आपली सात बलस्थाने .. महिलादिना निमित्त

Submitted by स्मिता द on 8 March, 2016 - 02:39

पृथा..

आज महिला दिन..:) समस्त महिलावर्गाला शुभेच्छा..

महिला शक्ती ..महिला सबलीकरण..महिला शोषण या बाबी भिन्न वाटतात ना ऐकायला. जर ती शक्ती आहे तर सबलीकरण का? अन मग शोषण का ?
पण एक स्त्री म्हणुन सांगते खूप सबल असतो आपण. मोठा उर्जा स्त्रोत आहे आपल्यात. फक्त काही कारणांनी त्यावर आलेला लेप मग तो अज्ञानाचा, काही असंवेदनशील मुजोरी, दांडगेपणाने आलेला असेल पण वेळ आली की महिला सर्व शक्तीनिशी नक्कीच उठते.
महिलांचे शोषण होतेय..मान्य..पण ते होण्यामागची कारणे गतानुगतिकांची सामाजिक मानसिकता कारणीभूत आहे. मातृदेवता म्हणुन पुजन होणारी शक्ती जिचा गौरव स्त्रीशक्ती म्हणुन केला गेलाय तो भाग जाउन. केवळ मुजोरीच्या बळावर पुरुषांनी आपले वर्चस्व निर्माण केले. अन हळूहळू स्त्री ही दुर्बल ठरत गेली. हे शतकानुशतके होतच राहिले अन त्याचा परिपाक म्हणजे स्त्री ही अबला, असाहाय्य तिची प्रतिमा घडत गेली. सामाजिकता तशी तयार झाली. पुरुषी वर्चस्वाला तिने विरोध करायचा प्रयत्न केलाही पण त्यावेळेस ती दुबळी पडली कारण अनेकांविरुध्द ती एकटी होती. आणि म्हणून दुबळी. आज गरज आहे सगळ्या स्त्रियांनी आपआपसातले हेवेदावे विसरुन एकत्र होण्याची . संघटितपणे हे वर्चस्व झुगारून देण्याची. वर्चस्व झुगारायचे म्हणजे त्यांची बरोबरी करायची हे मात्र मला पटत नाही. समानता असावीच पण प्र्त्येकाचे गुण वैशिष्ट्य आहे. आपली जी ताकद आहे जी फक्त स्त्री म्हणुन आपलीच आहे तिचे पुनरुत्थान करायचे. आपोआप सबल अशीच प्रतिमा स्त्रीची होईल.

आपली ताकद अमर्याद आहे. या गोष्टीत ती नाही असे नाहीच. आज प्रत्येक गोष्टीत स्त्रीने स्वतःला सिध्द केले आहेच. पण मुठभर स्त्रीसिध्दता होऊनही चालणार नाही. सगळ्या स्त्रिया सक्षम आणि सिध्द व्हायला हव्यात. आणि सिध्दता येईल आपल्या क्षमतांचा वापर करून. पुरूषांमध्ये असलेले सगळे गुण आपल्यात आहेतच. परंतू माया, जबाबदारी, घेण्याची प्रवृत्ती, प्रसंगी जोखीम स्वीकारून आपली कमिटंमेंट पाळायची भावना म्हणजेच कर्तव्याची जाण आण चोख कर्तव्य पाडण्याची वृत्ती, जबाबदारीचे भान अन जबाबदारी उत्तम पार पडणे ह्या महत्वाच्या गोष्टी स्त्री स्वभावातील आहे. त्याच बरोबर प्रेम, माया,हळवेपणा. भावनिकता या गोष्टी स्त्री मध्ये जास्त असतातच. त्याचा उपयोग कुटुंब सक्षम करण्यात निश्चित होतो. एक दिशादर्शकाचे काम ती उत्तम करू शकते.

