गुंतवणुक

अमेरिकेत राहून भारतातले घर कसे विकावे?

Submitted by sneha1 on 16 November, 2015 - 20:40

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. आमचा पुण्याला फ्लॅट आहे. तो काही वर्षात विकायचा विचार चालू आहे. असे करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पैसे इथे आणता येतात का? टॅक्स किती पडतो, अशा अनेक गोष्टी कोणी सांगू शकेल काय? सिटीझन शिप की ग्रीन कार्ड आहे ह्याचा काही फरक पडतो का?
धन्यवाद!

तडका - शेतकर्‍याचं नशिब

Submitted by vishal maske on 15 November, 2015 - 08:53

शेतकर्‍याचं नशिब

शेतकर्‍याचा कांदा
बाजारात उतरला
तसा कांद्याचा भाव
पटकन घसरला

हे गणित जुनंच
पण पुन्हा घडलं
शेतकर्‍याचं नशिब
वारंवार मोडलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शिकाल तर टिकाल

Submitted by vishal maske on 6 November, 2015 - 09:01

शिकाल तर टिकाल

कोणाकडून शिकावं याचं
कधीही काही बंधन नसतं
जिथे शिकता येईल तिथे
शिकण्यासाठी स्पंदन असतं

जे-जे शिकता येईल ते
तत्परतेनं शिकलं पाहिजे
जे काही शिकलो ते
दिर्घकाल टिकलं पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डाळ खरेदी

Submitted by vishal maske on 5 November, 2015 - 23:20

डाळ खरेदी

बायको म्हणाली नवर्‍याला
चला बाजार फिरून येऊ
घेऊ द्या श्रेय कुणालाही
आपण डाळ भरून घेऊ

डाळ स्वस्त झाल्यापासुन
बायकोने घाई केलेली आहे
भाववाढ कधीही होऊ शकते
तीचीही खात्री झालेली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सोनं शॉपींग

Submitted by vishal maske on 5 November, 2015 - 20:18

सोनं शॉपींग

बघता-बघता हा हा करत
घरा-घरात बातमी पसरली
बायकोने सांगितले नवर्‍याला
सोन्याची किंमत घसरली

किंमत सोन्याची घसरल्या पासुन
बायकोचं वागणं-बोलणं पेटलं होतं
सोन्याची शॉपींग करावी लागेल
नवर्‍याने समजुन घेतलं होतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बोनस

Submitted by vishal maske on 5 November, 2015 - 08:55

बोनस

जेवढा घेण्यामध्ये असतो
त्याहून जास्त देण्यात असतो
वाटला गेलेला आनंद हा तर
आपुलकीच्या मनात असतो

दिला गेलेला बोनस जरी
मुल्यांकनात भेटला जातो
त्याने भेटलेला आनंद मात्र
किंमत बाह्य थाटला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डाळ जप्ती

Submitted by vishal maske on 28 October, 2015 - 09:50

डाळ जप्ती

वाढल्या डाळीच्या भावाने
जनता इथली पीडली आहे
अन् कोट्यावधीची डाळ
गोदामांत पडली आहे,...!

जिथे भांडं फूटेल तिथे
म्हणे डाळीची जप्ती आहे
तरीही सांगा साठेबाजांना
नैतिकता का खुपती आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by कनिका on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

सेकंड होम मुंबई परिसर

Submitted by moga on 26 October, 2015 - 08:55

मूंबई परिसराजवळ कर्जत , नेरळ्भागात सेकंड होमसाठे फ्लॅट घ्यायचा आहे.

कुणी सुचवू श्के का ?

सेकंड. होम शोधून जीव दमला. डोंगर असला की नदी नसते. दोन्ही असले की स्वीमिंग पुल नसतो. स्गळे अस्ले की बजेट जास्त असते.

निस्र्गरम्य हवे. स्वीमिंग पूल हवा.

सेकंड होम सोय की गैरसोय ( सत्य की थोतांड ? ) हेही लिहिल्यास चालेल.

तडका - दाल की बात

Submitted by vishal maske on 25 October, 2015 - 09:35

दाल की बात

विकणारांची शिजु लागली
खाणारांची शिजणार कशी,.?
आता स्वयंपाकी भातावरती
वरणी डाळ सजणार कशी,.?

अपेक्षांचा चुराडा करत
'अच्छे दिन' वर हा घात आहे
सामान्यांना न परवडणारी
जणू ही "दाल की बात" आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक