शिक्षण

आय आय टी बद्दल मार्गदर्शन

Submitted by इच्चूकाटा on 24 October, 2020 - 13:50

माझ्या मुलाला त्याला पाहिजे ते कॉलेज व branch मिळत आहे. परंतु मुलीला चांगले कॉलेज v branch मिळत नाही.
तर अशा कॉलेजला प्रवेश घेणे कितपत योग्य आहे. पुढे skop आहे का.
तसेच तिला आय आय टी n krta स्पर्धा परीक्षा दे म्हणतोय.
तुम्हाला काय वाटते
इथे आय आय टी असे शोडले पण पूर्वीचा धागा दिसला नाही म्हणून नवीन प्रश्न केला आहे

शिक्षण मातृभाषेतच घ्यावे की नाही?

Submitted by सखा on 28 September, 2020 - 23:19

बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का?

"यंटायर पॉलिटिकल सायन्स" ही डिग्री कुठे मिळेल ?

Submitted by जिद्दु on 13 September, 2020 - 04:10

माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. नोटबंदीत माझ्या मालकाचे दिवाळे वाजल्याने मी बेकार झालो होतो. मोठ्या प्रयत्नाने दुसरी एक नोकरी मिळाली पण जीयसटीच्या घिसाडघाईने त्या मालकाचेबी बारा वाजले. शेवटी असाच हताशपणे फिरत असताना एका सद्गृहस्थांनी मला चहाची टपरी टाकण्याचा सल्ला दिला. आणि त्यात नशिबाने मला चांगले यश आले. माझ्या टपरीजवळच प्रभातशाखा भरत असल्याने त्या लोकांची भरपूर वर्दळ असते. त्या लोकांच्या सल्ल्याप्रमाणे मी चहाबरोबरच भज्यांचा ठेला पण सुरु केला आणि कमी काळातच मला चांगली बरकत आलीये. तिथे शाखेला सकाळी काही व्हीआयपी मंडळीही अधूनमधून हजेरी लावतात.

माहिती हवी आहे

Submitted by Rani19 on 10 August, 2020 - 08:18

नमस्कार, मला एक विचारायचे आहे की , मी २००९ मध्ये १२ वी पास झाली . मला पुढे शिकायचं आहे पार्ट टाईम. मग बी कॉम पूर्ण केलेलं चांगलं कि काही कोर्स ?. ११ वर्षाचा गॅप आहे .. मला अभ्यासाचं टेन्शन आलाय.. पुढे जमेल का? इ.... प्लीज काही सजेशन द्या किंवा काही कोर्सेस असेल तर सुचवा

माहिती हवी आहे

Submitted by Rani19 on 10 August, 2020 - 08:15

नमस्कार, मला एक विचारायचे आहे की , मी २००९ मध्ये १२ वी पास झाली . मला पुढे शिकायचं आहे पार्ट टाईम. मग बी कॉम पूर्ण केलेलं चांगलं कि काही कोर्स ?. ११ वर्षाचा गॅप  आहे .. मला अभ्यासाचं टेन्शन आलाय.. पुढे जमेल का? इ.... प्लीज काही सजेशन  द्या किंवा  काही कोर्सेस असेल तर सुचवा. 

निसर्गदत्त भांडवल आणि बाजारभाव

Submitted by केअशु on 3 August, 2020 - 10:50

हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे!

"आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या."

"हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!"

"मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!"

"हो हो सांगतो.धीर धर! ते फिरलेलं डोकंच ताळ्यावर आणण्यासाठी तुला बोलवलंय इथे!"

"म्हणजे?"

शब्दखुणा: 

भारताची नवीन शिक्षण प्रणाली

Submitted by अनिथ on 31 July, 2020 - 08:16

सध्या भारतीय केंद्रीय मंत्री मंडळ नविन अभ्यासक्रम व नविन शिक्षण पद्धत लागु करण्याचा प्रयत्न करत आहे, ती थोडक्यात अशी
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार.
- मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल.
- बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार.

डुप्लीकेट धागा

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 July, 2020 - 17:20

34 वर्षा नंतर शैक्षणिक धोरणात बदल

सविस्तर बातमी ईथे वाचा

https://www.bbc.com/marathi/india-53578620

हायलाईटस साधारण अश्या

१. दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार आहेत

नवीन ५+३+३+४ आराखडा लागू होणार आहे.

पहिला टप्पा: पूर्व प्राथमिक ते दुसरी - पाच वर्षे
दुसरा टप्पा: तिसरी ते पाचवी- तीन वर्षे
तिसरा टप्पा: सहावी ते आठवी - तीन वर्षे
चौथा टप्पा: नववी ते बारावी- चार वर्षे

म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे !

विषय: 
शब्दखुणा: 

नवीन शैक्षणीक धोरण - २०२०

Submitted by अभि_नव on 29 July, 2020 - 08:04

२०२० साली नवे शैक्षणीक धोरण जाहीर झाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

आतापर्यंत कळलेले काही ठळक मुद्दे:
- ५वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषा किंवा राज्याच्या अधिकृत भाषेमधुन.
- वैद्यकीय व कायदा वगळता ईतर सर्व उच्चशिक्षणासाठी एकच केंद्रीय मंडळ.
- उच्चशिक्षणामधे अनेक एग्झिट पॉईंटस - उदा - १ वर्षी बाहेर पडल्यास सर्टीफि़केट, २ वर्षे डिप्लोम , ३ वर्षे डीग्री ई.
- १०/१२ बोर्ड परिक्षा रद्द (unverified)
- १०+२ ऐवजी आता ५+३+३+४
- भाषांतर व भाषा यासाठी नवी संस्था. संस्कृतवर भर.
- सहावीपासुन कोडींग शिकवणार

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण