गाण्यांचे ट्रॅक्स/काराओके हवे असल्यास इथे लिहा,

Submitted by चिखलु on 16 August, 2012 - 23:36

गाण्यांचे ओरिजिनल ट्रॅक्स/काराओके हवे असल्यास इथे लिहा, मला शक्य झाल्यास मी पाठवेल, (वैध: १० सप्टेम्बर पर्यन्त)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीयुत चिखल्या,

आपल्या या मदतीबद्दल आपणास धन्यवाद.

खाली दिलेल्या गाण्यांचे काराओके पाठवू शकाल का?

१. लल्लाटी भंडार (जोगवा), आणि
२. नावाची गोजिरी (ऑक्सिजन)

पुनश्च एकवार धन्यवाद.

प्रितीभुषण | 17 August, 2012 - 15:18 नवीन
काराओके म्हणजे काय?

<<
तुमचा बीएमआर हाय आहे. (बी एम आर म्हणजे बेसिक मे राडा) Wink

काराओके म्हणजे त्या गाण्याचे फक्त मुझिक. माणसाचा/बाईचा आवाज सोडून सगळे. ते ब्याकग्राऊंडला वाजवून आपण माईकवर म्हणयचं म्हणजे ऑर्केस्ट्रा नसला तरी चालतो. अशा प्रकारे माईक वाल्या व ब्याकग्राऊंडला गाण्याचे मुझिक वाजेल अशा साऊंड सिस्टीम्स मिळतात. पूर्वी क्यासेट असत. आजका सीडीज.

अविकुमार , Kiran.., बागेश्री
मी बघुन सान्गतो, असल्यास ईमेल करेल अथवा वि पु मध्ये लिहिल

प्रितीभुषण | 17 August, 2012 - 04:48

काराओके म्हणजे काय?
>>>

म्ह्ण्जे फक्त सन्गीत, त्यात गायकान्चे आवाज नसतात

चिखल्या बहुतेक धर्मेंद्राच्या इज्जतमधलं गाणं असावं.

१. खिलते है गुल यहा ( शर्मिली)
२. रातकली एक ख्वाब मे आयी ( बुढ्ढा मिल गया )
३. रंग और नूर की.... किसे पेश करू (गझल)
४. मेरी भीगी भीगी सी ( अनामिका )
५. मेरे मेहबूब तुझे, मेरी मुहब्बत की कसम ( मेरे मेहबूब )
६. ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है ( प्यासा )
७. एहसान तेरा होगा मुझपर ( शम्मीचा सिनेमा आहे.. दिल देके देखो ?)
८. का करूं सजनी आये ना बालम ( स्वामी)
९. तेरे चेहरे मे वो जादू है ( धर्मात्मा )
१०. तनहाई... ( दिल चाहता है )

देवा सारखा धावून आलास बाबा, दोन दिवसापासून करावोके साठी धागा सुरु करायचा विचार करत होतो..
मला 'चप्पा चप्पा चरखा चले- माचीस' चे करावोके व्हर्जन हवे आहेत. गुगल केल्यावर एक-दोन सापडले पण त्यांची क्वालिटी फारशी चांगली नाही.. आपण ट्रॅक्स देऊ शकल काय?
धन्यवाद !

मला एक प्रश्न आहे.. करावके मध्ये. पट्टी आपलयाला हवी तशी सेट कशी करायची?

म्हणजे गायकाने काळी २ (d # ) मध्ये एखाद गाण गायलं असेल.. तर वाद्यही त्याच पट्टीत वाजणार ..
पण समजा आपला आवाज उंच चढत नसेल.. आणि आपल्याला काळी १ मध्ये ( c # ) गायचं असेल.. तरी स्केल बदलता येते काय ?

तुमची कराओके सिस्टिम तशी हवी मग पट्टी बदलता येते. तुमच्याकडच्या दुकांनात चौकशी करा. मी एका कराओके कार्यक्रम करणारीकडे तशी सि. पाहिली आहे. महाग असू शकते Happy

काराओकेचा ट्रॅक ’ऑडेसिटी’ किंवा तशा तत्सम सॉफ्टवेयरमध्ये आपण उघडा(ओपन करा) आणि मग तिथे हवे ते संपादन करू शकता.....लय,पट्टी,वेग वगैरे!

चिखलु, उदय आणि देवकाका, थँक्स !

गेस वॉट, मी नेटला कनेक्ट केलं कारण मला करावके ट्रॅक्स मिळतात का शोधायचे होते. सवयीप्रमाणे पहिल्यांदा माबोला लॉग इन केलं, तर हा धागा दिसला. Happy

देवकाका, मला मदत लागली तर तुम्हाला फोन करणार आहे. Happy

"देवा श्रीगणेशा " या अग्नीपथमधल्या गाण्याचे कॅरॅओके ट्रॅक कोणाकडे मिलेल काय??? प्लीज असल्यास विपूत लिंक द्या. धन्यवाद.

चिखल्या, काय झालं रे माझ्या दोन ट्रॅक्सचं? सापडताहेत का?

देवकाका, 4Sync डाउनलोड केलं आहे. आता पुढे? ट्रॅक्स कसे शोधायचे कळतच नाहीए.

मला "सोबती" या चित्रपटातील "पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे" या गाण्याचा करावके ट्रॅक हवा आहे. या गाण्याचे संगीतकार आहेत पं. श्रीनिवास खळे. या गाण्याचा ट्रॅक मला कुठे मिळेल? आपल्याकडे कोणाकडे तो उपलब्ध आहे का?