नाही.
पुढे हिटलर ने रशियन आघाडी उघडायची घोडचूक केली ,
दोस्त राष्ट्रांनी रशियाशी हातमिळवणी केली, अमेरिका मित्र जोडला, परत एकदा आपले सैन्य सशस्त्र केले.
पण तो पर्यंत युरोपात दोस्तांना पाऊल ठेवायला जागा उरली नव्हती. आता युरोपात उतरायचे तर लढाई करतच उतरावे लागणार हे स्पष्ट होते.
आणि 6 जुन रोजी सुरू झाले ऑपरेशन ओव्हर लॉर्ड.
6 जून रोजी लाखोच्या संख्येने दोस्त सैनिक नोर्मंडी किनाऱ्यावर उतरले, किनाऱ्या वरच्या जर्मन सैन्याला तिखट प्रतिकार करत फ्रान्स मध्ये घुसले.
आणि तिथून सुरुवात झाली हिटलरच्या पतनाची.
हे सगळे आज आठवायचे कारण म्हणजे...
नजीकच्या इतिहासात सुध्धा या 2 तारखांना काही महत्व आहे आणि त्याच क्रमाने आहे हे विशेष.
26 मे 2014 अच्छे दिन आनेवाले है म्हणत नरेंद्र मोदी यांनी प्रधान मंत्री पदाची शपथ घेतली.
निवडणुकीत काँग्रेस/UPA चा अतिशय मानहानीकारक पराभव झाला होता. सभागृहात अतिशय नगण्य अस्तित्व उरले होते. कोणत्याही कायद्याला विरोध करायची शक्ती उरली नव्हती. नरेंद्र मोदी नावाचा झंजावात काँग्रेस मुक्त भारत चा नारा देत पुढे राज्या मागून राज्य जिंकून घेत होता.
पुढच्या 10 वर्षाच्या काळात विरोधी पक्षांसाठी गोष्टी अजून अजून कठीण होत गेल्या. जिंकून आलेले आमदार, पूर्ण पक्ष, TV चॅनल्स, प्रिंट मीडिया, स्वायत्त समजल्या जाणाऱ्या सरकारी संस्था या मोदी सरकार पुढे लोटांगणे घालू लागली.
विरोधी पक्षांपुढे एकच पर्याय होता एक तर भाजपमध्ये सामील व्हा किंवा ईडीसीबीआय यांच्या केस च्या कचाट्यात सापडून तुरुंगात दाखल व्हा. कित्येक विरोधी पक्ष नेत्यांनी पहिला पर्याय निवडला.
मात्र काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्ष अजून टिकाव धरून होते. होता होता 2024 ची निवडणूक आली. पण आत्तापर्यंत सलग दहा वर्ष सत्य बाहेर राहिल्याने काँग्रेस पुढे वेगळीच आव्हान होते. कार्पोरेट फंडिंग चा ओघ आटला होता प्रशासनावरची पकड पूर्णपणे ढिली झाली होती. आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे नेटवर्क लागते ते पूर्णपणे ध्वस्त झालं होतं. काँग्रेस नेत्यांची विश्वासार्हता खोट्या प्रचाराने पार रसातळाला गेली होती .आज काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं एक स्टेटमेंट लोकांपर्यंत त्याच फॉर्ममध्ये पोहोचेल याची काहीही खात्री देता येत नव्हती.
आणि तेव्हा सामान्य लोक बाह्या सरसावून या लढ्यात उतरले. ही लढाई सर्वांची झाली. काँग्रेसकडे स्वतंत्र IT सेल, इन्फ्ल्यून्सर्स वगैरे आणायला पैसे नव्हते, लोकांकडून हवे ते वेदवून घेण्यासाठी सरकारी यंत्रणा नव्हती. ही लढाई लोक सर्वस्वी स्वतच्या instincts वापरून लढले.स्वतंत्र पत्रकार यूट्यूबवर्स ब्लॉगर्स ट्विटर वरती काम करणारे लोक अगदी घराघरात राहून व्हाट्सअप स्टेटस अपलोड करणारे लोक यांनी काँग्रेसचा प्रचार केला. भाजप कडून होणारा खोटा प्रचार हाणून पार पाडला. तेव्हाच काँग्रेस आणि मित्रपक्ष देश विंचरून काढत होते. या सगळ्या चमू चे धीर खचवण्याचे अनंत प्रयत्नं सरकारी यंत्रणा वापरून केले गेले.
फायनली, काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना जवळपास 45 टक्के जागा मिळाल्या .विरोधी पक्षाचा आवाज ऐकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही अशी परिस्थिती आली.
भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही .
त्याचे 2 मित्र पक्ष आज त्यांना हवी ती मंत्रिपदे द्या, म्हणून आक्रमकपणे वाटाघाटी करत आहेत. 10 वर्षे मनमानी करायची सवय झालेल्या भाजप नेत्यांना हा फरक पचनी पाडून घ्यावा लागतो आहे.अचानक मोदी सरकार ची जागा NDA सरकार ने घेतली आहे. भाषणातील द्वेष जाऊन विकास वगैरे मुद्दे येऊ लागले आहेत
आणि आज तारीख आहे 6 जुन
ही निवडणूक भारतासाठी एका अर्थाने नॉर्मंडी ची लढाई ठरेल का?आणि हीचा शेवट कसा होतो ते येणारा काळच सांगेल.
