गाथाचित्रशती लेखन स्पर्धा २०१२

विषय क्र.१ - चित्र अवकाश

Submitted by priyalondhe on 31 August, 2012 - 11:55

दिवस वेगाने सरत चालला आहे, संध्याकाळ चोरट्या पावलाने महालात प्रवेशते आहे. इकडे जोधा व अकबर एकमेकांवरील प्रेमाच्या प्रत्ययाने भारावून गेले आहेत. अकबर अचानक काही आठवून जोधाला आपल्या अंतःपुरात घेऊन चालला आहे ... एक अनुपम अशी प्रकाशवेळ गाठण्याकरिता. सूर्य मावळता मावळता एका विशिष्ट कोनातून काही क्षणच सूर्यकिरण तेथील आरश्यावर पडतात आणि ते सारे दालनच सोनेरी प्रकाशात उजळून निघते. आणि जोधा अकबराच्या मीलनोत्कटतेची परिसीमा गाठली जाते ....

विषय १: एक अतूट नातं - सिनेमाचं

Submitted by सशल on 27 August, 2012 - 18:50

"सिनेमाशी तुझं नातं काय"? असा प्रश्न जर कोणी भारतीय माणसाला विचारला तर मला वाटतंय कमी-अधिक फरकाने "आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख वाटून घेणारा एक सच्चा मित्र" असंच उत्तर मिळेल. मीही ह्याला अपवाद नाही. ओळख झाली तेव्हापासून अगदी मनापासून भरभरून प्रेम केलेलं आणि दोन्हीकडच्या अपेक्षांचा ताळमेळ साधण्यात कुठेच कसर न राहिलेलं हे एकमेव नातं. अर्थात सिनेमा म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती नसली तरी एक सच्च्या मित्राचं जे स्थान आपल्या आयुष्यात असतं तेच सिनेमाचंही आहे.

विषय क्र. तीन: माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट

Submitted by पूनम on 27 August, 2012 - 07:28

ह्या विषयाबद्दल काहीही लिहायच्या आधी एक प्रश्न पडतो तो असा की मराठी चित्रपटांकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, असा प्रश्नच विचारायची वेळ का येते? भारतातल्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट बनतात. त्यांचे ठरलेले फॉर्म्युले असतात. तामिळ, तेलुगू सिनेमे म्हणजे बलदंड नायक, सुंदर, फटाकडी आणि नायकावर अवलंबून असलेली नायिका, अतिशय क्रूर असा खलनायक आणि त्याची ’सेना’, सुमधूर, ठेक्याची गाणी आणि ह्या सगळ्याला बांधून ठेवणारा कथेचा एखादा क्षीण धागा हे पक्के! बंगाली-कन्नड सिनेमे थोडे वेगळ्या वाटेने जाणारे- वैचारिक असे.

विषय: 

प्रकार १- सिंहासन- माझी आवड

Submitted by मोहन की मीरा on 23 August, 2012 - 05:45

मला आठवतं आहे की एके रविवारी आम्ही सगळे एक चित्रपट पहायला गेलो. थेटरात नाही तर बाबांच्या मित्रा कडे प्रोजेक्टर वर सिनेमा बघायला गेलो. मी खूपच लहान होते बहुदा ६-७ वर्षांची. त्या वेळी प्रोजेक्टर वर सिनेमा पहायचा म्हणजे अगदी नवलाई होती.

विषय: 

विषय क्र.१- चित्रपट, मी आणि आठवणींचा कोलाज

Submitted by रुणुझुणू on 13 August, 2012 - 01:21

"ढापणे, काल 'हम आप के है कौन' पाहिला..."
"क्काय ? कसा आहे ? पटकन सांग"
शारीरिक शिक्षणाच्या तासाला शाळेच्या मैदानात कवायती करत असतानाचा संवाद.
माझ्या समोरच्या रांगेत उभ्या असलेल्या सखीने एचेएचके बघितल्याचं सांगितल्यावर माझ्या आवाजाची पातळी ताब्यात राहणं कठीणच होतं.
परिणामी शिक्षकांची बोलणी खायला लागली. पण एचेएचकेची गोष्ट ऐकायला मिळणार ह्या आनंदात शिक्षकांचं रागावणं कोण मनावर घेत बसणार ?
त्या चित्रपटात माझी लाडकी माधुरी होती हे एकच कारण उतावळं होण्यासाठी पुरेसं होतं.

Subscribe to RSS - गाथाचित्रशती लेखन स्पर्धा २०१२