Submitted by वैवकु रीटर्न्स on 14 June, 2016 - 02:44
स्वप्न पडलेच तर बघूया की
दु:ख झालेच तर रडूया की
रात्र सगळीकडेच आहे जर
आज इकडेच घालवूया की
फोन करण्यामधे मजा नाही
छान चिठ्ठीच पाठवूया की
जोक ऐकून तर बघू आधी
आणि सुचलेच तर हसूया की
भरकटत जायची मुभा आहे
वाट वळलीच तर वळूया की
जन्म ओवाळलाच आहे तर
जन्म का? आरती म्हणूया की !
~वैवकु
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रात्र सगळीकडेच आहे जर आज
रात्र सगळीकडेच आहे जर
आज इकडेच घालवूया की>>>
छान!
सुंदर! पण तडका टाईप वाटली.
सुंदर!
पण तडका टाईप वाटली.
_/\_ धन्यवाद तडका टाईप <<
_/\_
धन्यवाद
तडका टाईप << म्हणजे कशी ?