काल एक विचार ऐकला मुलगी शिकली प्रगती झाली म्हणजे केवळ प्रगती करण्यासाठीच मुलींचा उपयोग करायचा का? तर मी म्हणेल नाही. प्रगती करण्याकरता मुलगी शिकवायची असे नाही. तर एक मुलगी शिकेल, तिच्या क्षमता वाढतील, विचार बदलतील अन या सक्षमतेचा आणि बदलांचा प्रभाव तिच्या कुटुंबावर पडेल. जितकी आई मुलांना चांगले समजावून सांगू शकते किंवा घेते मला वाटते त्यात बर्‍याचदा बाप म्हणून पुरुष कमी पडतो. मग आपले विचार, समानतेची भावना या गोष्टी मुलांच्या मनावर आपण बिंबवू शकतो . आपल्या कृतीतून ते दाखवू शकतो. मुलांना घरातूनच जर स्त्री पुरुष समानतेची शिकवण आईने दिली. स्त्रीचा आदर करावा, ही भावना मुलांमध्ये रुजली गेली तर आपोआप मुलग्यांवर प्रभाव पडेल. पर्यायाने स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल अन आपोआप सामाजिक मानसिकता ही बदलेल. आज बघा सामाजिक आरोग्य सेवेचे संदेश स्त्री ही मॉडेल म्हणून देते तेव्हा स्त्रीचा तिला पाठिंबा मिळतो अन मग हळू हळू कुटुंबाचा पण. जसे विद्या बालन करते त्या शौचालयाच्या, सार्वजनिक आरोग्याच्या जाहिरातीत मुलगी नाकारते मुलाला शौचालय नाही म्हणून ही जाहिरात प्रभाव पाडते अन मग अशा स्त्रिया जर एकजुटीने उठल्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध तर आपोआप मानसिकता ही बदलेल. आज अगदी निम्मा वाटा नाही म्हणत मी पण स्त्रियांचा जो संख्या दर्शक वाटा आहे त्या सगळ्या जर एक विचाराने एकजुटीने उभ्या राहिल्या तर. स्वतःच्या घरापासून मानसिकता बदलणे सोपे जाईल, निम्म्या समाजाची मानसिकता बदलली तर मग संपू्र्ण समाजाची मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही

आजवर खूपदा आजी, आई , आत्या, आजूबाजूच्या महिलांचा प्रवास पाहिला की जाणवते, अरे! खरच किती गोष्टी करत आल्या ह्या स्त्रिया. घरातले सगळे निगुतीने करणे आणि निगुतीने तीच करु शकते हे माझे ठाम मत आहे. बाहेरही नोकरी करताना ती कमी पडत नाहीच. सगळ्याच क्षेत्रात. कमी पडतो खुपदा तिला दिलेला प्रोत्साहनाचा शब्द. महिला अधिकारी म्हणून फारश्या कुणाला नको असतात. महिला कायम दुय्यम दर्जाच्या जागी असावी ही मानसिकता. अन् यातली गंमत मला जाणवते की महिला म्हणुन, ही बाई नक्कीच हुशार असेल , आपली जबाबदारी नक्की सांभाळेल ही गोष्ट कुठेन कुठे तीला नाकारणाऱ्यांच्या मनात ही असते, मान्य करो अथवा न करो.
अगदी घरातले घेऊ. मुलांना , घरातल्या वस्तू असु दे नाहीतर प्राणी त्यांना काय हव ,काय नको ते ती उत्तमरित्या जाणते अन पुर्णही करते. मला वाटते ही उपजत देणगी आहे स्त्रियांकडे. सगळ्याच बाबतीत स्त्रियांचे विचार पाहिले न की जाणवते त्यांनी स्वतंत्रपणे केलेले विचार खुप चिंतनीय असतात. मला नेहमी साधेपणे केलेले विचार असे म्हटलं की बहिणाबाई येतात नजरे समोर किती सहज जाता जाता कामे करत करत , जात्यावर दळत दळत त्या सांगुन जातात ओव्या..अगदी मनाचे घ्या.." आत व्हत भुईवरी गेय गेय आभायात" एखाद्या मानसशात्रज्ञाने मांडावे असे हे विचार. ब्रम्हवादिनी गार्गी,लोपामुद्रा पासुन आजच्या प्रत्येक सामान्य स्त्री मध्ये ही ताकद आहे. गरज आहे त्या लखलखत्या बळाची जाणीव तिला करुन द्यायची. फक्त एका फुंकरीने तो धुळीचा पडदा दूर करण्याची.

एक सुक्ष्मनिरिक्षण मांडते आमच्या सारख्या आधुनिक जगातल्या स्त्रियांना बाहेर पडावे लागते नोकरी व्यवसाय..येन केन प्रकारे. तो भाग आम्ही यशस्वीरीत्या सांभाळतो..घर ही सांभाळतो सजगपणे. या तारेवरच्या कसरती किंवा एखाददुसरा भाग जर कमी जास्त दुर्लक्षिला गेला की त्याचे पडसाद उमटतात. घरात थोडे होणारे दुर्लक्ष हमखास मुलांच्या योग्य वाढीवर परिणाम करते. एखादे चुकलेले पाऊल तीला नाही तर संपुर्ण कुटुंबाला भोगावे लागते. एखादा पुरूष चुकला तर त्याचे पडसाद कुटुंबावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पडत नाही , जितके स्त्रीच्या चुकीचे पडतात. कारण तेंव्हा ते सांभाळणारी स्त्री नक्कीच असते पत्नी असेल मुलगी असेल किवा बहिण असेल पण असतेच. पण "तो" मात्र तिला अशा रितीने सांभाण्यात बर्‍याचदा कमी पडतोच. पण स्त्री कमी पडत नाही. एक लक्षात घ्यायला हवे बहुतांश वेळा स्त्री हीच स्त्रीची शत्रू ठरते. हे स्त्रियांमध्ये पेरलेले इर्षेचे बीज आहे पुरुषांना. आता आपण सजग व्हायला हवे.कुठल्याच स्त्रीने एकमेकींचा दुःस्वास, द्वेष, शत्रुत्व केले नाही उलट एक बळ दाखवले तर त्या शक्ती पुढे नतमस्तक प्रत्येकाला व्हायलाच हवे. गरज आहे आज एकीची. स्त्रियांनी संघटीत होण्याची, एकजुटीची.

खर म्हणजे मान्य करु देत अथवा न करु देत पण यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तशीच यशस्वी कुटुंबामागे देखील स्त्रीच असते. जितक्या सजगपणे, लहानसहान गोष्टी ती बघू शकते तितके पुरुष नाही बघू शकत . अर्थात अपवाद प्रत्येक गोष्टीलाच असतात पण मी बोलते ते बहुसंख्याबाबत , तिथे त्यांचा दुबळेपणा येतोच. मुळात स्त्रीला अपत्य जन्म देणे ही इतकी मोठी शक्ती दिलेय निसर्गाने की अजून ती पुरुषाला साध्य करुन देणे. आजवर कुठल्याही शास्त्राला शक्य झाली नाही . " माझ्यात जी शक्ती आहे ती बिचार्‍या पुरुषांमध्ये नाही." हा विचार खरेतर प्रबळ व्हायला हवा. शारीरिकदृष्ट्या पुरुष जास्त सबळ असतो हे काही अंशी खरय पण स्त्री ही तितकी सबळ होऊ शकतेच ना. आज कुठल्याच क्षेत्रात स्त्री कमी पडत नाही. उलट मानसिक अन शारिरीक दृष्ट्या ती सबळ ठरतेय. ती कोलमडून पडत नाही चिवट जिजीविषा तिच्यात असते.
आज दुष्काळाच्या भीषणतेने हजारो शेतकरी आत्महत्या करतायेत, पण स्त्रिया फारशा ऐकिवात नाही. उलट आत्महत्या करुन हा त्रास संपवलेल्या पुरुषामागे ती अगदी सबलपणे सांभाळते सगळे . हा शक्तीचा अगदी सामान्यपातळीवरचा अविष्कार. उंबरठ्या बाहेरचे जगही व्यवस्थित सांभाळणारी स्त्री उंबरठ्याच्या आत ही कमी पडत नाही. तिला संधी मिळत नाही कित्येकदा हे खरे. पण संधी मिळण्याची वाट न पहात त्या संधी आपण निर्माण करायला हव्यात केवळ पेहराव आणि भाषा पुरुषांची केली म्हणजे बरोबरी झाले असे नाही. उलत माझ्या मते बरोबरी नाही तर समानता असावी . स्त्री ही स्त्री आहे त्या स्त्री शक्ती ची बरोबरी नको तर हवी समानता. तरच मला वाटते पृथा हे नामाभिमान सार्थ ठरेल. आपणच सबळ होण्याकरता कुठल्याही आधाराचे दोर न वापरता स्वबळावर उठले तर स्वशक्ती असलेली स्त्री शक्ती निर्माण होईल जिला सबलीकरणाची गरज भासणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरतर हा धागा कालच प्रकाशित केलेला.पण खूप काही लिहायचे मनात होते. आज त्यात काही अजून लिहिले. प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.. Happy

दोन-तिन दिवसापूर्वी कोणीतरी कही स्त्र्याना जात-पन्चायतीने कसा त्रास दिला ते लिहिले होते. ते लेखन मला एकाला दाखवायचे आहे. क्रुपया त्याची लिन्क द्यावी. धन्यवाद.

