चांगले आयुर्वेदिक डॉ. सुचवा.

Submitted by मेधावि on 1 February, 2016 - 22:19

नात्यातल्या एका तरुण मुलाला घराबाहेर कुठेही गेले की तेथील अस्वच्छता पाहून मलविसर्जनाची भावनाच होत नाही. २-३ दिवस तो कंट्रोल करून मग घरी आल्यावर कार्यभाग उरकतो. एकंदरीतच त्याचा कोठा जड आहे. एरंडेल तेल घेवूनही कित्येकदा उपयोग होत नाही. व्यायाम करणे, पालेभाज्या व सॅलड्स खाणे, गरम पाणी व तूप पिणे हे सगळे उपाय करून झाले आहेत व चालू आहेत परंतु फारसा फरक नाही. अ‍ॅलोपॅथीच्या फॅमिली डॉ ने हेच उपाय करत रहा असे सुचवले आहे. ह्या प्रकारच्या आजारावर आयुर्वेदामधे उपचार आहेत असे समजते परंतु चां गले डॉ. माहीती नाहीत. पुण्यातले ह्या प्रकारच्या आजारावर मार्गदर्शन करू शकतील ह्याकरता कोणाला चांगले डॉ. माहीती असल्यास कळवणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, पुण्यात सातारा रोडला डॉ. दिलीप गाडगीळ म्हणून आहेत. त्यान्च्याशी सम्पर्क साधा.

http://www.health-ayur-world.com/about-us.php

हो, आणी नुसत्याच पालेभाज्या, सॅलेडस घेण्यापेक्षा बाकी फळभाज्या पण आहारात ठेवाव्यात. त्यात पडवळ, दूधी, दोडका हे उत्तम. पडवळात भरपूर तन्तु असतात. माझ्या साबाना तर डायबेटीस आहे, पण दूधी आणी पडवळ याची भाजी व कोशिम्बीरी मुळे पचनक्रियेत बरीच सुधारणा आहे. तसेच मुग डाळ, मुगाची उसळ, ताजे ताक, भाज्यान्ची सुप याने बराच फरक पडलाय तब्येतीत. हे सर्वाना उपयोगी आहे. ( पडवळ चकत्या करुन उकडावे, मग कुस्करुन त्यात दही, मीठ व साखर घालुन खावे)
अजून एक म्हणजे झन्डु पन्चारीस्ट पण उत्तम आहे पचना करता. माझ्या मुलीला पण फरक पडलाय त्याने.पण कोठा जड आहे म्हणून सारखे एरन्डेल घेऊ नका ( नातेवाईकाना तसे सान्गा) बाकी उपचार पण करा. त्रिफळा चूर्ण पण चान्गले आहे, पण ते साजुक तुपातच घेणे उत्तम. बाकी डॉ़ सान्गतीलच.

<घराबाहेर कुठेही गेले की तेथील अस्वच्छता पाहून मलविसर्जनाची भावनाच होत नाही>

याचा आणि <एकंदरीतच त्याचा कोठा जड आहे. एरंडेल तेल घेवूनही कित्येकदा उपयोग होत नाही.>

याचा संबंध आहे का?

माझ्या ओळखीच्या एक आयुर्वेदिक डॉ मुंबईत प्रॅक्टीस करत, त्या पुण्यात शिफ्ट झाल्या आहेत. त्यांचे निदान आणि औषधोपचार अचूक असतात असा आम्हाला अनुभव आहे. हवे असल्यास त्यांचा नंबर देईन.

http://ayurhealthnliving.blogspot.in/2014/12/ayurveda-myths-busted.html

हा त्यांचा ब्लॉग. कदाचित बरेच दिवस अपडेट केला नाहिय.

मेधा
पुण्यात लक्ष्मी रोडवर सतरंजीवाला चौकात आयुर्वेद एजन्सी दुकानाच्या वर डॉ.महेंद्र मोहनलाल शर्मा (आयुर्वेदाचार्य)
भेटण्याची वेळ :- रविवार व सोमवार सोडून दुपारी ३.३० ते ७.३०
Phone:020 2445 8373

मेधा दिलिप गाडगीळ उत्तम डॉक्टर. त्यांचा दवाखाना सदाशिव पेठ आणि कर्वे नगर येथे ही आहे.

