मिशन फ्लोरा - भाग १

Submitted by अविनाश जोशी on 12 March, 2025 - 07:37

मिशन फ्लोरा - भाग १
१७-३-२४५१ कमांडर समीर सेमवाल आपल्या शेरलॉक २३५ या यानावर अभ्यासिकेत बसला होता. हे यान हायपरजंपच्या HJB२७ या स्टेशनवर डॉक झाले होते. त्याचे यान HJB२७ येऊन दोन आठवडे झाले होते पण कोठेही त्याला मिशन मिळत नव्हते.
२१०४ मध्ये पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ झाली होती. या वेळेपर्यंत हायपरजंप याने सरार्स वापरात येत होती. पण २१०४ मध्ये मानवजातीचे भविष्यच बदलले. कारण झाले एक महाकाय धूमकेतू. तो पृथ्वीवर आपटला नाही पण त्याचे वस्तुमान प्रचंड होते आणि त्यामळे पृथ्वीच्या एक पूर्णांक चार दशांश दशलक्ष किलोमीटर इतक्या जवळून गेल्यामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती वाढली. पृथ्वीचा दिवस चोवीसतास ऐवजी साडेबावीस तास झाला. याशिवाय पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती वाढली त्यामुळे वर्षाचे ३०४ दिवसच झाले. या सगळ्याचा परिणाम म्हणून पृथ्वी सूर्याच्या जवळ सरकली. चंद्राची कक्षाही लहान झाली आणि चंद्राची गती आता पृथ्वी पेक्षा वेगळी झाली. ३०४ दिवसाचे वर्ष सोप्पे होते. नंतर घुसडलेल्या जुलै आणि ऑगस्ट ला डच्चू मिळाला आणि वर्ष दहा महिन्याचे झाले.
या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढले त्यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुव वितळून जगभर समुद्राची पातळी तीस मीटरने वर गेली. यामुळे समुद्र काठची सर्व बंदरे आणि मोठाली शहरे पाण्यात नष्ट झाली. मुंबई, रॉटरडॅम, म्युनिक, सॅनफ्रान्सिस्को , पनामा, सुएझ कालवा आणि अनेक बंदरे आणि बेटे पाण्यात बुडून गेली. २१०५ मध्ये केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पृथ्वीवरतील चारशे कोटी लोक बुडून मेले. कित्येक बेटे सुएझ पनामा सारखे कालवे समुद्रात गडप झाले. युरोप मधील बरीच बंदरे आणि शहरे समुद्रात गडप झाले. इंग्लंडचाही बराच भूभाग पाण्याखाली गेला. भारतातील चाळीस टक्क्याहून जास्त भूभाग पाण्याखाली गेला. २१११ च्या कालगणनेनुसार भारतातील लोकसंख्या फक्त सत्तावीस कोटी उरली. जगात असलेल्या आठशे कोटी लोकसंख्येपैकी पाचशे कोटी जगली. पृथ्वीचे तापमान वाढत गेल्यामुळे पसरलेले रोग आणि उन्हाच्या चटक्यामुळे अजून दोनशे कोटी लोकांचा बळी गेला. विषुवृत्तावर तापमान सत्तर डिग्री सेल्सिअसच्या वर गेले. तिबेट आणि हिमालयातील बर्फ विळतळून प्रचंड पूर आले. २०३१ पर्यंत हिमालय, आल्प्स आणि अँडीस सारख्या पर्वत राजीवरून बर्फ नाहीसा झाला आणि तिथले तापमान वाढले. श्रीनगर मधील तापमान ५५ डिग्री Celsius च्या वर जाऊ लागले. २१४१ पर्यंत विविध कारणाने पृथ्वीची लोकसंख्या फक्त पन्नास कोटीच्या खाली गेली. आत्तापर्यंत हायपरजंपच्या यशामुळे पृथ्वीवर मानवाला परग्रहावर स्थायिक होण्याचे स्वप्न दिसू लागले. २१५१ मध्ये फाइंडर सिरीज मधील २५० उपग्रह सोडण्यात आले आणि त्यांचे काम होते मानवाला जगण्यास मदत करतील असे ग्रह शोधणे. उदाहरणार्थ ऑक्सिजनचे प्रमाण १२ ते २४ %, पाण्याची उपस्थिथी , हवामान आणि जमीन, वनस्पती आणि प्राणांकरिता उपयोगी. फाइंडर सिरीजने दहा प्रकाश वर्षाच्या आतील १७ उपग्रह शोधले हे सर्व जीवनाला अनुकूल होते. त्यानंतर या सतरा ग्रहांची नोंदणी करून त्यांच्या दिशेने एकूण ५१ ऑब्जर्व्हर उपग्रह पाठवण्यात आले. या उपग्रहात बरीच सेन्सेटिव्ह उपकरणे बसवण्यात आली होती. त्याने ग्रहांचे मॅपिंग केले. त्यानंतर वनस्पती आणि जीवांचे आणि त्याच बरोबर जमिनीतील आणि हवेतील वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केले. त्याच बरोबर त्या ग्रहांवर कुठला उत्क्रांती झालेला प्राणी जमिनीवर किंवा जमिनीखाली आहे का याचे पृथक्करण केले. यापैकी ३ ग्रह मानवाच्या वसाहतीस योग्य आढळले. मग लँडर उपग्रहांनी प्रत्येक फेरीत त्या उपग्रहावर वाढू शकणारे असे ५०० पेक्षा अधिक वनस्पती आणि चारशे पेक्षा अधिक प्राण्यांचे, माश्यांचे, कीटकांचे बीजांड पाठवले. त्यानंतर लँडरमध्ये त्याची वाढ कॉम्पुटरद्वारे करण्यात येऊन पहिल्यांदा वनसंपत्ती आणि नंतर प्राण्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक करण्यात आले. त्यानंतर पाच वेळेला दर दहा वर्षांनी ऑबसेर्व्हर उपग्रहाद्वारे परीक्षण करण्यात येऊन मानवाला सेटल होण्याची शक्यता अजमावण्यात आली.
सर्व अनुकूल असल्यास पन्नास स्त्री पुरुषांच्या जोड्या आणि वीस हजारहून जास्त फ्रोझन गर्भ त्या ग्रहावर पाठवण्यात आले. साधारणतः एक वर्षाने सर्व स्थिती पाहून पाच हजार जोडप्याना हर्क्युलस या यानाने पाठवण्यात आले. प्रत्येक जोडीने चार मुलांची जबाबदारी घेणे आवश्यक होते. ती तीन वर्षाची होईपर्यंत पुढचे प्रजनन होऊ नये असा नियम होता. त्या नंतर तीन वर्षांनी अजून पाचशे जोड्या पाठवण्यात आल्या. या जोड्या वेगवेगळ्या प्रोफेशन मधील होत्या. त्यामुळे अल्पावधीतच ग्रहाची लोकसंख्या तीस हजारच्या वर जाऊन पुढची वाढ निसर्ग नियमानुसार होत होती
काही उपग्रह वरील प्रमाणे वस्तीसाठी निवडले गेले तर काही त्यांच्याकडून होऊ शकणाऱ्या विविध उद्पादना करीत निवडले गेले. उदाहरणार्थ चंद्र तळ सर्वात पहिल्यांदा कार्यान्वित झाला. आज तिथे तीनशे जोडपी आणि तीन लाखापेक्षा जास्त यंत्रमानव कार्यान्वित आहेत. तेथे शंभर स्केवर किलोमीटरमध्ये दुग्ध आणि दुग्ध उत्पादन असे काम चालते. तेथे सुमारे पन्नास लाख गायी आणि म्हशी असून त्यातून इतर ग्रहण UHT दूध , दुधाची पावडर, दही, चीज, लोणी आणि तुपाचा प्रचंड सप्लाय इतर ग्रहांना होतो. यावर फक्त पाच मानव देखरेख करतात. दुसऱ्या दहा स्केवर किलोमीटरमध्ये गुरांकरितात लागणारे फॉडर तयार होते. तिसऱ्या दहा स्केवर किलोमीटरमध्ये साखरेचे उत्पादन होते. बायो फीड मध्ये उसाची गरज नसते. तिथले साखरेचे उत्पादन सुमारे पाच लाख टन प्रति दिवशी आहे. चौथ्या दहा स्केवर किलोमीटरमध्ये यंत्र दुरुस्तीचे आणि नवनिर्मितीचे कार्य चालते. तेथे सुमारे दोनशे पेक्षा जास्त मानव काम करतात. अशा रीतीने चंद्र तळ हा सर्व तळांना पुरवठा करण्यास समर्थ ठरला आहे.

