लेखन

भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती

Submitted by पराग१२२६३ on 30 May, 2016 - 08:15

"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.

INS Delhi.jpg

सल्ला

Submitted by अनाहुत on 28 May, 2016 - 10:23

" हे बघ चंदू "

" चंदू ? "

" बर बंडू "

" बंडू ? "

" अरे काय चंदू आणि बंडू मध्ये अडकून पडलाय ? पुढे काय सांगतो आहे ते ऐक ना . "

" बर बर सांगा "

" मग काय ते चंदू का बंडू "

" ते राहूद्या हो काय सांगणार होता ते सांगा . "

विषय: 

'बुधवारा'तल्या 'रेडलाईट'मधली झुबेदा ......

Submitted by अजातशत्रू on 28 May, 2016 - 05:48

झुबेदा .....
रेडलाईटमधली अर्धीकच्ची झुबेदा एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून उभी असते तेंव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि पोपडे उडालेल्या भिंतीचा लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट, मोडकळीला आलेली कवाडे अन त्यावर खिळे बाहेर आलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात अधाशी पुरुषी चेहरयांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरी पासून ते सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे तिथे घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात..
झुबेदाला आता सारं सवयीचे झालेय,

सवाल

Submitted by राजेंद्र देवी on 28 May, 2016 - 01:22

सवाल

लालचुटुक ओठ तिचे
मऊसूत गाल
पापण्यांआड दडलेले
डोळे तिचे कमाल

नजरेत तिच्या तलवार
अन नजरेतच ढाल
तिरपा एक कटाक्ष
होतो मी हलाल

गाली गुलाब फुलतो
उधळीत सुगंधी गुलाल
कुरळ्या केसात फिरतो कर
करी शांतता बहाल

रोज झोपतो मी हि
ओढून स्वप्नाची शाल
सत्यात कधी उतरेल
हाच नशिबाला सवाल

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

पांथस्थांचा विसावा ...

Submitted by अजातशत्रू on 27 May, 2016 - 23:24

old man.jpg

यंदा ऊन जरा जास्त आहे तेंव्हा वाटेने पुढे जाताना आमच्या या पडवीत येऊन घडीभर बसा अन ताजेतवाने व्हा, शांतशीतल सावलीचा मनसोक्त आनंद घ्या.... वारयासोबत सांगावा धाडा अन सावलीला कान देऊन ऐकता ऐकता थोडी पाठ टेकवा..प्रेमाच्या दोन गुजगोष्टी करा अन मनातले मळभ निघून गेले की आमचा हळवा निरोप घ्या...आमच्याशी बोलायला तुम्हाला ओळखीची गरज नाही पडणार ! सगळे वाटसरू आमचे सोयरेच ! त्यासाठी नात्यागोत्याची गळ कशाला ? गावाकडच्या वाटेतल्या रस्त्यावरची आम्ही पिकली पाने, तरीही आमचे जिणे कसे बहारदार आहे हे डोळे भरून बघून जा !

डाकिया डाक लाया डाक लाया, कारगिलचा पोस्टमन

Submitted by सोन्याबापू on 27 May, 2016 - 23:03

कथा संपादन शुद्धी श्रेय मायबोलीकर सहेली ह्यांना दिलेच पाहिजे, मोबाइल वर घाईघाईत खरड़लेल्या लिखाणाला वेळात वेळ काढून संस्कारित केल्या बद्दल त्यांचे असंख्य आभार

मे 09,1999,0930 वाजता

विषय: 

पुण्याच्या जंक्शनवर फेरफटका

Submitted by पराग१२२६३ on 25 May, 2016 - 05:07

बरेच दिवसांनी पुणे जंक्शनवर सहजच गेलो. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाणे आणि तिथे चाललेल्या सगळ्या रेल्वेविषयक घडामोडींमध्ये रममाण होणे हा तसा माझा छंदच. यातून मिळणारा आनंद काय हे कसे-कसे सांगायचे माहीत नाही. अलीकडे श्रमपरिहार म्हणून पुण्याच्या स्टेशनवर जाणे बरेच दिवस झाले नव्हते. परगावी जाण्याच्या निमित्ताने जाणे झाले, पण फेरफटक्यासाठी म्हणून झालेले नव्हते. म्हणूनच जरा मोकळा वेळ मिळाल्यावर पुण्याच्या जंक्शनवर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेण्यामागे कारणही तसेच होते. निजामुद्दीन-पुणे दरम्यान नवी वातानुकुलित एक्सप्रेस त्या दिवशी सुरू होणार होती.

शृंगार १४

Submitted by अनाहुत on 24 May, 2016 - 05:06

आजकाल काय चालल आहे तेच कळत नाहीए . काय तर म्हणे परांजपे सर need your help . छे मलापण वाटल करावी मदत पण मदत म्हणजे काय त्यांना आज अर्जंट काही माहिती हवी आहे आणि ते फक्त त्यांना जाऊन एक्सप्लेन करायच नव्हत तर ती डॉक्यूमेंट त्यांच्या ऑफिसमध्ये मलाच घेऊन जायची होती . छे आता एवढचं बाकी राहील होत . तरीही गेलो तर तिकडे वेगळाच प्रकार , माझ्याकडून डॉक्यूमेंट घेऊन मला चक्क ऑफिसच्या बाहेर थांबायला सांगण्यात आल व जाऊ नये अशी गळही घालण्यात आली . आता काय बोलाव हे समजत नव्हत .

विषय: 

श्‍वेता नावाचं फिनिक्‍स

Submitted by बावरा मन on 22 May, 2016 - 00:18

हल्ली कामासाठी बऱ्याचदा माझं ‘फँटम फिल्म्स’च्या अंधेरीमधल्या ऑफिसमध्ये जाणं होतं. ‘फँटम फिल्म्स’ म्हणजे अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहेल आणि मधु मंतेना या चौघांनी मिळून सुरू केलेलं, प्रॉडक्शन हाऊस. तर ‘फँटम’चा स्वतःचा असा एक स्क्रिप्ट डेव्हलपमेंट विभाग आहे, जिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या लेखकांनी पाठवलेल्या चित्रपट संहिता वाचणे, नवीन कथानक डेव्हलप करणे अशी कामे चालतात. तिथे एक छोट्या चणीची सुंदर मुलगी नेहमी, तिच्या लॅपटॉपवर काही तरी वाचत असताना दिसायची. जेव्हा वाचत नसायची, तेव्हा ऑफिसमध्ये उत्साहीपणे भिरभिरत असायची. तिला कुठे तरी पाहिलं आहे, असं सतत वाटायचं.

राजाराम सीताराम एक ....................भाग १७ - मुंबईचा मित्र

Submitted by रणजित चितळे on 17 May, 2016 - 04:45

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११. पिटी परेड.

Pages

Subscribe to RSS - लेखन