इराण – इराक
ट्रम्प यांनी इराणविरुद्ध घोषित न केलेले युद्ध सुरू करून जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. अमेरिकेचे व्यावसायिक दृष्टिकोनातून दोन मुख्य उद्देश आहेत. पहिला म्हणजे तेलाची विक्री डॉलरमध्ये करणे आणि दुसरा म्हणजे जगभरात आधुनिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा पुरवणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर देशांतील विध्वंस आणि मृत्यूबद्दल अमेरिकेला फारशी काळजी नसते.
१९व्या शतकात अमेरिकेचे लक्ष ऊस आणि तंबाखू यांसारख्या कृषी उत्पादनांवर होते. त्या काळात अमेरिकेने लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांवर कब्जा केला, जे पूर्वी स्पॅनिश साम्राज्याचा भाग होते. तसेच अनेक लहान द्वीप राष्ट्रांवरही अमेरिकन सैन्याने ताबा मिळवला.
२१व्या शतकात अमेरिकेने इराक, अफगाणिस्तान आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांमध्ये हस्तक्षेप केला. मात्र, हे देश देशभक्त असल्यामुळे अमेरिकेला खऱ्या अर्थाने विजय मिळवता आला नाही.
इराणविरुद्ध एकतर्फी युद्ध करणे हे ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांचे चुकीचे आकलन होते. अमेरिका आणि इस्रायलला वाटले की इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांना हटविल्यास इराण शरण येईल. तसेच लोक विद्यमान सत्तेविरुद्ध उठाव करतील आणि अमेरिका नवीन सरकारवर सहज नियंत्रण मिळवून इराणच्या तेलावर ताबा मिळवेल, अशी अपेक्षा होती. हा अंदाज CIA ने व्यक्त केला होता, परंतु त्यांनी इराणमधील प्रबळ देशभक्तीची भावना दुर्लक्षित केली.
खोमेनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्यामुळे उलट अमेरिकेविरुद्ध देशभक्तीची लाट निर्माण झाली. अमेरिकेला वाटले की सर्वोच्च नेतृत्व हटविल्यास इराणची कमांड संरचना कोसळेल, परंतु इराणने आधीच बहुपातळी नेतृत्व व्यवस्था तयार ठेवली होती.
अमेरिकेला आपल्या लष्करी शक्तीचा मोठा अभिमान होता. त्यांनी अत्याधुनिक F-35, B-2 बॉम्बर्स, विमानवाहू नौका आणि विविध प्रकारची क्षेपणास्त्रे व बॉम्ब तैनात केले. सुमारे ६०,००० सैनिक इराणच्या आसपास तैनात केले. याशिवाय अरब समुद्रात विमानवाहू नौका, विध्वंसक जहाजे आणि अणु पाणबुड्याही तैनात करण्यात आल्या. बहरीन, यूएई, कतार, सौदी अरेबिया आणि जॉर्डन येथील तळांचा वापर करण्यात आला. मात्र, युरोपमधील अनेक NATO देशांनी अमेरिकन युद्धविमानांना त्यांच्या देशातून उड्डाण करण्यास परवानगी दिली नाही.
इतक्या शक्तीनंतरही अमेरिकेला इराणवर निर्णायक विजय मिळवता आला नाही. इराणने अमेरिकेविरुद्ध आपली युद्धनीती प्रभावीपणे विकसित केली होती. इराणला माहीत होते की विमानतळ किंवा नौदलाच्या बाबतीत ते अमेरिकेला तोंड देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी स्वस्त क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून अमेरिका आणि इस्रायलला मोठे नुकसान पोहोचवले.
जगातील एकही देश (पाकिस्तान वगळता) अमेरिकेच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही. बहुतेक युरोपियन NATO देशांनी या युद्धात सहभाग घेतला नाही.
तरीही अमेरिकेला काही उद्दिष्टे साध्य करता आली:
अनेक वर्षे साठवून ठेवलेला दारुगोळा वापरला गेला.
अनेक शस्त्रास्त्रांची प्रत्यक्ष युद्धात चाचणी झाली.
जगातील अनेक देशांनी संरक्षण बजेट मोठ्या प्रमाणात वाढवले.
सर्व पक्षांनी हवाई संरक्षण प्रणालींची चाचणी केली. इराणने होर्मूझ सामुद्रधुनी बंद करून तेलबाजारात मोठी खळबळ उडवली.
इराणची युद्धनीती अमेरिकेच्या ताकदीपेक्षा अधिक प्रभावी ठरली. त्यांच्या शस्त्रास्त्रांचा खर्च अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी होता.
इराणने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून काही संरक्षण भेदून लक्ष्य गाठता आले.
अशा परिस्थितीत महागडी अमेरिकन शस्त्रास्त्रे खरेदी करण्याऐवजी स्वस्त पर्याय अधिक प्रभावी ठरू शकतात, असा प्रश्न निर्माण झाला.
चिनी शस्त्रास्त्रेही प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरली नाहीत.
इराण – इराक
Submitted by अविनाश जोशी on 4 May, 2026 - 08:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्याच्या एअर फोर्स स्टेशन
पुण्याच्या एअर फोर्स स्टेशन तर्फे लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके दरवर्षी पुण्यामध्ये होत असतात. मला तर हे युद्ध म्हणजे अमेरिकेने त्यांना आणि इतरांना त्यांच्या शस्त्रशक्तीची प्रात्यक्षिके करण्यासाठी भरवलेले तसलेच प्रदर्शन वाटले..