गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2011 - 05:30

'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!

तुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय?
उत्कृष्ठ स्थापत्यशास्त्राचा नमुना? माणसाच्या श्रद्धेचं मोहवून टाकणारं रूप? अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा? अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था? पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार? कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्‍या परंपरा-रीती-भाती? 'देऊळ' हा सर्वात मोठा विसावा असलेले, देवधर्म नित्यनेमाने आणि प्राणपणाने पाळणारे गावकरी?

खेळू या हा मस्त खेळ. 'देऊळ' या विषयाशी संबंधित तुमच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं, तुमच्या मनात कायमचं घर करून गेलेलं कुठचंही छायाचित्र इथे टाका.

स्पर्धेचे नियम -
१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.

स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!
पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.

Groups audience: 

ओके, मग भुरकट दिसणे हा माझ्या क्यामेराचा/रोलचा दोष असेल कदाचित. Happy (किन्वा कुणी दीडशहाण्याने त्या नन्दीला काळा ऑईलपेण्ट तर नै ना फासुन ठेवला?) असो.
वर पोझ छान मिळालि, खूपच लहान वय दिसतय, किती?.
माझ्याकडे पण अशाच धर्तीचा एक फोटु आहे, खूप पूर्वी केलेले खराब स्कॅनिन्ग आहे, पण नमुन्यादाखल वा झब्बू म्हणून हव तर टाकतोच Happy
gunDi - mandir 1995 s1.JPG

काळा ऑईलपेण्ट >>>>> नाही हो तो नंदी असाच आहे काळा कूळकूळीत. वय - अडीच वर्ष.

छान आहे झब्बू.

ओके स्निग्धा, वरील माझ्या मुलीचे तेव्हाचे वय पावणेदोन वर्षे Happy
आता मी माझ्या तिन एन्ट्र्या टाकतो बर का.
१) मूर्तिस्थापनेचा होम

F1980008 hom 1.JPG२) मूर्तिंची प्राणप्रतिष्ठापना
F1980009 praNpratiShTha1.JPG३) मंदिराची कलशस्थापना
F1980016 kalashasthaapana1.JPG

नाही हो तो नंदी असाच आहे काळा कूळकूळीत.>>>> अनुमोदन. वाईच्या गणपती घाटावरील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातला नंदी आहे हा. मोठा, सुबक आणि सुंदर कोरीव काम असलेला.
मंदिराच्या बाहेर, घाटावर असलेला नंदी थोडा धुरकट आहे आणि आकारानेही जरा लहान आहे.

वाईच्या गणपती घाटावरील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातला नंदी आहे हा. मोठा, सुबक आणि सुंदर कोरीव काम असलेला.>>>>>> येस. मी इतका वेळ ह्या बद्द्लच बोलते आहे. लिंबुटिंबु याना वेगळा नंदी म्हणायच आहे हे ध्यानातच आल नाही.

कसली भन्नाटे ती म्हाळसादेवीच्या मन्दिराबाहेरील धातुची दीपमाळ अन स्तम्भ! ग्रेट. Happy एकदा तरी जाऊन प्रत्यक्ष बघायला हवं.

प्रचि १ - पंचवटी, नाशिक
r001-016-corr.jpg

प्रचि २ - अमृतेश्वर मंदीर, रतनवाडी
F1010012.jpg

प्रचि ३ - शिंगेरी मंदीर, कर्नाटक
IMG_1614-fb.jpg

हे दोन्ही फोटो पुर्वप्रकाशित आहेत. स्पर्धेसाठी चालणार असेल तर हि माझी प्रवेशिका.

प्रचि १ पंढरपूर

chandrabhaga.jpg

प्रचि २ करमाळा, कमलाई मंदिर परिसरातील नंदी

nandi.jpg

मस्त फोटो आहेत सगळेच!

स्निग्धा आणि लिंब्या, तुम्ही दोघांनी टाकलेले फोटो विशेष आवडले.
लिंब्या, तुझ्या फोटो मुळे एकदम नॉस्टॅलजिया आलाय. लहानपणी ट्रिप ला जायचो तेव्हा काढलेले फोटो असेच दिसतात. आताच्या सिनेमांमध्ये आणि इस्टमनकलर मध्ये जो फरक आहे तोच आता काढलेल्या ९९ मेगापिक्सल च्या कॅमेर्‍यात आणि पुर्वीच्या रोल वाल्या कॅमेर्‍यानी काढलेल्या फोटोंमध्ये आहे. Happy

मंजूडी, सतिश, महालसेच्या देवळाचा फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद Happy
ती दीपमाळ आहे त्याला "ज्ञानदीप" म्हणतात. त्रिपुरी पौर्णिमेला, विशेष महत्त्वाच्या दिवशी वगैरे तो पूर्ण उजळतात. किंवा कोणी भाविकाने नवसपूर्ती/ अन्य काही कारणामुळे ज्ञानदीप उजळवायची इच्छा व्यक्त केली तर तेव्हा उजळतात. त्या वेळी वाती आणि तेलाचा डबा वगैरे खर्च भाविकांनी करायचा असतो.

प्रचि १ - स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार............लोटस टेंपल,दिल्ली
IMG_0641_skw.JPG

प्रचि २ - सुवर्ण मंदिर,अमृतसर
IMG_0832_skw.JPG

प्रचि ३ - हिडिंबा मंदिर,मनाली
IMG_0701_skw_0.JPG

अजय पहिला फोटो मस्त आहे. तिथे देवळाच्या आत फोटो काढू देतात?

मंजू, सतिश म्हाळसादुर्गाची दिपमाळ मस्तच आहे. सतिश माणगावचं मंदिर पण मस्त. जास्त माहित नसलेले (म्हणूनच) एकदम शांत जागा आहे ती.

१) खेडे गावातील मारूतीचे मंदीर

२) एका गावातील शंकराचा हा देवळा बाहेरील नंदी भग्नावस्थेत जात आहे. एखाद दुसराच भक्त येऊन जात असेल ह्या नंदीला आणि शंकराला भेटायला अस वाटत.

३) वरील नंदीच्या समोरील गाभार्‍यातील शंकर बाप्पा. काही गावात अशी ही स्थिती आहे देवळांची.

Pages