सगळ्या महिलांनी आपल्या एकजुटीचे सप्तसूर निर्धारित केले तर हे बेसूर झालेली, असमतोल सरगम नक्कीच सूरमयी होईल. सप्तसूर
सक्षम
साक्षर
स्वायत्त
सुदृढ
स्वयंपूर्ण
संवेदन
संयत

ही आपली वैशिष्ट्ये आहेतच मग ही आपले बलस्थान बनवावे अन मग सहज समानता यायला वेळ लागणार नाही. पण मनापासून यासाठी प्रयत्न करायला हवे. केवळ विरोध करणे आणि पुरुषांसारखे वागणे म्हणजे समानता नव्हे तर मला वाटते आपली ही जी बलस्थाने आहे ती अधिक सशक्त करून नक्कीच स्त्री पुरुष समानता असलेल्या समतोल समाजाचे स्वप्न दूर रहाणार नाही. आपले कुटुंब ,आपले मुख्य स्थान असते तर मग ते जर वैचारिक, मानसिक दृष्ट्या आपण समानतेच्या विचारसरणीवर बनवले तर मग तीच समानता आजूबाजूला पसरायला वेळ लागणार नाही. मी पुरुषांसाठी नाही तर मी त्यांच्या बरोबरीची आहे. माझी बलस्थाने वेगळी आहेत आणि म्हणूनच समानतेच्या पातळीवर आम्ही समान आहोत. हे सात बलस्थाने किंवा "सोल" आहेत आमच्या समान पातळी येण्याचे असे मला वाटते. प्रथम सामाजिक मानसिकता बदलायला आपल्या कुटुंबापासून प्रयत्न आपणच करायला हवे. कारण आपले कुटुंब ही आपली केंद्रे आहेत.हा बदल त्या पातळीपासून घडला तर मग एकूणच मानसिकता बदलायला किती वेळ लागेल? जरा अवग्।अड आहे सध्या तरी सुरूवात करताना पण अवघड नाही हे नक्की. Happy

" माझ्यात जी शक्ती आहे ती बिचार्‍या पुरुषांमध्ये नाही."

नाही हो.
दुसर्‍या कुणाला बिचारा समजून मला स्वतःला सक्षम बनवायचं नाही.

'मी ही अशी आहे, तो हा असा आहे. शक्ती, सामर्थ्य , पुनरुत्पादनक्षमता जे काही आहे ते निसर्गदत्त आहे.
त्यामुळे त्याचा अभिमान/गर्व/वैषम्य असं काहिही मी वाटून घेणार नाही.'

दुष्काळी आत्महत्येत स्त्रीयांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे याचे कारण स्त्रियांची चिवटता आणि निर्भयता नसून पुरुषांवर घरादाराची असलेली सामाजिक /आर्थिक जबाबदारी आणि खोट्या मानपानाच्या जाणीवा आहेत.
एक प्रकारचे सोशल कंडिशनिंग तेही.

सगळ्यांच्या बारिक सारिक गरजा पूर्ण करणे, सगळ्यांचं निगुतीने करणे हे ही एक प्रकारचे सोशल कंडीशनिंगच. मुलांचं खाणं पिणं, घरातल्यांची औषधे, अभ्यास इत्यादी सो कॉल्ड बारिक सारिक गोष्टीकडे लक्ष द्यायची जबाबदारी सोशल कंडिशनिंगमुळे बायकांवर आहे. ज्या घरात मुलांचे अपब्रिंगींग असे केले जाते तोथे मुलगेही या बारिक सारिक बाबींत लक्ष घालतात, जबाबदारी उचलतात असा अनुभव आहे.

'मुलगी शिकली, प्रगती झाली' यातही केवळ मुलीचीच नव्हे तर अख्ख्या समाजाची प्रगतीच अपेक्षित आहे ती घोषणा बनविणार्‍यांना.

बाकी लेख छान आहे. गार्गी/मैत्रेयींची नावे वाचून दर महिलादिनाला अभिमान वाटून घ्यायची परंपराही जुनीच आहे. सप्तसूरांची सप्तसूत्रीही छान आहे.

साती Happy प्रथम धन्यवाद तुमच्या पोस्ट बद्दल.

" माझ्यात जी शक्ती आहे ती बिचार्‍या पुरुषांमध्ये नाही."

नाही हो.
दुसर्‍या कुणाला बिचारा समजून मला स्वतःला सक्षम बनवायचं नाही.

'मी ही अशी आहे, तो हा असा आहे. शक्ती, सामर्थ्य , पुनरुत्पादनक्षमता जे काही आहे ते निसर्गदत्त आहे.
त्यामुळे त्याचा अभिमान/गर्व/वैषम्य असं काहिही मी वाटून घेणार नाही.'>>>>> सहमत ..पटले अगदी. खरंय तुमचे कुणाला बिचारा/री समजून मला सक्षम बनायचे नाही. जी चुक पुरूषप्रधानतेने केली ती नाही करायची..
अगदी १०० % अनुमोदन तुम्हाला..:)

पुरुषांवर घरादाराची असलेली सामाजिक /आर्थिक जबाबदारी आणि खोट्या मान पानाच्या जाणीवा आहेत.>>>> अगदी अगदी..मानापमानाच्या खोट्या कल्पनांचा त्रास सगळ्यांनाच होतो. अगदी मायक्रोलेव्हल म्हणतात त्यात बदल करायचे म्हटले ना तर या खोट्या मानापमानाच्या जाणिवांचे करावयास हवे. आणि खरच आज गरज त्याचीच आहे ना..म्हणजे मला वाटते..कदाचित चुकीचे ही असू शकेल ..पण आपण सगळ्यांनी मिळून ठरवुया

सप्तसूरांची सप्तसूत्रीही छान आहे>>>> आवडेश छान शब्द आहे हा. Happy

कदाचित माझ्या विचारामध्ये मला इतकेच सूर सापडले ..अजून त्यात आपण सगळ्या मिळून अ‍ॅड करुया..

जसे हे "स" चे सूर आहेत, तशी टाळण्याची ..दूर करण्याची "भ" शब्दाची माळ आहे.
जसे
भय
भेद
भाबडेपण
भ्र्म
आपण करू या चर्चा यावर सखोल..:)

सप्तसूर... अजुनही कुठेतरी मनात सप्तसूर असतात् . आपल्या या सात बलस्थानाचा विचार केला तर जाणवते. ही बलस्थाने आपल्यात आहेतच परंतु त्याचा विकास व्हायला हवा ना.. तो आपणच करायला हवा.

सक्षम: स्त्री ही सक्षम आहेच परंतु काही कारणास्तव जर ती स्वतःला दुबळी समजत असेल तर तिचे ते आत्मभान जागरुक करायला हवे. ती सक्षम आहे ही जाणिव तिच्यात जागृत करायला हवी. अशी एकही गोष्ट नाही की जी तिला केवळ स्त्री म्हणुन साध्य करता येत नाही. नक्कीच नाही.

साक्षर: सक्षम होण्यासाठी साक्षर असण गरजेच आहे प्रत्येकीला. जेणे करुन या जगात ती मागे पडेल असे होणार नाही. आधुनिक काळाशी जुळवून घेताना साक्षर असणे गरजेचे आहे. सक्षम व्हायला ही साक्षर असणे गरजेचे आहे
.
स्वायत्त: प्रत्येक महिलेने स्वायत्त असण गरजेच आहे. कोणावर तरी अवलंबून जगणे नको तिचे..अवलंबलेपण आले की आपसुक लाचारी आली..मिंधेपण आले.

सुदृढ: शारिरीक सुदृढता तर अगदी आवश्यक भाग आहे. तरच हे सगळे समर्थपणे ती पेलू शकेल. अनारोग्य , दुबळेपण नको त्यासाठी तीने स्वतःच सुदृढ रहायला हवे. एकटीचे नाही तर कुटुंबाचे आरोग्य ही ती जपतेच तसे स्वतःचे जपावे.

स्वयंपूर्ण : हो स्वयंपूर्णता हा मोठा भाग आला. व्यवसाय, काम, नोकरी कुठल्या न कुठल्या मार्गाने बाईने स्वतःच्या पायावर उभे रहायला हवे.

संवेदन: संवेदनशीलता हा खास बाईचा मुख्य स्वभाव धर्म. अतिशय संवेदनशील असल्याने ती त्याच संवेदनेने सगळा भोवताल बदलते आणी हीच संवेदनशीलता तिच्या कुटुंबियांच्या मनात रुजवते, रुजवायला हवी. आणी हेच तिचे बळ तिने अंगी आणावे अन कुटुंबाच्या अंगी ही आणावे.

हे झाले बलस्थाना बद्दल..ह्यात आपण सगळ्या मिळुन खूप काही भर घालू शकतो. हे माझे तोकडे विचार असतील पण मैत्रिणींनो तुम्हीही तुमच्या माहितीची भर यात घाला ही विनंती तुम्हाला. आपण सगळ्यांनी हे सात गुण अंगी बाणवून साथ-साथ चालायला हवे म्हणजे आपली ताकद वाढेल नक्कीच ..हे त्रोटक झाले फार. आपण वर उल्लेखलेल्या "भ" च्या बाराखडी वर पण विचार करुया.