ब्रेकिंग न्युज - मोदींचा अंबानी अदाणीवर काँग्रेसशी सौदा केल्याचा आरोप

Submitted by अग्निवीर on 8 May, 2024 - 04:34

तेलंगणातील एका प्रचारसभेत भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शहजादा असे सं बोधत राहुल गांधींना प्रश्न विचारला आहे, की चुनाव में अंबाणी अदाणी से कितना माल उठाया है? काले धन के कितने बोरे भर कर के रुपये मारे है?क्या टेंपो भर कर के नोटें काँग्रेस के लिए पहुंची है क्या? क्या सौदा हुआ है?
असे प्रश्न विचा रण्याचे कारण, त्यांच्या मते राहुल गांधीने रातोरात अंबानी अदाणीला शिव्या देणं बंद केलं.

जरूर दाल में कुछ काला है?

आता मोदीजी ईडी, सीबी आय, आयकर खाते यांना अंबानी अदाणीवर सोडतील का?
भाजप आयटी सेल अंबानी अदाणीच्या उत्पादनांवर बहिष्काराची द्वाही फिरवेल का?

मोदी जींच्या भाषणाचा हा अंश त्यांनीच ट्वीट केला आहे. काँग्रेसचा अदाणी अंबानीशी सौदा हे शीर्षकही त्यांनीच दिले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे कशासाठी ?
मोदी ह्यांनी एकही भाषण केले नाही तरी बीजेपीच्या ६०० पार जागा निश्चित आहेत.

आरोप खरे असतील तर वारे फिरले असे म्हणायचे।.
अ आणि अं ला आधी वाऱ्याची दिशा कळत असणार किंवा तेच ठरवत असावेत वारे कुठल्या दिशेने वाहिले पाहिजेत.

कॉंग्रेस + सत्तेत आली तर ईव्हीएम बंद व्हावे.
व्यापमं घोटाळा / जज्ज लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्या प्रकरण
पुलवामा 350 किलो आरडीएक्स प्रकरण
भीमा कोरेगाव हल्ला प्रकरण
मुंबई हल्ल्यातील उज्वल निकम यांची भूमिका आणि
करकरेंचा मृत्यू कसा झाला
याप्रश्नी पूर्ण तपास होऊन संशयितांना शिक्षा होईल ही अपेक्षा.

कर्नाटकात जनता दलाचे सरकार आले आणि दाभोळकर, कलबुर्गी खून प्रकरणात महाराष्ट्रात अटका व्हायला लागल्या. पण सरकार पडले. कॉंग्रेसचे आमदार भाजपात गेले.. नाहीतर आरोपी समोर आले असते. सापडले ते प्यादे होते. आता तर काहीच हालचाल नाही.

तेलंगणात कॉंग्रेस सरकार आहे. तिथल्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रोहित वेमुलाची केस बंद करून टाकली. तोच दोषी होता असा निष्कर्ष काढला होता. काहीच महिन्यापूर्वी पदयात्रा काढली तेव्हा रोहित वेमुलाचया आईला बोलावून मिठी मारताना फोटो प्रसिद्ध झाले होते.

बदल व्हावा ही अपेक्षा.

लोकशाही टिकवायची असेल, आहे त्यापेक्षा अजून प्रगल्भ करायची असेल तर सुरवात निवडणूक आयोगापासून करायला हवी. निवडणूक आयोग स्वायत्त कसा राहिल ? पंतप्रधान, त्यांनी नेमलेला एक मंत्री आणि विरोधी नेता अशी समिती बरखास्त करा.

मोदी यांनी अदानी, अंबानी यांचे नाव सार्वजनिक सभेत कधी घेतले होते का?

पंतप्रधान पदावर असणार्‍या मोदी यांचे प्रचार सभेतले भाषण. नोटबंदी आणून भ्रष्टाचार संपविला होता या भ्रमातून भक्त बाहेर येतील.
https://youtu.be/i1zW9H4DaQE?si=jyXlnh3ZcxzE9Ffc&t=52

आरोपाला राहुल गांधी यांचे चोख उत्तर. ED, CBI पाठवायची अडाणी अंबानीची चौकशी करायला.
https://youtu.be/zMNV3_W1jhs?si=tQRsB36gBWUZp2Dm&t=102

आजकी ताजा खबर.
नवनीत राणाना फक्त १५ सेकंद पाहिजेत.

