मातीकाम

रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे"

Submitted by रचना. on 25 October, 2012 - 01:36

हे दिवाळी करता रंगवलेले दिवे
माबोची मातीकाम क्वीन रुनी पॉटर हिला समर्पित

अरोमा लॅम्प

विषय: 

शाडूचा गणपती

Submitted by दीपाली on 12 September, 2012 - 06:23

लेकाला (वय १०) शाळेचं प्रोजेक्ट म्हणून ईको फ्रेंडली गणपती आणि त्याची आरास करुन न्यायची होती. त्या साठी त्यानेच केलेला शाडूचा गणपती आणि आरास. कल्पना पुर्णपणे त्याची. मला त्याला इतका चांगला गणपती करता येईल अशी अपेक्षाच नव्हती.
IMG_0028.jpgIMG_0029.jpgIMG_0030.jpg

शब्दखुणा: 

डुक्कर!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

(स्मितागद्रे यांनी टाकलेली क्लेपासून बनवलेल्या सांताक्लॉजची प्रकाशचित्रं बघितल्यावर आम्हालापण स्फुरण चढले!
आकाराचा अंदाज येण्यासाठी - डोळे मंगळसूत्रात असतात त्या मण्यांच्या आकाराचे आहेत.)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पॉटरी क्लास मध्ये अर्धे सेमिस्टर संपत आले की मग सर पुढच्या सेमिस्टरमध्ये त्यांचा काय शिकवायचा विचार आहे हे जाहीर करतात. यावेळी त्यांनी जाहीर केले Crystalline Glaze.
ते ऐकल्यावर काहींनी आनंदाने उड्या मारल्या, काहींनी ओ नोऽऽ असा उसासा सोडला आणि आमच्यासारख्या मातीकामात थोड्या नवख्या थोड्या रुळलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर हे नक्की काय आहे, मुख्य म्हणजे यासाठी prerequisites काय हा प्रश्न उभा राहिला. या आधी सुमारे ४ वर्षापूर्वी हा कोर्स शिकवला गेला होता त्यानंतर इतक्या वर्षांनी सरांनी परत हा कोर्स शिकवायची तयारी दाखवली होती (असे का याचे कारण पुढे येईलच)

विषय: 
प्रकार: 

NCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्‍या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे सगळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.

प्रकार: 

माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.

१. DiwaliPantyaMB10.JPG

विषय: 
Subscribe to RSS - मातीकाम