भारताची नवीन शिक्षण प्रणाली

Submitted by अनिथ on 31 July, 2020 - 08:16

सध्या भारतीय केंद्रीय मंत्री मंडळ नविन अभ्यासक्रम व नविन शिक्षण पद्धत लागु करण्याचा प्रयत्न करत आहे, ती थोडक्यात अशी
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार.
- मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल.
- बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार.
- बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न.
- १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे. बालवाडी ते दुसरी , तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशी रचना यापुढे असेल.
- तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता.
शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. यात शिक्षण व्यवस्था बहुवैविध्य, बहुभाषिक करण्याकडे अधिक भर देण्यात आला आहे. जीडीपीचा कमित कमी ६ टक्के इतका निधी शिक्षणासाठी खर्च करण्याचा मानस आहे.
सध्या जवळ जवळ ३-४ पण नाही., बघु काय होतय,,
आणि हो मला वाट्त हे बदल बहुधा २०-२१-२२ पासुन लागु होतील

या विषायावर आधिच एक धागा आहे नजरचुकीने बघितला नाही, आता दिसला म्हणुन हटवत होतो पण म्हटल ३४ वर्षापासुन एकच सिस्टिम होती आता बदलली आनंद झाला म्हनुन राहु दिला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेडिसिन विषय एकाने मेजर घेतला, संगीत मायनर घेतला
एकाने मेडिसिन मायनर घेतला आणि संगीत मेजर

डॉकटरच्या नोकरीला दोघेही अर्ज करणार का?