गुंतवणुक

चिनी मालावर बहिष्कार

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2016 - 16:59

चिनी मालावर बहिष्कार !

पाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.
पाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.

खरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..

चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले
http://dhunt.in/1BTad
via NewsHunt.com

भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका

या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे?

Submitted by साती on 21 October, 2016 - 11:15

या छोट्या मोठ्या अपमानांचे काय करावे?
हे कधिसुद्धा ना सरणारे सल काय करावे?

का पुन्हा पुन्हा डसताती नांग्या एका जागी
हे भणभणती डोक्यातच विंचू काय करावे?

जे त्यांच्यासाठी सोपे होते विसरून जाणे
ते मला बोचते क्षणक्षण स्मरूनी काय करावे?

रे 'क्षमा करा वा विसरा' म्हणणे सोपे आहे
मी अशक्त म्हणूनी क्षमा परवडे काय करावे?

निर्भत्सा अथवा सहमत व्हा मुद्द्यांवर माझ्या
शेवटी सोसणे मलाच आहे काय करावे?

शब्दखुणा: 

सायबरबुलिंग!

Submitted by साती on 21 September, 2016 - 01:32

तर मुलांनो फार फार वर्षांनंतरची गोष्ट आहे.
एका कम्युनिटीत एक माणूस ऑनलाईन असायचा.
त्याला सगळ्यांनी आपल्याला 'भाई' म्हणावंसं वाटायचं!
म्हणजे कसं स्ट्राँग, भारी वाटतं वगैरे!
अगदी भाई असा आय डी पण घेऊन झाला.
पण कुणी त्याला भाई म्हणतच नसे.
उलट अवलोकनात (प्रोफाईल) जाऊन त्याचे खरे नाव पाहून त्या नावाने हाक मारत, संबोधत!

माणूस अगदी फ्रस्टेट होऊन होऊन शेवटी ती कम्युनिटी सोडायच्या विचारात आला. शेवटी शेवटी तर चक्क ऑफलाईन राहू लागला.

शेवटी एका काकूंना त्याची दया आली.
त्या म्हणाल्या ' माणसा माणसा, ऑनलाईन ये'
'कसा मी येऊ'
'एक वसा देते तो घे. उतू नको, मातू नको'
'सांगा काकू'

तडका - चौकशीच्या धाडीत

Submitted by vishal maske on 11 August, 2016 - 20:51

चौकशीच्या धाडीमध्ये

ज्याला बळ समजलं
तोच कटकट झाला
बेहिशोबी संपत्तीचा
भुज अंगलट आला

जे कमावलं सुखासाठी
तेच वेदना देऊ लागलं
चौकशीच्या धाडीमध्ये
जप्त होऊन जाऊ लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - यंत्र

Submitted by vishal maske on 8 August, 2016 - 12:03

यंत्र

माणसांच्या जागी
राबु लागले यंत्र
यंत्रांना राबवण्या
विकसित झाले तंत्र

नव-नवे विक्रमही
हल्ली यंत्र रचु लागले
माणसांपेक्षा यंत्रांचे
विश्वास इथे पचु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

(अल्पावधीत माडी कशी चढवावी ? ) *

Submitted by धनि on 12 July, 2016 - 15:32

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.

घर एके घर

Submitted by अपरिचित on 8 June, 2016 - 00:41

मुंबईत घर घेणे आहे. सध्याची परिस्थिती बघता कुठेही घर घेताना मनात धाकधुक असते.
घर पुर्ण अवस्थेतील घ्यावं की अपुर्णावस्तेतील हा ही एकमुद्दा असतो.

तर मित्रांनो,घर खरेदी करण्यापुर्वी काय खबरदारी घ्यावी

शब्दखुणा: 

तडका - प्रॉपर्टी

Submitted by vishal maske on 31 May, 2016 - 11:34

प्रॉपर्टी

असा कुणी क्वचितच भेटेल
जो स्वार्थात गटलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा मोह
नाथांनाही सुटलेला नाही

मोठ्या मोठ्या समस्यांतुन
प्रॉपर्टी सहज तारू शकते
मात्र कधी हिच प्रॉपर्टी
बरबाद सुध्दा करू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सेकंड होम ठेवावे की विकावे?

Submitted by sneharajan on 21 April, 2016 - 03:32

आमचे एक बदलापूर घेतलेले सेकंड होम आहे.२४-२६लाखाला १ वर्षांपूर्वी घेतले होते. इथून पुढे किंमत तशी काही फार वाढेल असे वाटत नाहीये. इन्वेस्ट्मेंट म्हणूनच घेतले होते. पण सोसायटीसाठी लागणारे पैसे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे.
मिळू शकणारे भाडे अजून मिळतच नाही आहे .
कृपया सुचवा विकावे कि नाही !

EPS ला विरोध का नाही?

Submitted by मुक्तानेने on 20 April, 2016 - 07:10

सध्या सरकारच्या EPF withdrawal rule वर प्रचंड टीका होत आहे. त्यामुळॅ तो मागे पण घेण्यात आला. चांगलेच झाले. पण ह्या आधीच्या सरकारने जो EPS withdrawal rule आणाला आहे तो जास्त अन्यायकारक आहे.
EPFलाला किमान व्याज तरी मिळत होते.EPS ला तेही नाही.

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक