आपला प्रत्येक धर्मग्रंथ व प्रत्येक महापुरुष,साधु हे पुरुषांसाठी परस्त्री माते समान अतिशय आवर्जून सल्ला वजा आज्ञा देतो. परदारा, परस्री यांची अभिलाषा ठेऊ नका. आपल्या पत्नीशीच एकनिष्ठ रहा.
हे सर्व डोस पुरुषांनाच दिले जातात. मला कुठेही परपुरुष बापासमान मानावा हे वाक्य स्त्रियांना उद्देशून लिहीलेले आढळलं नाही की संतसाहित्यात असा सल्ला दिलेला दिसला नाही. याचा अर्थ पुरुष हा वासुगिरी करणाराच असतो असा होतो. येशूने दहा आज्ञा दिल्यात त्यातही व्यभिचार करू नको ही एक आज्ञा आहे, पण ती दोघांना उद्देशून आहे.
तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
एलीयन्स पृथ्वीवासियांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पृथ्वीवासिय ज्या गोष्टी करतात त्या केल्या की एलीयन्सना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पृथ्वीवासिय पृथ्वीवर राहतात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत पृथ्वीवर येणारे एलीयन्स स्वतःला पृथ्वीवासियांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
कॅमेरा पुरूष असतो
कॅमेरा पुरूषी असतो
तो साठवून घेतो सौंदर्य स्वतःत
सौंदर्य... कधी धावतो पाठीपाठी
कधी मनमानी वळवून घेतो
पुढ्यात स्वतःच्या
कधी कधी तर सौंदर्यच
धावत सुटतं... भान हरपून
कॅमेर्यात, एका पुरुषात
चाचपून पहातं
स्वतःचीच प्रतिमा
सदैव देहभान बाळगत जगण्याऐवजीचा
सोपा मार्ग आहे का हा?
कॅमेरा पुरूष असतो
तो उघडं पाडतो
सौंदर्यांचं स्त्रैण्य स्वतःसमोर
आस्वादानंद तर घेतोच
शिवाय साठवून ठेवतो स्मृतीत
वारंवार तुलनेसाठी