वैद्य खडीवाले., नारायण पेठ, पुणे.
मुंबई मधे आठवड्यातुन दोन वेळेस जातात. तिकडे पण भेटता येईल.
>>
वैद्य खडीवाले यांच्या मुंबई तील दवाखान्याचा पत्ता सांगाल का?

Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent

yashu7 >>> बर्याच धाग्यांवर तुम्ही हा मेसेज टाकलाय आणी तो अर्जंट आहे असे ही सांगीतलेय... पण खरेतरं मला असे वाटते की कोणताही त्रास अर्जेंसीपर्यंत गेल्यावर आधी अ‍ॅलोपॅथी डॉक कडे जाऊन ऊपचार करावा मग हवेतरं आयुर्वेदीक किंवा होमोपेथीक.

बाकी तुमची मर्जी, ऊगाचचा सल्ला वाटला तर ईग्नोर करा

मी मानिनी - मि आधि २-३ अ‍ॅलोपॅथी डॉक कडे जाऊन ऊपचार घेतल पन काहि परक पदला नहि . म्हनुल आता आयुर्वेदीक बघु आस तरवल. माहित असल्यस प्ल्झ कालवा

डॉ. श्रुती जमदग्नी..... पौड रोड .. आणि त्यांचे Mr .. डॉ . समीर जमदग्नी .. हे ही चांगले आहेत ...
मी स्वता तिथे ट्रीटमेंट घेतली आहे ..मला तरी फरक जाणवला खूपं ...

देशात १५ दिवस जाउन कार्ल्लालआ ताम्बेकदे पन्चकर्म करायचा विचार आहे. कोणास अनुभव आहे का
ताम्ब्न्याच्या आत्मसन्तुलनाचा? वर्थ आहे का जाणे?

yashu7, मॉडेल कॉलनीपाशी पुनर्वसू चिकित्सालय आहे. One of the best places to get Ayurvedic treatments especially panchakarma in Pune!

>>>कोणताही त्रास अर्जेंसीपर्यंत गेल्यावर आधी अ‍ॅलोपॅथी डॉक कडे जाऊन ऊपचार करावा मग हवेतरं आयुर्वेदीक किंवा होमोपेथीक.
अयोग्य सल्ला. उत्तम परिणामांची अपेक्षा असेल तर विकाराच्या साध्यावस्थेतच योग्य चिकित्सा घेणे आवश्यक.

एका मैत्रिणीला ओव्हरी कॅन्सर आहे.रिकरन्स. किमो चालू आहे.
त्यांना असोसिएटेड उपचार म्हणून डॉ. बेंडाळे यांचे आयुर्वेदिक उपचार चालू करायचे आहेत.खर्च बराच आहे, अंदाजे 40000 पर मंथ.त्यांनी अशी ट्रीटमेंट घेणार असल्या बद्दल कंसलटिंग डॉ ना कल्पना दिली आहे.
माझा प्रश्न असा की डॉ बेंडाळे यांचा फर्स्ट हँड अनुभव घेतलेल्या कोणी व्यक्ती इथे माहिती,अनुभव देऊ शकतील का(आयुर्वेद/होमिओपॅथी/मॉडर्न मेडिसीन या वादात सध्या पडायचे नाहीय.तो त्या कुटुंबाचा निर्णय आहे.तसेच किमो अलरेडी चालू आहे.'फक्त आयुर्वेदाने कॅन्सर बरा' होईल अशी अपेक्षा ते बाळगत नाहीयेत.)

मदती, माहिती बद्दल आगाऊ धन्यवाद.
(जिददु, माझ्या डोक्यातही हाच प्रश्न आला होता.पण मी एक अक्विंटन्स आहे.कुटुंब सदस्य नाही.त्यामुळे सध्या रोल फक्त विचारलेली माहिती मिळवून देणे इतकाच आहे.)

आयुर्वेदावर महिना ४० हजार खर्चाचे स्वरूप जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
आजाराचे स्वरूप पाहता सुवर्ण भस्म, हीरक भस्म अश्या गोष्टींचा समावेश असणार. त्याला तेवढा खर्च येणारच.

हो
हेवी मेटल असे ऐकण्यात आले तिच्याशी झालेल्या फोन वर.

माझ्या मैत्रीणीच्या आईसाठी उपचार घेतलेत डाॅ बेंडाळे ह्यांचे. ह्या डाॅ. ची औषधे इंग्लंडच्या राणीसाठीपण जातात असे ऐकले होते.