शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

Submitted by salgaonkar.anup on 2 May, 2016 - 23:59

लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने स्वयंवराची घोषणा केली.
राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला.
जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या सा-याने वातावरण आगदी प्रसन्न झाले. अनेक देशो- देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र राजदरबारात उपस्थित झाले. राजहत्तीला दरबारातील रिंगणात उभ करण्यात आलं आणि "जो कुणी पुरुष राजघराण्याच्या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल." अशी घोषणा झाली.
शक्ती परिक्षणासाठी सगळे सिद्ध झाले आणि स्वयंवर सुरु झालं.
प्रत्येकाला स्वसामर्थ सिद्ध करण्याची संधी देण्यात आली.
पण राजहत्तीसमोर कुणाच काही चालेना आणि हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय काही वर होईनात.
राजाच्या चेहऱ्यावरचे भाव चिंताक्रांत झाले. राजकन्येला रडू कोसळणार एवढ्यात एक सडपातळ शरीरयष्ठीचा ब्राम्हण तरुण सभामंडपी अवतरला. राजासमोर नतमस्तक झाला आणि एका संधीसाठी प्रार्थना करू लागला. राजाने जड मानाने त्याची प्रार्थना मान्य केली.
संधी मिळताच तो ब्राम्हण हत्ती समोर जाऊन उभा राहिला. हत्तीचा रिंगणाला एक फेरी मारून हत्तीच्या पाठीमागे थांबला. सगळा राज दरबार आता काय होणार या प्रतीक्षेत असताना त्या तरुणाने हत्तीची शेपूट दोनी हातात धरून जोरात खाली ओढली. हत्ती बिचारा कळवळला आणि त्याने जोरात ओरडण्यासाठी आपली सोंड आणि पुढचे दोन पाय वर केले आणि चमत्कार झाला. राजाने ठेवलेला स्वयंवराचा पण पूर्ण झाला, राणीला समाधान आणि राजकन्येला आनंद झाला. आगदी थाटा-मटात राजकन्येचा त्या तरुणाशी विवाह झाला आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात आलं.
राजकन्येच्या विवाहानंतर राजाचे लक्ष कही राजकारभारात लागेना म्हणून त्याने काही वर्षातच उरलेलं अर्ध राज्यही बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभर तशी दवंडीही पिटवली. पुन्हा राजसभेचं आयोजन झालं, राज हत्तीला रिंगणात उभा करण्यात आलं. " राज हत्तीची मान जो होकारार्थी आणि नकारार्थी हालवून दाखवेल त्यालाच अर्ध राज्य बक्षीस दिल जाईल." अशी घोषणा झाली. अनेक राजे, महाराजे, शूरयोद्धे यांना संधी मिळूनही या ही वेळी पराभव स्वीकारावा लागला आणि सुवर्ण संधीची माळ सगळ्यात शेवटी ब्राम्हणाच्याच गळ्यात येउन पडली तसा सगळा दरबार पुन्हा एकदा ब्राम्हनाकडे आशेने पाहू लागला. रिंगणाजवळ जाताच ब्राम्हण आणि हत्तीची नजरा- नजर झाली. ब्राम्हण हत्तीच्या पाठीवर जाऊन बसला आणि हत्तीच्या कानात हळूच म्हणाला, " मला ओळखलस ???" हत्ती म्हणाला' " हो.", मग पुढे ब्राम्हण म्हणाला, "शेपूट ओढू" , हत्ती म्हणाला "नको". राजाच्या पण पुन्हा पूर्ण झाला, पुन्हा एकदा बुद्धिवादी ब्राम्हणाने अर्ध राज्य जिंकलं आणि शक्तीपुढे बुद्धीचं पारडं पुन्हा जड झालं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users