कला

कॅमेरा

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 30 December, 2011 - 09:56

कॅमेरा पुरूष असतो
कॅमेरा पुरूषी असतो

तो साठवून घेतो सौंदर्य स्वतःत
सौंदर्य... कधी धावतो पाठीपाठी
कधी मनमानी वळवून घेतो
पुढ्यात स्वतःच्या

कधी कधी तर सौंदर्यच
धावत सुटतं... भान हरपून
कॅमेर्‍यात, एका पुरुषात
चाचपून पहातं
स्वतःचीच प्रतिमा
सदैव देहभान बाळगत जगण्याऐवजीचा
सोपा मार्ग आहे का हा?

कॅमेरा पुरूष असतो
तो उघडं पाडतो
सौंदर्यांचं स्त्रैण्य स्वतःसमोर
आस्वादानंद तर घेतोच
शिवाय साठवून ठेवतो स्मृतीत
वारंवार तुलनेसाठी

गुलमोहर: 

गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2011 - 05:30

'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!

तुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय?

मोरया- जल्लोष की आक्रोश...!!

Submitted by सागर कोकणे on 28 August, 2011 - 06:25

तूच माझी आई देवा तूच माझा बाप
गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप...
या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते.

विषय: 

NCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्‍या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे सगळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.

प्रकार: 

मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जुनेच ललित. अजून काय फारसा फरक पडलेला नाही. Wink
----------------------------------------------------
"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.

प्रकार: 

कलात्म

Submitted by चिनूक्स on 9 August, 2010 - 02:06

कोणे एके काळी 'कला' या शब्दाला काही एक अर्थ होता. मान होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांना सरकारदरबारी आश्रय होता. कालांतरानं परिस्थिती बदलली. अभिजात कलांना कोणी विचारेनासे झाले. एखाद्या कलेची साधना करणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं, असा विचार केला जाऊ लागला.

त्यातच शिक्षणपद्धती बदलली. मळलेल्या वाटेवरून जाणं श्रेयस्कर ठरू लागलं. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यातच धन्यता मानणारा समाज निर्माण झाला आणि कलेचा आनंद घेणं म्हणजे काय, हेच आपण विसरून गेलो. कलेमुळे जीवन समृद्ध होतं, ही कल्पनाच मागे पडली.

Pages

Subscribe to RSS - कला