गुंतवणुक

गुढी पाडवा - बार्बरा ( बार्बी) ताई च्या घरी

Submitted by गोपिका on 6 April, 2016 - 22:04

ह्या वर्षी घरीच गुढी बनवायच अस ठरवल.
मग हे असं काहितरी करायच सुचलं.....
आवडेल अशी आशा आहे Happy

१. GudiPadhwa201626FOTOR.jpg
२. FotorCreatedFOTOR.jpg

३. पाया पडावं ही अपेक्षा नाहि....मला स्वत: ला डिटेलिंग खुप आवडल म्हणून इथे फोटो टाकत आहे
GudiPadhwa201641FOTOR.jpg

४. कशी वाटली रांगोळी??

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

Submitted by जाई. on 18 March, 2016 - 03:18

टॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीने पीपीएफ , एलआयसी , एनएसइ वगळता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP ) हा ही एक पर्याय आहे .
तर या पर्यायात कशी गुंतवणूक करायची , त्यासाठी घेतली जोखीम , ह्यात असणारे फायदे तोटे या बाबतीत माहिती हवी आहे.

शेअर मार्केट बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निल्या कुलकर्णी on 2 March, 2016 - 12:47

खुप वर्षा पासुन ठरवत होतो .. शेवटी मागच्या आठवड्यात Dmat , trading account सुरु केले ..खर तर उशीर झाला हे daring करण्या साठी
मी या मधे अगदी नवीन आहे .. त्यामुळे इथे मार्गदर्शन ची अपेक्षा आहे
Entry level laa कोणत्या प्रकारे गुन्तवनुक करावी
कोणत्या शेअर मधे आणि किती रक्कम टाकावी ..
या विषया तील जाणकार , अनुभवी लोकानी सला द्यावा ...
धन्यवाद !!

चांगले आयुर्वेदिक डॉ. सुचवा.

Submitted by मेधावि on 1 February, 2016 - 22:19

नात्यातल्या एका तरुण मुलाला घराबाहेर कुठेही गेले की तेथील अस्वच्छता पाहून मलविसर्जनाची भावनाच होत नाही. २-३ दिवस तो कंट्रोल करून मग घरी आल्यावर कार्यभाग उरकतो. एकंदरीतच त्याचा कोठा जड आहे. एरंडेल तेल घेवूनही कित्येकदा उपयोग होत नाही. व्यायाम करणे, पालेभाज्या व सॅलड्स खाणे, गरम पाणी व तूप पिणे हे सगळे उपाय करून झाले आहेत व चालू आहेत परंतु फारसा फरक नाही. अ‍ॅलोपॅथीच्या फॅमिली डॉ ने हेच उपाय करत रहा असे सुचवले आहे. ह्या प्रकारच्या आजारावर आयुर्वेदामधे उपचार आहेत असे समजते परंतु चां गले डॉ. माहीती नाहीत.

पीएफ व व्हीपीएफ वर टॅक्स पडतो का?

Submitted by मेधावि on 28 January, 2016 - 06:56

पी एफ व व्ही पी एफ ह्या दोन्हीवर टेक्स पडत नाही अशा समजुतीत बरेच दिवस होते परंतु नुकतेस असे ऐकण्यात आले की ह्या दोन्हींच्या व्याजावर टॅक्स पडतो. पीपीएफ, पीएफ व व्हीपीएफ बद्दल अधिक माहिती व फायदे तोटे जाणून घेण्यास आवडेल.

सेकंड होम ठेवावे की विकावे?

Submitted by मेधावि on 23 January, 2016 - 07:06

आमचे एक बावधनला घेतलेले सेकंड होम आहे. ३०-३१ लाखाला ३ वर्षांपूर्वी घेतले होते. इथून पुढे किंमत तशी काही फार वाढेल असे वाटत नाहीये. इन्वेस्ट्मेंट म्हणूनच घेतले होते. पण सोसायटीसाठी लागणारे पैसे, मिळू शकणारे भाडे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे. अजून १५ वर्षांनी रिटायर झाल्यावर ते पैसे/घर पेन्शनीसारखे वापरता येतील अश्या कल्पनेनी घर घेतले होते. परंतू सध्या जरा टु बी ऑर नॉट टु बी झालेय. आत्ता लगेच पैशाची गरज नाही. मिळालेले पैसे बँकेत ठेवले तर कदाचित जास्त फायदेशीर होईल की काय असे वाटत आहे म्हणून विचार घेण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 

तडका - पैसा

Submitted by vishal maske on 11 January, 2016 - 03:31

पैसा

आपल्या कुवतीनुसार
जो-तो कमवतो पैसा
चढ-ऊतार करत कधी
माणसांना रमवतो पैसा

पैशामुळं तर कधी कधी
माणूसकीलाही डागणं आहे
जगण्यासाठी हा पैसा की
पैशासाठी हे जगणं आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - काम

Submitted by vishal maske on 10 January, 2016 - 08:54

काम

पहा म्हणायच्या आधी
ऊत्सुकतेत राहतात
चांगले काम निश्चितच
लोक हौसेनं पाहतात

व्यक्तीच्या कार्यातुन
राहिले जाते नाम
जीवनामध्ये सदैवच
चांगले करावे काम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धंदा अपना अपना

Submitted by vishal maske on 4 January, 2016 - 21:48

धंदा अपना अपना

प्रत्येकाच्या स्वभावाचे
वेग-वेगळे पैलु असतात
कुणाचे वागणे चकचकीत
तर कुणाचे मैलु असतात

इमानदारीचा धंदा इथे
बेइमानी मध्ये घोळतो
मात्र बेईमानीची धंदा
इमानदारीत चालतो,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक