सुंदर ते ध्यान उभे सामोरी
गालातच हसते नजर माझ्यावरी
नाकात नथ कानात बाळी
हसता गालात पडली गालावर खळी
हातात कंगन पायात पैंजण
मोहक रूप बघता वाढले हृदयाचे स्पंदन
मोकळ्या केसांतून आली गालावर एक छटा
तिला कानामागे घेण्याचा कितीही आटापिटा
वाऱ्याची झुळूक येता दरवळला सुगंध
विसरलो मी स्वतःला आणि झालो तुझ्यात दंग
शिर्षक काय द्यावे हे न सुचल्याने चला हवा येऊद्या च्या तालावर कै च्या कै शिर्षक दिले आहे ते गोड मानून घ्यावे व अनंताच्या फुलांचे फुलणारे रुपडे पहावे ही विनंती 
१)

२)
सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे. हे फुल ठेवले टेबलवर की दिवसभर सुगंध दरवळतो.
१)संध्याकाळी एक एक पाकळी उमलतेय.