दम मारो दम

Submitted by अविनाश जोशी on 27 April, 2026 - 04:19

दम मारो दम
झीनत अमान हिने हिंदी सिनेमात अल्ट्रा मॉर्डन लूक आणि ऍटिट्यूड. देव आनंद बरोबर तीने बऱ्याच फिल्म केल्या पण ती खरी सिने सुर्ष्टीत आली ती 'दम मारो दम गर्ल' म्हणूनच. 'हरे रामा हरे कृष्णा' या फिल्म करिता देव आनंद नवीन नायिकेच्या शोधात होता. वहिदा रहमान, हेमामालिनी त्या काळच्या सर्व नायिकांनी नकार दिला होता. कारण भूमिका देवानंदच्या बहिणीची होती. भूमिका बोल्ड आणि हिप्पी तरुणीची होती. झीनतने या भूमिकेचे सोने केले. झीनतने आपले नेहमीचे नाव न लावता आपल्या वडिलांचे अमान हे नाव लावले ते प्रसिद्ध उर्दू पटकथा लेखक होते. मुगले आझम सारख्या सिनेमातही ते एक लेखक होते. झीनत मिस इंडिया झाली नाही परंतु तिने मिस आशिया पॅसिफिक हा बहुमान मात्र मिळवला. नंतर तिने काही इंग्रजी चित्रपटात छोट्या भूमिकाही केल्या. परंतु तिला प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून दिले ते 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटाने. 'दम मारो दम' ही तिच्या तोंडी असलेले गाणे तर अफलातूनच होते.
त्याकाळी झीनतमान हे मॉडेल तरुणीचे स्टॅण्डर मानले जाऊ लागले. तिच्या मागोमाग आलेली परवीन बाबी ही त्यामुळे गरिबांची झीनतमान ठरली. तिचे वैवाहिक आयुष्य मात्र खाच खळग्यांनी भरलेले होते. संजय खान बरोबरचा पहिला विवाह किंवा मजहर खान बरोबरच दुसरा विवाह हे दोनही फ्लॉप शो ठरले. काही वर्षांनी राजकपूर 'सत्यम शिवमचे' कास्टिंग करत असताना झीनत त्याच्या ऑफिस मध्ये आदिवासी तरुणीच्या वेशामध्ये गेली. आर के कॅम्प मध्ये गेल्यामुळे तिचे आणि देव आनंद संबंध दुरावले. 'दम मारो दम' या गाण्यामुळे एक वेगळाच हृदयस्पर्शी प्रकार घडला. तिच्या बरोबरच्या हिप्पी कळपात एका मुलीची ओळख तिच्या वडिलांना अमेरिकेत कळली आणि त्यांनी देव आनंदशी संधान बांधून आपल्या मुलीला प्रेमाने परत घरी घेऊन आले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळप प्राण्यांचा असतो.
माणसांचा समूह किंवा तांडा म्हणण्यात यावे.
----------------
रोचक किस्सा. झीनत अमान छान होती. पण 'दो लफ्जों की है' गाण्यमधे, माझ्या मते अमिताभच तिच्यापेक्षा प्रेक्षणिय दिसलेला आहे. स्वप्निल डोळे आणि रोमँटिक.
कदाचित 'ग्रेट गँबलर' सिनेमात त्या गाण्यात तिचा रोल, ग्राऊंडेड रहाण्याचा असेल - मला माहीत नाही पण ती स्वप्नाळू व रोमँटिक कमी वाटते. ती त्याला फसवत असते की काय कोण जाणे.

<<<तिच्या बरोबरच्या हिप्पी कळपात एका मुलीची ओळख तिच्या वडिलांना अमेरिकेत कळली आणि त्यांनी देव आनंदशी संधान बांधून आपल्या मुलीला प्रेमाने परत घरी घेऊन आले.>>>

अरे वाह
हे इंटरेस्टिंग आहे..

झीनत अमान म्हणजे तीच ना...
क्या देखते हो
सूरत तुम्हारी