नाशिक जिल्ह्याच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील काही गावात भाजप प्रचारकाना हात जोडून प्रवेश नाकारला जातोय

मोदी फारच खालच्या पातळीवर उतरलेत. पश्चिम महाराष्ट्रात तरी भजपला भरपूर विरोध आहे. फोडाफोडी, मराठा आरक्षण आणि शेतकरी फॅक्टर भजपाच्या विरोधात जातोय.
रघु आचार्य.
मुंबई hlla २००८ ला झाला. म्हणजेच त्यानंतर ७-८ वर्ष काँग्रेस सत्तेत होती. कसाबला फासिही काँग्रसच्या काळात झाली. नंतर १-२ वर्ष काँग्रेस राज्य सरकारत होती. त्यावेळी चौकशी केली नाही. तरी नशीब कसाब जिवंत सापडला नाहीतर तो हिंदू आहे हे पाकिस्तानी चॅनल्स ने म्हण्याला चालू केलच होत.
EVM बंद करन म्हणजे इंटरनेट बँकिंग सुरक्षित नाही म्हणून बंद करण्यासारखं झालं.
पुलवामा हल्याची माहिती मात्र बाहेर आलीच पाहिजे.

EVM बंद करन म्हणजे इंटरनेट बँकिंग सुरक्षित नाही म्हणून बंद करण्यासारखं झालं. >> या न्यायाने बॅलट पेपर बंद करणे म्हणजे काय होईल ?
ईव्हीएम बेकायदेशीर आहे. वकिलांना जाऊन विचारा.

" lekin tempo nahi rukawa payee ">>> टेम्पो बडे पापा का था पॉपॉSSS Rofl

मोदींची ही कमेंट खरच आश्चर्यकारक आहे. आपले पॅटर्न रेकॉग्निशन ब्रेन उगाच बिप बीप करते आहे का खरेच वारे फिरले आहे काही कळेना.

<< मोदींची ही कमेंट खरच आश्चर्यकारक आहे. आपले पॅटर्न रेकॉग्निशन ब्रेन उगाच बिप बीप करते आहे का खरेच वारे फिरले आहे काही कळेना. >>

------- या भाषणांत फार मोठा मास्टरस्ट्रोक दडलेला आहे. Happy

भाषण बघितल्यावर वारे फिरले आहे याची नोंद मोदी यांनी घेतलेली आहे, आणि तशी मनाची तयारी ते करत आहे. अर्थात त्यांना काहीच फरक पडणार नाही, उचलतील आपला झोला आणि जातील निघून....

और ये रहा और एक छक्का.
In an apparent reaction to Supreme Court's decision to grant interim bail to Delhi Chief Minister Arvind Kejriwal, senior Bharatiya Janata Party leader Vinay Sahasrabuddhe on Friday said 'the lordships' have made themselves a part of the campaign by picking a side right in the middle of the elections.

अदानी आणि अंबानी ह्यांच्यावर बेछूट, बेलगाम टी़का हा राहुल गांधींच्या गेल्या अनेक महिन्यात होणारा कार्यक्रम होता. हे दोघे उद्योगपती जणू दाऊद इब्राहिम किंवा ओसामा सारखे मोठे गुन्हेगार आहेत अशा थाटात राहुल गांधी त्यांना शिव्या घालत होते आणि अर्थातच त्यांना राजाश्रय देणार्या भाजपलाही.
आता समस्या अशी आहे की उद्योगपती हे राजकीय पक्षांना निवडणूकीसाठी पैसा पुरवतात. जिथे जिथे जो जो पक्ष जिंकताना दिसतो त्याला ते मदत करतात म्हणजे आपल्या कारभारात उगाच अडथळा नको. अंबानी हे इंदिरा गांधींच्या काळात त्यांच्याशी चांगले संबंध बाळगून होते आणि आज भाजपशी. कारण त्यांचा मतलब धंद्याशी आहे, त्यातून होणार्या फायद्याशी आहे. राजकीय विचारसारणीशी नाही.
अशा लोकांशी अकारण वैर पत्करून जे काँग्रेसी नेते निवडणुका लढवत आहेत त्यांची पंचाईत करून ठेवली आहे. आणि ह्यावरच मोदींनी बोट ठेवले आहे. निवडणूकीकरता काँग्रेसी नेत्यांनाही अशा उद्योगपतींचे पाय धरावे लागतात. त्यामुळे निदान निवडणूक जवळ आलेली असताना तरी आपली शापवाणी जरा स्थगित करावी अशी विनंती काँग्रेसी नेत्यांनी राहुलजींना केली असावी. त्यामुळे काही काळ तरी त्यांना आपली उद्योगपतींना उचकवायची उबळ दाबावी लागली आहे. ह्याची थोडी टिंगल करावी असा मोदींनी विचार केला.

निवडणुका सुरू झाल्यापासून राहुलने अदाणी अंबानीचे नाव घेणे थांबवले ही मोदींची निव्वळ कल्पना आहे. प्रत्येक सभेत अदाणीचं नाव तो घेतोच आहे.

त्यामुळे मोदीने कहा है तो कुछ सोच समझ के ही कहा होगा हे स्पष्टीकरण इथे फोल आहे.

मोदी केव्हाही, कुठेही, काहीही, कितीही खोटं बोलतात, कुणालाही बस खाली ढकलायला मागे पुढे बघत नाहीत हे कळायला कसलीही तपश्चर्या वगैरे करण्याची गरज नाहीय.
आपण ज्याला दैवी पुरुष समजलो त्याचेही पाय मातीचेच एवढे स्वीकारणे पुरेसे आहे.

काहीही ! मोदीजींनी tongue in cheek शेरेबाजी केली असती तर ठीक होते, इथे मात्र राहूल नी टेम्पो भरून पैसे घेतले असा थेट आरोप केला आहे. त्यावर राहूल ने उत्तरही दिले आहे आणी आय टी सेल चूप आहे.

मोदींनी टंग इन चीक असेच म्हटले आहे. विरोधकांना मिर्च्या झोंबल्यामुळे त्यांना विनोद कळत नसावा. टेंपोतून पैसे देतात का? असा एक र्हेटॉरिकल प्रश्न विचारला आहे.
राजस्थान आणि अन्य राज्यात अंबानी आणि अडानीकडे पैसे मागायला काँग्रेसी नेतेही जातात आणि त्यांना राहुलजींच्या बेताल आणि बेछूट टीकेमुळे पैसे मागणे अवघड होते आहे.
असल्या उद्योगपतींशी अकारण वैर पत्करून राहुल गांधी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेत आहे. सध्या तरी त्याचा पक्ष फार चमक दाखवेल असे दिसत नाही. पण बघ, २० दिवसात काय होते ते कळेलच.
नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी खाजगीकरणाची सुरवात केली त्याचेच अदानी आणि अंबानी हे पुढचे पाऊल आहे. सबकुछ सरकार चलाएगी हा दिवाळखोरीत नेणारा उद्योग पुन्हा सुरू करण्याचा राहुल गांधींचा तुघलकी बेत आहे. राम करो आणि त्याला पूर्ण अपयश येवो!

लोकांना फुकट मिळते, सरकारने सर्व चालवणे हास्यास्पद या गोष्टींचा प्रचार आता जुना झाला. दहा पंधरा वर्षांपूर्वी भांडवलशाही वर टीका करणारे ते विकासविरोधी असा नरेटिव सेट करण्यासाठी ज्या फौजा (पेड, अनपेड) उतरवल्या गेल्या होत्या, त्यांनी कल्याणकारी राज्याच्या कल्पनेच्या बाजूने उभ्या असलेल्यांचे दानवीकरण आणि विकृतीकरण सुरू केले. ही एक संघटीत गुन्हेगारी पद्धतच आहे. लोकशाहीत मुद्दे मांडण्यासाठी पोषक वातावरण हवे , पण संघटीत पद्धतीने काही मोठे केलेल्या लोकांचे दाखले देऊन विशिष्ट मतप्रवाह मोडीत काढणे हा धंदाच झालेला आहे. त्यासाठी मनुषबळ लागतं, पैसा लागतो.

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या मधे गोदावरी बेसीन मधल्या नैसर्गिक वायूच्या मालकीवरून वाद झाल्याने अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ देशाला कसा लुटतो याचे शपथपत्र दाखल केले होते. या वादात कोकिळाबेन यांना लवाद नेमण्यात आले. त्यांनी मग हा वाद सोडवताना गोदावरी बेसीनच्या बदल्यात धाकट्या भावाला अन्य काही कंपन्यांची मालकी सोपवली होती.

मुळात गोदावरी बेसीनमधला नैसर्गिक वायू हा देशाच्या म्हणजे जनतेच्या मालकीचा. त्यामुळे विश्वस्त म्हणून सरकार त्याचे व्यवस्थापन पाहणार. तो काढण्यासाठी तंत्रज्ञान आणि मशिनरी नाही असा पवित्रा सरकारने घेतला. अनिल अंबानी यांच्या शपथपत्रात मुकेश अंबानी कवडीमोलकिंमत दाखवून देशाची लूट करत आहेत असा आरोप केला होता. तसेच मिळणार्‍या नैसर्गिक वायूच्या एक टक्केच वायू दाखवला जातो असेही म्हटले होते. ही बातमी इकॉनॉमिक टाईम्स आणि अन्य काही वृत्तपत्रात आली होती. दोन्ही बंधूंमधला वाद मिटल्यावर या बातम्या वेब एडीशन मधून नाहीशा झाल्या आणि अनिल अंबानींनी ते शपथपत्र आणि न्यायालयातली केस मागे घेतली.

कोर्टाने यावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती. परस्पर लवाद नेमला जात असेल आणि सरकार यात काहीच भूमिका घेणार नसेल तर आमचे काय काम आहे अशी न्यायालयाची टिप्पणी होती. ही टिप्पणी मात्र अजूनही वेबवर उपलब्ध आहे.

या काळात भाजपचे नाही तर काँग्रेसचे सरकार होते.
गोदावरी बेसीन मधे ओएनजीसी ने सोळा वर्षे सर्व्हे केला होता. तसेच न्यू बाँबे हाय मधे त्यांनी ३० वर्षांपेक्षा अधिक काळ सर्व्हे केला होता. या दोन्ही सर्व्हेजचा रिपोर्ट त्यांनी इथे काहीही मिळणार नसल्याने शोध थांबवावा असा दिला . त्यानंतर रिलायन्सने शोध घेऊ देण्याची परवानगी मागितली. त्यांना एका ठिकाणी तीन महीन्यात आणि दुसर्‍या ठिकाणी सहा महीन्यात तेल आणि गॅस सापडला. त्या वेळी ओएनजीसी ने रिलायन्सच्या दबावाखाली पेट्रोलियम मंत्रालयाच्या दबावाखाली रिपोर्ट बदलल्याचे बोलले जात होते. त्यावेळच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी विरोध केल्यावर त्यांना बदलून मुरली देवरांना आणण्यात आले होते.

अंबानी आणि अदानींना काँग्रेस आणि भाजप दोन्हींनी प्रचंड फायदा पोहोचवलेला आहे. अदानींच्या रथाचे सारथी होण्यात रोहित पवारांना धन्यता वाटते. गुजरात मधल्या पंधरा वर्षांच्या काळात मोदींनी त्यांना स्कूटरवरून येणारा विक्रेता ते देशातला अग्रगण्य उद्योगपती इथपर्यंत पोहोचवले. शरद पवारांनीही अदानींना मदत केली आणि मदत घेतलीही आहे.

अदानींच्या कंपनीत छुपे पार्टनर्स कोण आहेत याची सेबी / सीबीआय / इडीकडून चौकशी व्हायची असेल तर ज्या पक्षांना फायदा झालेला आहे, ज्या पक्षांनी अदानीला फायदा पोहोचवलेला आहे ते सोडून अन्य पक्षांचे सरकार यावे लागेल. पण त्यांना फायनान्स कोण करणार ? कारण देशाच्या आर्थिक नाड्या या दोन उद्योगसमूहांच्या हातात आहेत. अन्य उद्योगही याच दोन पक्षांच्या मागे आहेत.

Pages