संगीत

मैफल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

# 'माहेर' मासिकाच्या ऑक्टोबर २०११ अंकामधे पूर्वप्रकाशित.
# मायबोलीवर आयोजित केल्या गेलेल्या एका कथाबीज स्पर्धेतील मुद्यांवरून ही कथा बनवली होती. तेव्हा मर्यादित स्वरूपात लिहीलेली ही कथा नंतर विस्तारीत केली होती.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

"थोडा. थोऽऽडा कमी पडतोय बघ. जऽरा वर लागुदे.." हवेत चिमुट नाचवून, डोळे बारिक करत सुधीर म्हटला, "किंऽचित."

त्याच्या तिरक्या मानेकडे बघुन चंदू हसला. समजल्यागत मान हलवली आणि परत आकारात चालू झाला.

प्रकार: 

घन भरुन येती....

Submitted by पल्ली on 20 December, 2011 - 00:12

Ghan bharun yeti....jpg

देवकी पंडीत ह्यांच्या सुरेल आवाजात माझ्या आठ गाण्यांचे रेकॉर्डींग मुंबईला 'स्वरलता' स्टुडीओ मध्ये झाले. गाण्यांना संगित दिले आहे नरेंद्र देशपांडे ह्यांनी. आणि संगित संयोजन आहे शैलेश दाणी ह्यांचे. फाऊंटन म्युझिक कंपनीने मार्केटिंगसाठी कौल दिला आणि आता योग्य वेळ पाहून ते सि.डी. प्रकाशित करतील.

किती घेशील दो कराने.... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Submitted by प्रज्ञा९ on 13 December, 2011 - 09:47

कधी कधी काही चांगल्या गोष्टी घडतात त्याही आपल्याला अकल्पितपणे! या वर्षी सवाईला मी पुण्यात असेन असं वाटलं नव्हतं आधी. पण आल्यावर मात्र एक तरी सेशन ऐकायला जायचं नक्की केलं. याआधी ३ वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ऑफिसमधून संध्याकाळी थेट रमणबाग. तो सवाईचा पहिला अनुभव. आणि या वेळचा दुसरा.

विषय: 

मनाला भावलेले काही.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सध्या नाचाचे, गाण्याचे अनेक रीअ‍ॅलिटी शोज सुरू झालेले आहेत. लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंतचे.
त्यातच अंदाज घुसवून 'आप गायकही नही , महाग्आयक हो' म्हणायला महाअंतिम फेर्‍या असतात. पण अशांमध्ये काही काही गाणी, नाच अगदी आवडून जातात. मला आवडलेले असेच काही.

काळ देहासि आला खाउ हे प्रथमेशने गायलेले गाणे. सुरूवातीची निलेशची ढोलकी वाजवतानाची दाद, तो अभंग, ताना आणि लय, आणि हृदयनाथांनी "आभारी आहे मी तुमचा. आनंद दिलात तुम्ही मला" असं म्ह्टल्यावर, भरून आलेले डोळे आणि आपोआप जोडलेले हात. चांगलेच लक्षात आहेत.

प्रकार: 

मुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम

Submitted by हिम्सकूल on 3 November, 2011 - 06:11
तारीख/वेळ: 
13 November, 2011 - 06:30 to 09:30
ठिकाण/पत्ता: 
भरत नाट्य मंदीर, पुणे

बालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..

खास बालगीतांचा कार्यक्रम..

१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...

कवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..

ह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्‍या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...

प्रांत/गाव: 

विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या खर्‍याखुर्‍या नायकास...

Submitted by विनायक_पंडित on 31 October, 2011 - 08:52

प्रिय अरुण,

'देऊळ'च्या निमित्ताने गीतकार स्वानंद किरकिरे यांच्याशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 20 October, 2011 - 23:22

सुप्रसिद्ध कवी श्री. स्वानंद किरकिरे यांनी 'देऊळ' या चित्रपटातली तीन गाणी लिहिली आहेत. त्यांपैकी 'वेलकम' हे गाणं तर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. 'बावरा मन देखने चला एक सपना' या कवितेनं रसिकांच्या मनावर गारुड करणार्‍या श्री. स्वानंद किरकिरे यांच्याशी केलेली ही बातचीत.

swanandkirkire.jpg

छायाचित्र - गॉर्की

'देऊळ'चे संगीत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 October, 2011 - 04:22
'वळू' आणि 'विहीर' या उमेशच्या चित्रपटांमध्ये गाणी नव्हती. या दोन्ही चित्रपटांमध्ये संगीताचा उत्कृष्ट वापर मात्र केला गेला होता. 'देऊळ'मध्ये मात्र उमेशनं गाण्यांचा कथानक पुढे नेण्यासाठी, त्यातून विचार मांडण्यासाठी वापर केला आहे.

या चित्रपटात तीन गाणी असून त्यांपैकी एक गाणं ज्येष्ठ गीतकार श्री. सुधीर मोघे यांनी तर दोन गाणी श्री. स्वानंद किरकिरे यांनी लिहिली आहेत. संगीत श्री. मंगेश धाकडे यांचं आहे.

भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

'देऊळ' - संगीत प्रकाशन सोहळा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 October, 2011 - 01:18

गेल्या सोमवारी ३ ऑक्टोबरला जुहू मुंबई येथे 'देऊळ'च्या संगीत प्रकाशनाचा सोहळा पार पडला. तेव्हा चित्रपटातले सर्व कलावंत व तंत्रज्ञ उपस्थीत होते.

Music_Launch.jpg

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि नसिरूद्दीन शहा यांच्याहस्ते या ध्वनिफितीचं प्रकाशन करण्यात आलं.

त्यातील दोन गाण्यांची झलक इथे पहा.
१. भजन.

२. आयटम गाणे

Pages

Subscribe to RSS - संगीत