शेअर मार्केट बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निल्या कुलकर्णी on 2 March, 2016 - 12:47

खुप वर्षा पासुन ठरवत होतो .. शेवटी मागच्या आठवड्यात Dmat , trading account सुरु केले ..खर तर उशीर झाला हे daring करण्या साठी
मी या मधे अगदी नवीन आहे .. त्यामुळे इथे मार्गदर्शन ची अपेक्षा आहे
Entry level laa कोणत्या प्रकारे गुन्तवनुक करावी
कोणत्या शेअर मधे आणि किती रक्कम टाकावी ..
या विषया तील जाणकार , अनुभवी लोकानी सला द्यावा ...
धन्यवाद !!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेअर मार्केट हा विषय भारी आहे.चिन्यांच्या बाजारपेठेन गोंधळ घातला नसता तर या विषयावर बोलायला सुरुवात केली असती...पण तुर्तास होल्ड...

http://marketaanimi.com/
इथे अधिक माहिती सोप्या भाषेत आहे.

सध्या मार्केत ज्या लेव्हलला आहे, त्यानुसार तुमची एन्ट्री थोडी उशीरा पण सही आहे. थोडी उशीरा म्हणण्याचे कारण २९ फेब्रुबारी रोजी मार्केट्ने घेतलेली उंच उडी! पण तरी सध्या शेअर्स खरेदी करणे जास्त चांगले! मागच्या वर्षापेक्षा लेव्हल खूप कमी आहे आणि वर्ष दोन वर्षात मार्केट वर जाण्याची शक्यता दाट आहे.

तुमचे एकूण उत्पन्न १२ लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्ही राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम खाली गुंतवणूक करून करबचत करू शकता. त्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज च्या टॉप १०० शेअर्समध्ये गुंतवणूक करावी लागते.

गुंतवणूक कमीत कमी ५ वेगळ्या क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये करावी.

सध्याचे बजेट पाहता इन्फ्रास्ट्र्क्चर कंपन्या (एल अ‍ॅण्ड टी वगैरे) पुढे चांगला भाव मिळवून देतील.

(Friendly Advise withour any liability on me) Happy

धन्यवाद !! हो खरच उशिर झाला .. पन better late than never म्हनुन सुरुवात केली..

**तुमचे एकूण उत्पन्न १२ लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्ही राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम खाली गुंतवणूक करून करबचत करू शकता. त्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज च्या टॉप १०० शेअर्समध्ये गुंतवणूक करावी लागते. ** नक्कि करेन ... हा असाच सल्ला हवा आहे .. surely no liability .. Happy

banking and infra madhe ata kele aahet thode ..