सीम्बा , बरेच दिवसांनी … छान
सीम्बा , बरेच दिवसांनी … छान लेख
यल्कम ब्याक
यल्कम ब्याक
छान लेख. आता तुम्ही पण परत या
छान लेख. आता तुम्ही पण परत या मैदानात.
अरे वाह छान लेख आहे.. दोन्ही
अरे वाह छान लेख आहे.. दोन्ही तारखांचे योगायोग मस्त!
शेअर करतो याची लिंक..
आता तुम्ही पण परत या मैदानात.
आता तुम्ही पण परत या मैदानात.## परवा शपथविधी आहे म्हणे, त्या मुहूर्तावर या हवं तर
Thank you....तुम्ही हे
Thank you....तुम्ही हे विश्लेषण कोणत्या डेटाच्या आधारे केलेत की फक्त स्वानुभावावरून केलेत हे मला माहीत नाही....पण हे असं माझ्याबाबतीतही घडलं हे नक्की...मी काँग्रेसचा समर्थक कधीही नव्हतो, उलटपक्षी त्यांच्या संदर्भात नकारात्मकताच होती. स्वतःची राजकीय भूमिका मांडण्यात एवढा सक्रियही कधीच नव्हतो. आजतागायत काँग्रेसला कधीही वोट दिलं नाही ( यावेळी आमच्या इथे काँग्रेसचा उमेदवार उभा असता तर दिलं असतं). पण मागील १० वर्षांत जे जे काही पाहिले त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून आपसूकच ही प्रतिक्रिया सर्व ठिकाणी व्यक्त होत गेली, अगदी घरात/ ऑफिसात/ मित्रपरिवारात होणाऱ्या चर्चांमध्ये सुद्धा. कदाचित आधी मूर्ख बनवले गेल्याच्या भावनेतून हर्ट झालेल्या इगो मुळे आणि नंतर For the need of time! साठी हे करायलाच हवे हे कुठे तरी प्रकर्षाने वाटल्यामुळे असेल. त्यामळे नक्की कुणावर किती परिणाम झाला हे समजणे अशक्य आहे. ट्विटरवर या काळात जास्त सक्रिय होतो. प्रसंगी शिव्या खाल्ल्या आणि जिथे गरज पडली तिथे दिल्या ही. पण त्या आधी मुद्दा खोडून काढला, त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. मी वॉट्सअँपवर वर्षातून एखाद दुसरं स्टेटस ठेवतो. पण आज मी माझ्या व्हाट्सअपवर आवर्जून खालील स्टेटस ठेवलं.
दुसर्या महायुद्धाच्या
दुसर्या महायुद्धाच्या शेवटाची सुरुवात ८० वर्षांपूर्वी आज झाली. हा तारखांचा योगायोग मजेदात आहे.
आज १३ युद्धात सहभागी झालेले आणि आज जिवंत असलेले कॅनडाचे सैनिक नॉर्मंडीच्या त्या स्मरण सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होते ऐकलं. हे जरा जास्तच होतंय, कल्पना आहे ... पण आजची तरुण पिढी ८० वर्षांनंतर काय सांगू शकेल असा एक विचार आला इतकंच.
ताजा कलम:- हे लिहीत असताना
ताजा कलम:- हे लिहीत असताना राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आणि modi- शहा यांनी दिलेले स्टॉक मार्केट सल्ले, खोटे एक्झीट पोल, आणि 2 दिवसातील स्टॉक मार्केट activity यावरून प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
पहिला वार तरी जोरकस झाला आहे.
फार्स, धन्यवाद,
फार्स, धन्यवाद,
हे खलुभर दूध आहे, ते घालायचं, गाभारा भरेल की नाही याची काळजी करायची नाही.
सेबीला दखल घ्यावीच लागेल.
सेबीला दखल घ्यावीच लागेल. अर्थविषयक सल्ले देण्यासाठी सेबीच्या पात्रता नियमाचे पालन करावे लागते आणि सेबीकडे नोंदणी करावी लागते.
छान लेख.
छान लेख.
भारताची राज्यघटना आणि लोकशाही यांच्याशी भाजपाला काही देणेघेणे नाही. भ्रष्टाचार नष्ट करण्यात कुठलेही स्वारस्य नाही.
दोन खासदार (१९८४) संख्येवरुन ३००+ आणि दोन वेळा (२०१४, २०१९) पूर्ण बहुमत असा मोठा प्रवास करतांना ज्या साधनांचा ( हिंसा, धार्मिक तेढ, दंगली.... खोटा प्रचार) वापर केला गेला तिच साधने यापुढे वापरली जाणार नाहीत याची काहीच खात्री नाही.
लाखो युवकांच्या डोक्यामधे धार्मिक तेठ वाढवणारे विष भिनवलेले आहे. हे addiction सर्वात वाईट.
२०२४ निवडणूक एक छोटी लढाई होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मधे लोकशाहीवादी INDIA आघाडीने अपेक्षे पेक्षाही छान कामगिरी केली आहे. लोकशाही बद्दल आस्था असणार्या सर्वांचे अभिनंदन.