गुंतवणुक

तडका - नोटांचे अच्छे दिन

Submitted by vishal maske on 30 December, 2016 - 09:58

नोटांचे अच्छे दिन

रांगाच्या रांगा लाऊन पैसे
बँकेत जमा केले आहेत
जमा केलेले कित्तेक पैसे
बँकेमध्येच गुंतले आहेत

कित्तेकांनी तर दावा केला
हि नोटाबंदी फसली आहे
पण अच्छे दिनच्या प्रतिक्षेत
जनता अजुनही बसली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

NDTV चा कोट्यावधीचा घोटाळा; एक दडपलेली बातमी

Submitted by मिलिंद जाधव on 25 December, 2016 - 12:15

गेली २५ वर्षे मिडीयावर सतत स्वच्छ , मॉरल कंडक्ट, बिझीनेस एथिक्सचा राग आलापणार्या प्रणय रॉय यांचे उद्योग !!

एन्डीटीव्हीच्या मालक श्री प्रणय रॉय व त्यांच्या पत्नी राधिका रॉय ह्यांना आयकर विभागाने ५३.८४ कोटी रु च्या हेराफेरी बद्द्ल पकडल आहे. ही रक्कम ह्या दोघांनी कंपनीच्या एकॉउंट मधुन स्वतःच्या बँक खात्यात टाकलेली होती. ऐनफोर्समेंट डायरेक्टोरेट व दिल्ली पोलिसांची ईकॉनॉमिक ऑफेंस विंग ह्या केस वर काम करत आहे. ह्या दोघांची RRPR Holdings (Radhika Roy Prannoy Roy) नावाची अजुन एक शेल कंपनी सुद्धा आहे. ह्या
कंपनीतील मालकी हक्क (प्रत्येकी ५०% ) ह्या दोघांकडेच आहे.

शब्दखुणा: 

२०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मागच्या सात-आठ वर्षात पुण्यातल्या किंवा एकूणच घरांच्या वाढलेल्या किमतींबद्दल आपण खूप ऐकले/वाचले . अर्थात मी स्वत: योग्य वेळी (म्हणजे किमती प्रचंड वाढलेल्या असताना) घर घेतल्यामुळे सुखी आहेच. परत नवे घर घेण्याचा माझा अजिबात प्लॅन / तयारी /ऐपत नाही. "आता घरांचे दर निम्म्याने कमी होणार" ही गोष्ट मागची बरीच वर्षे ऐकत आलो. मी घर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशीच मला एकाने ही गोष्ट ऐकवली होती.

प्रकार: 

गुंतवणुक : सोने, पी पी एफ की शेअर बाजार

Submitted by साहिल शहा on 20 December, 2016 - 15:51

डिसेंबर ची सुट्टी लागली तर वेळ कसा घालवायचा यावर विचार करत होतो. त्यात भारतात कुठली गुंतवणुक मागच्या ६० वर्षात फायदेशीर ठरली असती याचा विचार आला. त्याच बरोबर गुंतवणुकीवर मिळणारा फायदा हा माहागाई पेक्षा अधिक आहे की नाही याचा पण अभ्यास करायचा होता. कधी तरी निव्रुत्ती घ्यावी लागेल आणि मग जवळ असणारा पैसा पुरेल की नाही हे पण बघायचे होते. त्यासाठी गुगल वर मागच्या ६० वर्षाचा डेटा सर्च केला. त्यात खालील गोष्टी मिळाल्या

तडका - कायद्याचा खुटा

Submitted by vishal maske on 15 December, 2016 - 07:23

कायद्याचा खुटा

वेग-वेगळ्या ठिकाणी
रोज धाडी पडू लागल्या
रोकड जप्तीच्या घटना
दिवसें-दिवस वाढू लागल्या

काळा पैसा पांढरा करण्या
कित्तेकांचा आटा-पिटा आहे
पण गैरव्यवहार टाळण्यासाठी
कायद्याचा आडवा खुटा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नोटाबंदीच्या रडारवर

Submitted by vishal maske on 14 December, 2016 - 07:20

नोटाबंदीच्या रडारवर

या नोटाबंदीच्या निर्णयाला
कुणी म्हणे डोळ्यात धूळ आहे
तर हे गरिबांविरोधातील युध्द
अशी राहूल यांचीही हूल आहे

आप-आपल्या विचारांनुसार
कुठे विरोध कुठे समर्थन आहे
मात्र नोटाबंदीच्या या निर्णयात
रडारवरती काळे धन आहे,...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कॅशलेस

Submitted by vishal maske on 4 December, 2016 - 09:06

कॅशलेस

देश डिजिटल करताना
नव-नवे फंडे येऊ लागले
डिजिटलचं लेबल घेऊन
व्यवहार कॅशलेस होऊ लागले

व्यवहार कॅशलेस केले तरी
रोखीचा फतवा खिजवत बसेल
हाताने पैसे मोजण्याची सवय
रोज-रोज हात खाजवत बसेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - गोल्ड टार्गेट

Submitted by vishal maske on 2 December, 2016 - 09:19

गोल्ड टार्गेट

सोनं खरेदी करण्यासाठी
मर्यादांचं बंधन आलं आहे
तसं बायकोच्या हट्टी पणात
नविनतम स्पंदन आलं आहे

सरकारचा नवा नियम ऐकुन
तिनेही टूम-टूम लावलेलं आहे
अन् ५०० ग्रॅम सोनं खरेदीचं
बायकोनेही टार्गेट ठेवलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

नवीन घर घेताना काय काळजी घ्यावी???

Submitted by मनस्वी८९ on 26 November, 2016 - 06:16

आम्ही अम्बरनाथ वेस्ट खोज खुन्ट्वली भागात घर घेत आहोत. एच डी एफ सी मधुन लोन झालाय. agreement जानकाराना दाखवुन घेतलय ( वकीलाला दाखवली नाहीये) standard format नुसार आहे अस सगळ्यान्च म्हनन आहे. जानेवारी २०१७ नन्तर registration केल्यास काहि फायदा होईल का?( builder registation साठी फोर्स करतो आहे.) Ready Reckoner वर्षातुन केव्हा revised होतो? Development charges agreement value मध्ये अ‍ॅड आहेत. Maintainance , legal charge या व्यतीरिक्तही काही असत क?? Agreement करताना कोणत्या बाबीवर भर द्यावा? अजून काही सल्ले असतील तर आभारी आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

तडका - पश्चाताप

Submitted by vishal maske on 18 November, 2016 - 08:29

पश्चाताप

कुठे अग्नीत तर कुठे
पाण्यामध्ये बुडू लागला
अंधारातला काळा पैसा
आता बाहेर पडू लागला

म्हणूनच तर नोटाबंदीचा
कुणाला रागही आला असेल
अन् अंधाराचा पश्चाताप तर
काळ्या पैशालाही झाला असेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक