माहिती हवी आहे

Submitted by Rani19 on 10 August, 2020 - 08:15

नमस्कार, मला एक विचारायचे आहे की , मी २००९ मध्ये १२ वी पास झाली . मला पुढे शिकायचं आहे पार्ट टाईम. मग बी कॉम पूर्ण केलेलं चांगलं कि काही कोर्स ?. ११ वर्षाचा गॅप  आहे .. मला अभ्यासाचं टेन्शन आलाय.. पुढे जमेल का? इ.... प्लीज काही सजेशन  द्या किंवा  काही कोर्सेस असेल तर सुचवा. 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भलेशाब्बास...तुम्हाला पुढे शिकायची उर्मी आहे, आवड आहे यातच अर्धी लढाई तुम्ही जिंकला आहात.
राहिला प्रश्न मला जमेल काय? तर का नाही जमणार, तुम्हाला आवड आहे तर नक्की जमणार आणि यशस्वी व्हाल...
काय शिकावे? तुम्हाला कोणत्या क्षेत्रात रस / आवड आहे हे बघा. तुमच्या प्रश्नात तुम्ही ते लिहिल तर त्या क्षेत्रातील जाणकार अधिक माहिती देऊन मदत करू शकतील...पुवाशु

यालाच जोडून अजून एक प्रश्न, माझ्या एका भावाने 12वी विज्ञाननंतर बि. कॉमला प्रवेश घेतला, आता दुसरं वर्ष पूर्ण केलं आहे. आता त्याला कॉमर्समध्ये राम दिसत नाही. फार्मसी किंवा इतर प्रोफेशनल कोर्सेस करायचे झाल्यास कसे करता येईल? CET परत द्यावी लागते का?

Cet चा रिझल्ट किती वर्षे valid असतो ते सरकारच सांगेल. अप्लिकेशन पोर्टल वर कळेल. बहुतेक एक वर्षच validity असते.

भावाला सांगा नीट विचार करायला. अजून 1 वर्षात कॉमर्स पूर्ण होईल. त्या पदवीनंतरही खूप मार्ग उघडे होतील. ते अर्धवट सोडून दुसरा कोर्स घेतला व त्यातही नंतर राम आढळला नाही तर हाती येणारी पदवीही गेली असे होईल. फार्मसीत किंवा इतर प्रोफेशनल कोर्समध्ये नोकरीच्या संधी काय आहेत हे त्याला बघायला सांगा. मुलीच्या मित्राने फार्मसी केलंय, गेले पाच वर्षे 25,000 पगारावर रखडतोय.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक वेगाने पुढे येणारे तंत्रज्ञान आहे. त्यासाठी स्टॅटिस्टिकसमध्ये गती असणे फायद्याचे ठरते. धरसोड करणे भावाला परवडतेय असे दिसतेय, तर मळलेल्या वाटा बघण्यापेक्षा नवे तंत्रज्ञान बघायला सांगा. त्याच्या हातात स्मार्टफोन असणारच, त्याचा वापर करून अजून 10 मार्ग त्याचे त्याला शोधता येतील.