तळांची संख्या हळूहळू वाढत गेली. २४५० पर्यंत तीस पेक्षा जास्त वसतिगृह आणि चाळीस पेक्षा जास्त उत्पादनगृह सुरु झाले. पण तरीही असंख्य ग्रहांची जरुरी होती. फ्लोरा किंवा के८२४२बी हा त्यातलाच एक ग्रह. सुरवातीचे रिपोर्ट अत्यंत सुरेख होते. मानवाच्या वास्तव्यासाठी उपग्रह आटोपशीर आणि पद्धतशीर होता
शंभर वर्षांपूर्वीच त्यावर असंख्य प्रजातीचे वृक्ष प्राणी हे ठेऊन त्यांच्या वाढीस सुरवात केली होती. दर दहा वर्षांनी होणाऱ्या ऑबसेर्व्हर पाहणीत सारे कसे शांत शांत होते. पण शेवटच्या ऑबसेर्व्हर पाहणीत लेवल पाच अलर्ट आला होता. याचा अर्थ काही अकल्पित गोष्टीमुळे झालेला प्रकार. फ्लोरावर या अलर्ट चे स्वरूप म्हणजे एका बाजूला ५०-६० फुटावर वृक्ष वाढत होते दुसऱ्या बाजूला प्राणी वाढत होते पण प्राणी जगतातले एक फुटाहून जास्त उंचीचे प्राणी एका ठराविक विभागात राहत होते. जणू काही फ्लोरा ग्रहावर वनस्पती आणि प्राण्यांची रस्सीखेच चालली होते. त्यानंतर लेव्हल चार चा अलर्ट आला. फ्लोरा सारख्या ग्रहावर हौशी पर्यटक परवानगी घेऊन जाऊ शकत.
अशाच चार पर्यटकांचे पथक ग्रहावरून नाहीशे झाले होते. ऑबसेर्व्हरने सर्व ग्रह तपासला पण त्याला पर्यटकांच्या कपडे आणि सामानाशिवाय काहीही सापडले नाही. आता मात्र केंद्रीय शोध संस्थेला सर्वच प्रकारची काळजी वाटू लागली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users