मोहनची हुशारी

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:01

मोहनची हुशारी
एकदा एका जंगलात मोहन व त्याची दोस्त मंडळी शिकारीला गेले. संध्याकाळ झाली होती . थोड्याच वेळात अंधार पडणार होता . मोहन व त्याची मित्र मंडळी बाजूच्याच गावात राहत होते . दिवसभर लहान सहान उद्योग करण्यात त्यांचा वेळ जात असे . पण शेतात काम करून पैसे कमावणे त्यांना कमीपणाचे वाटे .
गावभर रिकामटेकडे, उडान टप्पू , बिन कामाची मुले अशी अपमानास्पद नाव ऐकून त्यांना वाईट वाटत होते . म्हणून आपण काहीतरी करून दाखवू या , ह्या गाव वाल्यांना असा विचार करून सगळ्या शिकारीच्या तयारीनिशी ते जंगलात तर पोहोचले . पण थंडी वाढायला लागली होती . बरोबर थोडा मेवा खायला होताच पण चहा पिल्याशिवाय थंडी पळणार नाही म्हणून चहा साखर व चहा बनवण्यासाठी चहाची किटली हि आणली होती सोबत .
एकाने लाकड आणली, एकाने चूल पेटवली वएकाने चहा बनवायला घेतला . एकत्र काम केले तर थंडीही पळेल व आपण एकमेकांना मदत करू असे त्यांना वाटत होते. खरे तर जस जसा अंधार होऊ लागला तस तसा जंगली श्वापदांचा आवाज येवू लागला होता. मनात सगळे धास्तावले होते. आता पर्यंत लांब बसलेले सगळे हळूच जवळ जवळ सरकू लागले .
तश्यातच चहा उकळला . मोहनने किटली उचलली आणि ग्लासात चहा ओतणार तेव्हड्यात अगदी जवळून वाघाची डरकाळी ऐकू आली . मोहन व त्याच्या मित्रांची घाबर गुंडी उडाली . पटापट सगळे सैरा वैरा धावू लागले. मोहनने ते बघतच तोही बाजूच्या उंच झाडावर चढला. हातात चहाची किटली तशीच. तेव्हड्यात वाघ नेमका मोहन ज्या झाडावर चढला होता त्याच झाडाखाली येवून उभा राहिला .
मोहन खूपच घाबरला. त्याचे मित्र हि जवळपास दिसेना . त्याचा अंगाचा थरकाप होऊ लागला. त्यामुळे हातातल्या कितलीतील चहा खाली सांडू लागला . वाघाने वर बघितले तर त्याला चहाची धार दिसली . पटकन त्याने ती धार पकडली व तो त्या चहाच्या धारेला पकडून वर झाडावर चढू लागला.
आता काय करावे ? मोहन अजूनच घाबरला, पटकन त्याने शिकारीसाठी आणलेला चाकू काढला . तेव्हड्यात वाघ खूप उंचावर मोहनच्या अगदी जवळ येवून पोचला होता. प्रसंगावधान राखून मोहनने पटकन त्या चाकूने चहाची धारच कापून टाकली . आणि काय आश्चर्य ? धाडकन वाघ जमिनीवर आपटला . इतक्या उंचावरून पडल्या मुले वाघाच्या बरगड्या तुटल्या व वाघ मेला.
मोहनच्या जीवात जीव आला . तो हळूच खाली उतरला . त्याच्या लक्षात आले कि वाघ तर मेलाय . त्याने जोरात ओरडून मित्रांना हाका मारल्या . सगळे जन पटापट इकडून तिकडून लपून बसलेले बाहेर आले . मोहन वाघाच्या अंगावर पाय ठेवून उभा राहिला . सगळे आश्चर्य चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले.
मोहन म्हणाला ," पाहिलंत मी वाघ मारला . चला हा वाघ घेवून खांद्यावर . जावून दाखवूयात गाव वाल्यांना, आम्हाला निरुद्योगी म्हणता काय? बघा ह्या वाघाला . किती शूर आहोत आम्ही . "
असे म्हणून तो स्वताचीच तारीफ करू लागला. तेव्हड्यात ज्याने मोहनची वाघा बरोबरची झटापट प्रत्यक्ष पाहिली होती त्याने विचारले ," उद्या गावात जर वाघ आला तर जाशील ना त्याला मारायला ?
मोहन नरमला व म्हणाला," अरे , मी तर आज धाडस दाखवले , काय माहित उद्या अजून हुशारी दाखवली तर तेही करून दाखवू. "
असे म्हणत हसत हसत वाघाला घेवून सगळे गावाला परतले .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहा(वाला).

वाघ.

शिकार.

शिव-शिव! अहो, प्रतिकात्मक कथा आहे. सुतावरून स्वर्ग गाठतात तसा चहाच्या लाटेवर स्वार झालेल्या वाघाबद्दल ठाऊक न्हाय व्हय तुमा लोकास्नी?

Sati, agdi kharay tumch, ti dhar nemki kashachi hoti he tumhala thauk ahe . Khup gamatidar gosht hoti ti. Hi gosht Maharashtra times madhe chhapun ali ahe.

या कथेच्या आम्ही ऐकलेल्या वर्जनमध्ये वाघाला बघून लागलेली 'धार' चहाची नव्हती! >>> Lol

मग कापली कशी>>> Lol

अशा लहान मुलांच्या गोष्टी असत पुर्वी.