कथा कादंबऱ्यांचा यंत्रमानवी कारखाना
Submitted by हेमंतकुमार on 13 May, 2026 - 06:43
AI मुळे पोटार्थी लेखक आणि अन्य काही कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी वास्तव भीती आज घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत.
विषय:
शब्दखुणा: